Home » Amavasya : काळ्या मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून साजरी केली जाते वेळ अमावस्या

Amavasya : काळ्या मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून साजरी केली जाते वेळ अमावस्या

by Jyotsna Kulkarni
0 comment
Amavasya
Share

आज मार्गशीर्ष महिन्याची आणि २०२५ सालातली शेवटची अमावस्या आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या तिथी ही दर्श अमावस्या म्हणून पाळली जाते. अमावस्या तिथीचे स्वामी हे आपले पूर्वज अर्थात पितृ असतात. आपल्या जुन्या मान्यतेनुसार अमावास्या ही तिथी आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. यंदाच्या वर्षातील शेवटची दर्श अमावस्या आज अर्थात १९ डिसेंबर रोजी आहे. मार्गशीर्ष अमावस्या १९ डिसेंबरला पहाटे ४ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होत असून, ती २० डिसेंबरला सकाळी ७ वाजून १२ मिनिटांपर्यंत राहील. (Amavasya)

२० डिसेंबरला मार्गशीर्ष अमावस्या तिथी सूर्योदयानंतर म्हणजेच सकाळी ७ वाजून ९ मिनिटांनंतर केवळ ३ मिनिटांसाठी आहे. उदयातिथीमध्ये मार्गशीर्ष अमावस्या केवळ ३ मिनिटांसाठीच आहे. १९ डिसेंबरला मार्गशीर्ष अमावस्येची तिथी सूर्योदय सकाळी ७ वाजून ९ मिनिटे पासून संपूर्ण दिवसभर राहील. त्यामुळे १९ डिसेंबरला दिवसभर मार्गशीर्ष अमावस्या तिथी असल्याने लोकांना अमावस्येचं स्नान, दान, तर्पण आणि श्राद्ध इत्यादी करू शकतील. त्यामुळे मार्गशीर्ष अमावस्या १९ डिसेंबरलाच असेल. (Vel Amavasya)

आज मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळा अमावस्या. अमावस्या तिथी म्हटले की ती वाईट तिथी असते, अशीच सगळ्यांची भावना आहे. पण अमावस्या ही वाईट किंवा अशुभ तिथी नाहीये. याच अमावस्या तिथीला आपण आपला सर्वात मोठा असा दिवाळीचा सण साजरा करतो. म्हणजेच काय तर वर्षातल्या काही अमावस्या तिथी सोडल्या तर सर्वच अमावस्या या शुभ समजल्या जातात. आता आपण आजच्या वेळ अमावस्येवबद्दल विचार केला तर आजची अमावस्या ही वर्षातली महत्त्वाची आणि शुभ अमावस्या समजली जाते. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील काही भागात आजच्या दिवशी आपल्या निसर्गाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला जातो. (Marathi)

आजच्या दर्श वेळा अमावस्याला ‘येळवस’ असेही म्हटले जाते. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील मराठवाडा या भागात एक सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आजच्या दिवशी शेतकरी त्यांच्या शेतातील काळ्या मातीचे अर्थात काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी शेतकरी तिची मनोभावे पूजा करतो. ‘वेळा अमावस्या’ साजरी करण्याची अनेक वर्षापासून परंपरा आजही मराठवाड्यात पाळली जाते. भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतात मुख्यत्वे शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. ज्या काळ्या मातीतून आपल्याला पिकाच्या रूपाने सोने मिळते, त्याच काळ्या आईचे आजच्या दिवशी आभार मानले जातात. (Todays Marathi Headline)

Amavasya

मूळचा कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात धाराशिव, लातूर, सोलापूर आणि परळीच्या काही भागात साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावस्येला ‘येळवस’ साजरी केली जाते. या दिवशी शेतात कडब्याच्या खोपीत लक्ष्मी देवीची प्रतिष्ठापना केली जाते आणि तिला नैवद्य दाखवला जातो. शेतात खरीप व रब्बी या दोन हंगामात मिळून वेळ अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची पुजा केली जाते. शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. तसंच रब्बी हंगामातील पिके गहू, हरभरा, ज्वारी, करडई, सुर्यफूल आदी पिकात चर शिंपून पीक चांगलं येऊ दे, अशी देवाकडं प्रार्थना केली जाते. यानंतर भोजनाचा आनंद लुटला जातो. (Top Marathi News)

वेळा अमावस्या लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागात साजरी होते. तसे पाहायला गेले तर हा आहे मूळचा कर्नाटकातला सण. तिथून तो महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आला आहे. उर्वरीत महाराष्ट्रमध्ये बहुतेक हा सण साजरा केला जात नाही. आजच्या दिवशी प्रत्येक शिवार, शेती माणसांनी गर्दीने फुलून गेले असतात. प्रत्येक शेतात घरातील लोक,पाहुणे, मित्रमंडळी यांच्यामुळे सगळे शिवार माणसाने फुलून जातात. जूनमध्ये पेरणी होते. सातवी अमावस्या डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरवाड्यात येते. खरीपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते. तुरही ऐन बहरात असते. रब्बी हंगामातील पेरणी होऊन संपूर्ण शेती हिरवीगार झालेली असते. ऊनाची तीव्रता देखील नसते. (Latest Marathi Headline)

बदलणाऱ्या ऋतूनुसार आपण कायम आपल्या आहारात बदल केला पाहिजे. कारण ऋतूनुसार घेतला जाणारा आहार शरीरास कायम लाभदायक आणि पोषक ठरतो. हिवाळ्यात फळे आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात भूक जास्त लागते आणि पचनसंस्था चांगली असते. या ऋतूमध्ये कोरडे वारे वाहतात त्यामुळे शरीर कोरडे पडू लागते, असे होऊ नये यासाठी शरीराला स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. त्यामुळेच वेळा अमावस्येला बाजरीची भाकरी आणि गरम पदार्थांची मेजवानी असते. या दिवशी सोळा भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते. त्याचबरोबर बाजरीचं पीठ उकडून त्याचे उंडे बनवले जातात. गूळ शरीरासाठी उष्ण असतो म्हणून गूळ घालून गव्हाची खीर बनवली जाते. शिवाय हे सगळे पचवण्यासाठी ज्वारीचे पीठ रात्रभर ताकात भिजवून आंबील बनवली जाते. (Top Trending News)

========

Tamil Nadu : कार्तिगाई दीपम प्रकाशोत्सव वादाच्या भोव-यात का अडकला !

========

वेळा अमावस्येच्या या दिवशी शेतात कडब्याची म्हणजे धान्यांच्या वाळलेल्या धाटांची खोप बांधतात. पाच पांडवांची आणि इतर देवतांची पूजा करुन नैवेद्य दाखवतात. पूजेनंतर सगळेजण एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतात. हा कार्यक्रम इतका महत्त्वाचा असतो की ज्यांचे स्वतःचे शेत नाही त्यांना दुसऱ्यांच्या शेतात आग्रहाने बोलावतात. या दिवशी सगळ्याचा संध्याकाळपर्यंत शेतात मुक्काम असतो. ऊन कमी झाले की लोक पुन्हा घरी परततात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.