Home » Dalai Lama : ३० वर्षांपूर्वी गायब झालेला Monk अजूनही जिवंत?

Dalai Lama : ३० वर्षांपूर्वी गायब झालेला Monk अजूनही जिवंत?

by Team Gajawaja
0 comment
Dalai Lama
Share

आजपासून ३० वर्षांपूर्वी ६ वर्षांच्या Monk ला चीनने किडनॅप केलं… आणि चीनच्या म्हणण्यानुसार तो आजही जिवंत आहे.. तर या गोष्टीची सुरुवात झाली, १४ मे १९९५ ला. १४ वे दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो यांनी ११ व्या पंचेन लामाची घोषणा केली. आता दलाई लामा आणि पंचेन लामा या तिबेट बौद्ध धर्मातील मोठ्या पदव्या आहेत. त्या दिवशी ज्या पंचेन लामाची घोषणा झाली, त्याचं नाव होतं, गेधुन चोएक्यी न्यिमा. हा फक्त ६ वर्षांचा monk होता. ज्या दिवशी ही घोषणा झाली, त्याच्याच तीन दिवसांनी म्हणजे १७ मे १९९५ ला एक भयानक घटना घडली.

सहा वर्षांचा गेधुन आणि त्याची फॅमिली अचानक गायब झाली. ते कुठे गेले? त्यांचं काय झालं? कोणाला काहीच खबर नाही. काही काळानंतर असं कळलं की, चीनने त्यांना किडनॅप केलं. ते कसं केलं हे अजून पर्यंत कोणालाच कळलं नाही. त्यांना त्यांच्या गावातून जबरदस्तीने नेलं आणि त्यानंतर त्यांना अज्ञात ठिकाणी हलवण्यात आले, त्यांना एका गुप्त जागेत ठेवण्यात आलं. असं म्हटलं जातं, आज गेधुन ३० वर्षांचा आहे आणि कदाचित जिवंत आहे. पण अजूनही कोणालाच त्याचा पत्ता लागला नाही. त्या किडनॅप झालेल्या सहा वर्षाच्या Monk बद्दल जाणून घेऊ. (Dalai Lama)

Dalai Lama

तर, २५ एप्रिल १९८९ ला तिबेटच्या ल्हारी गावात गेधुनचा जन्म झाला. त्याचं कुटुंब अगदी साधं होतं. पण तिबेटी परंपरेनुसार, त्याच्या जन्माशी संबंधित काही विशेष संकेत दिसायला लागली आणि अनेकांना वाटायला लागलं की, हा मुलगा विशेष आहे. तिबेटी बौद्ध परंपरेत, पुनर्जन्माला खूप महत्त्व आहे म्हणून त्या विशेष संकेतांमुळे त्याला १०व्या पंचेन लामाचा पुनर्जन्म म्हणून मान्यता मिळाली.(Top Stories)

काही लोकांना पंचेन लामा आणि दलाई लामा ही नावं वाटतात, पण ही नावं नाहीत तर या दोन्ही तिबेटी बौद्ध धर्मातील पदव्या आहेत. आधी आपण हे पंचेन लामा आणि दलाई लामा काय असतं हे समजून घेऊ. पंचेन लामा हे तिबेटी बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचे आध्यात्मिक नेते, ज्यांचं स्थान दलाई लामानंतर दुसऱ्या क्रमांकाचं मानलं जातं. पंचेन लामाची निवड तिबेटी बौद्ध परंपरेनुसार पुनर्जन्माच्या तत्त्वावर आधारित असते, ज्यामध्ये दलाई लामा आणि उच्च लामांच्या समितीने स्वप्नं, दैवी चिन्हं आणि पवित्र तलावातील दृष्टान्तांचा आधार घेतात आणि त्यानुसार योग्य अशा मुलांची यादी तयार केली जाते. त्यांची आध्यात्मिक चाचणी घेतली जाते. दलाई लामांच्या शेवटच्या डिसीजनमधून निवडलेल्या मुलाला पंचेन लामा म्हणून घोषित केलं जातं आणि त्याला धार्मिक प्रशिक्षण दिलं जातं आणि १९९५ ला गेधुनची वयाच्या सहाव्या वर्षी पंचेन लामा म्हणून निवड झाली.(Top Stories)

