देशातील मुघल बादशाह शाहजहा याचा लहान मुलगा दारा शिकोह (Dara Shikoh) याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चर्चेमागील खरं कारण असे की, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ म्हणजेच आरएसएस सोबत सरकार्यवाह कृष्ण गोपाल याचे विधान आणि एक रिसर्च प्रोजेक्ट. त्यांनी तीन वर्षांपूर्वी दिलेल्या एका विधानात दारा शिकोह यांना सच्चा मुस्लिम असल्याचे म्हटले होते. मीडिया रिपोर्ट्सने दावा केला आहे की, संघाने एक रिसर्च प्रोजेक्ट सुरु केला आहे, जो थेट दारा शिकोह यांच्यासंबंधित आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून दारा शिकोह संबंधित काही गोष्टी समोर आणल्या जाणार आहेत. आता दारा शिकोह यांचे आयुष्य आणि शिकवणीच्या प्रचारासाठी संघ या प्रोजेक्टअंतर्गत दारा दारा यांच्या कामांच्या रिसर्चवर काम करणार आहे. या व्यतिरिक्त शिकोह संदर्भातील काही पुस्तके सुद्धा विविध भाषांमध्ये ट्रांन्सलेट केली जाणार आहेत.
कोण होते दारा शिकोह आणि त्यांचा हिंदू धर्माशी काय संबंध?
२० मार्च १६१५ मध्ये राजस्थान मधील अजमेर येथे जन्मलेल्या दारा शिकोह शाहजहा आणि दुसरी मुमातच महल यांचे पुत्र होते. दारा सवत आणि सख्खे मिळून एकूण १३ भावंड होती. परंतु ६ जणच जिवंत राहिली. १६६३ मध्ये त्यांचे लग्न नादिरा बानो यांच्यासोबत झाले होते. तर इतिहासकार असे सांगतात की, दारा शिकोहा आपल्या भाऊ औरंगजेबाच्या विरुद्ध होते. दारा अत्यंत उदार आणि धर्मांमध्ये फरक करणारे नव्हते. त्यांना गैर-रुढीवादी मुस्लिम मानले जाते. हिंदू धर्मात त्यांना खास आवड होती. त्यांनी आपल्या अध्ययनाच्या माध्यमातून हिंदू आणि इस्लाम धर्मात समांतरपणा शोधण्याचा प्रयत्न केला. दारा शिकोह यांच्याबद्दल असे ही बोलले जाते की, हिंदू धर्मासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी त्यांनी ५२ उपदेश आणि महत्वपूर्ण हिंदू धार्मिक पुस्तक ही संस्कृतातील फारसी भाषेत अनुवाद केले होती. त्यांना असे हवे होते की, हिंदु उपदेश हे मुस्लिम विद्वानांनी सुद्धा वाचावेत. शिकोह यांनी उपदेश आणि पुस्तकांचे जे अनुवाद केले त्याचा एक फायदा असा झाला की ते युरोपापर्यंत पोहचले गेले. त्यानंतर त्याचे लॅटिन भाषेत सुद्धा अनुवाद ही करण्यात आले. दारा शिकोह यांचे सर्वाधिक प्रसिद्ध पुस्तक, मजमा-उल-बहरीन वेदांत आणि सुफीवादाची तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे.
शिकोह यांच्यावर संघाच्या प्रोजेक्टची सुरुवात कधी आणि कशी झाली?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दारा शिकोह (Dara Shikoh) यांच्यावर संघाचे प्रोजेक्टचा पाया २०१७ मध्ये पडला होता. तेव्हा संघ प्रचारक चमन लाला यांच्या स्मृति प्रोग्राममध्ये दारा शिकोह यांच्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये या प्रोजेक्ट सुरु करण्याचे ठरवण्या आले. या प्रोजेक्टची जबाबदारी संघातील सह सरकार्हवाह कृष्ण गोपाल यांना दिली होती. त्यांनी यासाठी काही वर्कशॉप सुद्धा आयोजित केले होते.
हे देखील वाचा- एक ‘असे’ शहर जिथे ७२ वर्षांपासून झाला नाही कोणाचाच मृत्यू, येथे मृत्यूवर लादण्यात आलीय ‘बंदी’
इकोनॉमिक्स टाइम्सच्या बातमीनुसार, या प्रोजेक्टअंतर्गत दारा शिकोह संबंधित विविध पुस्तकांचे ट्रांन्सलेशन केले जाणार आहे. त्याचसोबत या प्रोजेक्टसाठी माहिती एकत्रित करण्यासाठी अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीने आपल्या दारा शिकोह सेंटर अंतर्ग आपापसातील संवादासाठी पॅनल तयार करण्याची ही घोषणा केली आहे. अशी चर्चा सुरु आहे की, जामिया मिलिया इस्लामिया, मौलाना आजाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी याच प्रकारचे पॅनल तयार करणार आहेत.