Dark Circle Problem : सध्याच्या काळात डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या येणे सामान्य बाब झाली आहे. ही समस्या आता कोणत्याही वयातील व्यक्तीला होत आहे. काही लोकांना पुरेशी झोप मिळत नाही तर काहींना पोषण तत्त्वे योग्य प्रमाणात न मिळाल्याने डार्क सर्कलची समस्या उद्भवू शकते. अशातच बहुतांशजण असा सल्ला देतात की, खूप वेळ झोपल्याने डार्क सर्कलच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
डार्क सर्कलची समस्या का उद्भवते?
आजकाल ही समस्या अशा लोकांमध्ये दिसून येत आहे, जे बहुतांश वेळ टिव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईलवर असतात. या गोष्टींकडे सतत लक्ष लागून राहत असल्यानेही डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्यास सुरूवात होते. याशिवाय काही लोकांमध्ये डार्क सर्कलची समस्या जेनेटिक असते.
याशिवाय डार्क सर्कल होण्यामागील मोठे कारण म्हणजे मेकअप देखील आहे. कारण मार्केटमध्ये काही कॉस्मेटिक असे मिळतात ज्यामुळे तुमची त्वचा बिघडली जाऊ शकते. यामुळेही डार्क सर्कलची समस्या निर्माण होऊ शकते.
एक्सपर्ट्स असे म्हणतात की, जर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यासही डार्क सर्कल येऊ शकतात. कारण पाण्याच्या कमतरतेमुळे ब्लड सर्कुलेशन शरिरात व्यवस्थितीतरित्या होत नाही. यामुळे देखील डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच पुरेशी झोप न घेणेही डार्क सर्कल होण्यामागील मोठे कारण आहे. (Dark Circle Problem)
काय कराल?
हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, व्यक्तीने दररोज सहा ते आठ तासांची पुरेशी झोप घेतली पाहिजे. यामुळे डोळ्यांखालील डार्क सर्कलची समस्या दूर होऊ शकते. कारण काही वेळेस असे दिसून येते की, पुरेशी झोप घेतल्यानंतरही डार्क सर्कलची समस्या निर्माण होते. अशातच तुम्हाला पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वांची गरज असते. कारण याच्या मदतीने डार्क सर्कलची समस्या कमी होतो. व्हिटॅमिन सी शरिरात ब्लड सर्कुलेशन आणि कोलेजेनचे प्रोडक्शन वाढवण्यास मदत करतात. याच कारणास्तव चेहऱ्याची त्वचा नितळ आणि चमकदार होते. याशिवाय शरिरातील लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई आणि लाइकोपीनची कमतरता दूर करावी.
(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)