तर तेव्हा चीनच्या कम्युनिस्ट सरकारला तिबेटी बौद्ध परंपरेनुसार होणारी निवड मान्यच नव्हती. याचं कारण म्हणजे, ते नास्तिक होते आणि तिबेटच्या धार्मिक प्रक्रियेला ते अंधश्रद्धा मानायचे. तिबेट हा तेव्हा स्वतंत्र प्रदेश होता, ज्याला स्वतःची संस्कृती होती, म्हणून त्यांना तिबेटी बौद्ध धर्मावर कंट्रोल हवा होताआणि त्यांना चीनी संस्कृतीत सामील करायचं होतं. मग या वेळेस त्यांनी प्लॅनिंग केली. १४ मे ला पंचेन लामाची निवड झाली आणि लगेचच तीन दिवसांनी, म्हणजे १७ मे १९९५ला, गेधुन आणि त्यांचे आई-वडील देचेन छोडोन आणि कन्सोक योंग्ड्रुंग यांना त्यांच्या गावातून, ल्हारी, नागचू येथून गायब केलं. ही घटना इतकी फास्ट झाली की, कोणाला काहीच कळायचा मार्ग उरला नाही. (Dalai Lama)

गेधुनच्या बेपत्ता झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघ, ह्युमन राइट्स वॉच, आणि इतर मानवाधिकार संघटनांनी याला Enforced Disappearance म्हटलं. मग हीच आंतरराष्ट्रीय टीका टाळण्यासाठी काही महिन्यांनंतर त्यांनी सांगितलं की, गेधुन यांना “संरक्षणासाठी” ताब्यात घेतलं आहे. पण त्यांनी या दाव्याला कोणताच ठोस तपशील किंवा पुरावा दिला नाही.(Top Stories)

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समितीने आणि UN Working Group on Enforced or Involuntary Disappearances ने गेधुन याच्या ठावठिकाणाबाबत चीनकडे प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर चीनने २००० साली दावा केला की, गेधुन “सुरक्षित” आहेत आणि “सामान्य आयुष्य” जगत आहेत. त्यांनी असंही सांगितलं की, गेधुन यांना आणि त्यांच्या कुटुंबाला “कोणीही त्रास देऊ नये” अशी त्यांची इच्छा आहे. यावेळी सुद्धा त्यांनी कोणताच ठोस पुरावा दिला नाही. (Dalai Lama)

===============

हे देखील वाचा : Yeti History : हिमालयात खरंच आहे यति? रहस्य काय?

===============

२००७ मध्ये, चीनने “Order No. 5” नावाचा कायदा लागू केला, ज्यामुळे सर्व “लिव्हिंग बुद्ध” म्हणजे पुनर्जन्मित लामा यांच्या निवडीवर चीन सरकारचा कंट्रोल आला. याचा परिणाम असा झाला की, पंचेन लामा आणि दलाई लामा यांच्या पुनर्जन्माच्या निवडीवर चीनचा हस्तक्षेप वाढला. त्यानंतर राजकीय तणाव निर्माण व्हायला नको म्हणून, २०१५ आणि २०२० ला चीनने पुन्हा गेधुन जिवंत असल्याचा दावा केला की, “तो सध्या जिवंत आहे, शिक्षण घेतोय, कोणीही त्याला त्रास देऊ नका, असं त्याचं म्हणणं आहे.” पण त्यांनी गेधुन कुठे आहे? किंवा त्याचा सध्याचा फोटो किंवा व्हिडिओ असा कोणताच पुरावा दिला नाही.(Top Stories)

UN च्या WGEID ने गेधुन यांचा तपास २५ जून २०२४ पर्यंत सुरू ठेवला आणि त्यांनी चिनी सरकारला गेधुनच्या ठावठिकाणाची माहिती तात्काळ जाहीर करा, अशी मागणी केली. चिनी सरकारने २०१३ पासून WGEID ला तिबेटमध्ये भेट देण्याची परवानगी नाकारली आहे, ज्यामुळे गेधुनला शोधायचा स्वतंत्र तपास कधीच शक्य झाला नाही. आता काही दिवसांपूर्वीच म्हणजे १७ मे २०२५ ला, तिबेटी निर्वासित सरकार (CTA) आणि मानवाधिकार संघटनांनी गेधुन यांच्या बेपत्तेच्या ३० व्या वर्धापनदिनी जागतिक मोहीम राबवली, ज्यात त्यांनी गेधुन यांच्या सुटकेची मागणी केली. (Dalai Lama)

आज ३० वर्ष झाली तरी गेधुनच्या अस्तित्वाचं रहस्य अजूनही रहस्यच बनलंय. गेधुन खरंच चीनच्या ताब्यात जिवंत असेल का? की चीनचा बरेच वर्ष सुरू असलेला हा डाव आहे? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.