आपल्याला नेहमीच सुंदर दिसण्यासाठी आपण विविध ब्युटी प्रोडक्ट्स किंवा पार्लरमध्ये जात असतो. त्याचसोबत आपल्या चेहऱ्यासह हाता-पायांच्या त्वचेची काळजी घेणे सुद्धा फार महत्वाचे असते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास तेथे हळूहळू काळे डाग पडू लागतात आणि ते अधिकच वाढत जातात. परंतु जेव्हा ते अधिक गडद होतात आणि आपली त्वचा काळवंडल्यासारखी दिसते तेव्हा मात्र आपल्याला टेंन्शन येते. कारण हे डाग सहजासहजी जात नाही आणि त्यासाठी वेळ ही लागतो. परंतु तुम्ही काही घरगुती उपायांनी या त्वचेसह मानेवर आलेल्या काळ्या डागांना गुडबाय करु शकता. तर ते कसे करायचे याबद्दलच आपण थोडक्यात जाणून घेऊयात.(Dark neck remedies)
-अॅलोवेरा जेलसह लिंबूचा वापर
सर्वात प्रथम तुम्ही अॅलोवेरा (कोरफड) जेल घेऊन त्यात अर्धा चमचा निंबूचा रस घाला. तुम्हाला हवे असल्यास त्यात मध आणि गुलाब पाणी ही टाकू शकता. हे सर्व आता एकत्रित करुन एक मिश्रण तयार करा आणि ते तुमच्या मानेवरील काळ्या डागांवर लावून ठेवा. जवळजवळ १५ मिनिटांनंतर ते मिश्रण स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून २-३ वेळा ही कृती करुन पहा आणि तुम्हाला यामधून नक्कीच फरक दिसून येईल.
-अॅलोवेरा जेलसह हळदीचा वापर
तुम्हाला येथे ३ चमचे अॅलोवेरा जेलमध्ये चिमुटभर हळद आणि अर्धा चमचा बेसन घ्यायचे आहे. याची एक पेस्ट तयार करुन ती आता मानेवरील काळ्या डागांना लावा. अर्ध्या तासानंतर ते पाण्याने साफ करा. आठवड्यातून ३ वेळा अशा पद्धतीची पेस्ट तुम्ही लावल्यास तुम्हाला काळ्या डागांमध्ये फरक जाणवेल.
हे देखील वाचा- पावसाळ्यात तेलकट त्वचा असणाऱ्यांनी ‘अशी’ घ्या काळजी

-अॅलोवेरा जेलसह काकडीचा रस
२ चमचे अॅलोवेरा जेल आणि २ चमचे काकडीचा रस घ्या. या दोन्ही गोष्टी एकत्रित केल्यानंतर त्याचे मिश्रण मानेला लावा. अर्ध्या तासानंतर ते स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या मानेवरील ड्राय त्वचेसह काळेडाग ही जाण्यास मदत होईल.(Dark neck remedies)
-अॅलोवेरा जेलसह दहीचा वापर
२ चमचे अॅलोवेरा जेलसह १ चमचा दही घ्या आणि त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. आता ही पेस्ट मानेला लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर हलक्या गरम पाण्याने ते साफ करा. यामुळे मानेवरील काळे डाग सहज निघून जाण्यास मदत होईल.
-अॅलोवेरा जेल आणि मुल्तानी माती
तुम्ही १ चमचा अॅलोवेरा जेल मध्ये समप्रमाणात मुल्तानी माती आणि गुलाब पाणी घ्या. याची पेस्ट तयार करुन ती मानेला लावा. अर्ध्या तासानंतर हलक्या कोमट पाण्याने मानेवरील पेस्ट साफ करा. असे केल्याने मानेवारील काळे डाग निघून जाण्यास मदत होईल.