Dakshinavarti shankha : हिंदू धर्मात शंखाला अत्यंत पवित्र मानले जाते. विशेषतः दक्षिणावर्ती शंख (Dakshinavarti Shankh) याला अध्यात्म, वास्तुशास्त्र आणि आयुर्वेदातही खूप महत्त्व आहे. हा शंख सामान्य शंखासारखा नसतो. बहुतेक शंख डावीकडे वळलेले असतात (वामावर्ती), तर दक्षिणावर्ती शंख उजवीकडे वळलेला असतो. त्याच्यातून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते, म्हणूनच घरातील देवघरात याचे विशेष स्थान असते. आता या दक्षिणावर्ती शंखाचे फायदे सविस्तर पाहूया.
लक्ष्मी प्राप्तीसाठी शुभ
दक्षिणावर्ती शंखाला महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. शास्त्रांनुसार, लक्ष्मीदेवी समुद्रातून प्रकट झाली, त्याच वेळी हा शंखही प्रकट झाला. त्यामुळे ज्यांच्या घरात हा शंख देव्हाऱ्यात ठेवलेला असतो, तिथे लक्ष्मीचा वास राहतो, असा समज आहे. धन, वैभव आणि समृद्धी वाढवण्यासाठी तो अत्यंत उपयुक्त मानला जातो. व्यवसायात यश, आर्थिक स्थैर्य आणि घरात धनवृद्धीसाठी दक्षिणावर्ती शंख ठेवणे फायदेशीर ठरते.
वास्तुदोष निवारण
जर घरात वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा, भांडणं, रोग-रक्तपात, आर्थिक अडचणी, मानसिक अस्वस्थता असे काही त्रास होत असतील, तर दक्षिणावर्ती शंख ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तो घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि सकारात्मक ऊर्जा पसरवतो. दक्षिण दिशेकडे तोंड करून देव्हाऱ्यात ठेवलेला शंख विशेष प्रभावी मानला जातो. रोज त्यावर गंगा जल किंवा स्वच्छ पाणी शिंपडून पूजा केल्यास घरात शांतता आणि समाधान नांदते.

Dakshinavarti shankha
धार्मिक आणि आध्यात्मिक लाभ
दक्षिणावर्ती शंखातून मंत्रजप किंवा पूजा केल्यास सात्त्विक लहरींमध्ये वाढ होते. विशेषतः त्यावर ओंकार, विष्णू किंवा लक्ष्मी मंत्रांचा जप केल्यास मानसिक एकाग्रता वाढते. काही पंथांमध्ये त्याचा उपयोग अभिषेकासाठी सुद्धा होतो. यामुळे घरातील देवतांना प्रसन्नता मिळते आणि साधकाची आध्यात्मिक उन्नती होते. नियमित पूजा केल्यास मन शांत राहतं आणि चिंता कमी होतात.
=========
हे देखील वाचा :
Shravan : श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? पहिला श्रावणी सोमवार कधी?
Kamika Ekadshi: कामिका एकादशी एकादशीचे महत्व आणि माहिती
Deep Amavasya : ‘तिमिरातुनी तेजाकडे’ जाण्याचा संदेश देणारी दीप अमावस्या
==========
आयुर्वेदिक आणि शास्त्रीय उपयोग
आयुर्वेदात शंखापासून तयार होणाऱ्या शंख भस्माचा उपयोग पचन सुधारण्यासाठी, अॅसिडिटी, अपचन आणि अन्य पोटदुखीच्या उपचारासाठी केला जातो. याचाच अर्थ, शंखाचे केवळ धार्मिकच नव्हे तर आरोग्यदायी फायदेही आहेत. काही परंपरांमध्ये शंखाच्या पाण्याचा वापर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही होतो.(Dakshinavarti shankha)
घराच्या देव्हाऱ्यात दक्षिणावर्ती शंख ठेवणे म्हणजे शुभतेचे प्रतीक आणि समृद्धीचा स्रोत. तो केवळ धार्मिक दृष्टीनेच नाही, तर वास्तुशास्त्र आणि मानसिक शांतीसाठीही उपयुक्त आहे. मात्र हा शंख योग्य पद्धतीने ठेवणे, त्याची नित्य काळजी घेणे आणि त्याच्या माध्यमातून नित्य पूजा करणे आवश्यक असते.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
