आज सर्वत्र दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. श्रीकृष्ण जयंतीनंतर दहीहंडी साजरी केली जाते. कृष्णाला लहान असताना लोणी खूपच आवडायचे. गोकुळातील प्रत्येकाच्या घरी कृष्ण लपूनछपून जात लोणी खायचा. त्याच्यापासून आपले लोणी वाचवण्यासाठी गोपिका लोणी उंचावर ठेवत. ते उंचावरचे लोणी काढण्यासाठी कृष्ण आणि त्याचे सखा, मित्र एकमेकांच्या खांद्यावर चढायचे आणि लोणी काढून खायचे. याच गोष्टीची आठवण म्हणून दहीहंडीचा सण साजरा केला जातो. (dahihandi news)
कृष्णाला आवडणारे सर्वच पदार्थ या हंडीमध्ये भरले जातात आणि त्यावर नारळ ठेवले जाते. ही हंडी उंच बांधली जाते. त्यानंतर सुरु होते ही हंडी फोडण्याची स्पर्धा. दहीहंडीचा सण हा सर्वात जास्त मुंबई आणि ठाण्यामध्ये साजरा होतो. या ठिकाणी या खेळाला स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ८/९/१० थर रचून हंडी फोडण्याचा प्रयत्न केला जातो. आता तर सर्वात उंची दहीहंडी बांधून ती फोडण्यासाठी लाखो रुपयांचे बक्षीस देखील ठेवले जाते. या खेळाला तर साहसी खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. आज आपण दहीहंडीच्या निमित्ताने जाणून घेऊया मुंबईतील महत्वाच्या, प्रसिद्ध आणि लोकप्रिय दहीहंडी. (todays marathi headline)
ठाणे, दहीहंडी
मुंबईतील प्रसिद्ध आणि सर्वात श्रीमंत दहीहंडी मंडळामध्ये ठाण्याच्या संघर्ष प्रतिष्ठान दहीहंडी मंडळाचा समावेश होतो. या दहीहंडी स्पर्धेत लाखोंचे बक्षीस दिले जाते. विशेष म्हणजे २०१३ मध्ये दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला १.११ कोटी रुपये बक्षीस देण्यात आले होते, तर २०१४ मध्ये ५१ लाख रुपयांचा बक्षीस देण्यात आले होते. दरवर्षी या ठिकाणी लाखोंचे बक्षीस देण्यात येते. (marathi news)
वरळी, दहीहंडी
मुंबईतील प्रसिद्ध आणि मोठ्या दहीहंडीत वरळीतील जांबोरी मैदानातील दहीहंडीचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ही दहीहंडी मोठ्या उत्साहात आयोजित केली जाते. ही दहीहंदी दक्षिण मुंबईची सर्वात उंच दहीहंडी मानली जाते. या दहीहंडी उत्सवात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही सहभागी होतात. (latest marathi news)
वडाळा दहीहंडी
मुंबईतील प्रसिद्ध दहीहंडीमध्ये वडाळा दहीहंडीचा समावेश होतो. काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे या दहीहंडीचे आयोजक आहेत. या ठिकाणच्या दहीहंडी स्पर्धा प्रसिद्ध असून या स्पर्धेतील विजेत्या गोविंदा पथकाला लाखोंचे बक्षीस दिले जाते. (top marathi news)
घाटकोपर, दहीहंडी
घाटकोपर येथील दहीहंडी देखील खूप प्रसिद्ध आहे. सर्वात उंच असलेल्या दहीहंडीत घाटकोपर येथील दहीहंडीचा समावेश होतो. येथील दहीहंडी उत्सवात बॉलीवूड सेलिब्रिटी देखील सहभागी होतात. (Top trending news)
खारघर, दहीहंडी
खारघर येथील श्रमिक सार्वजनिक उत्सव मंडळाचा दहीहंडी उत्सव खूप प्रसिद्ध आहे. मोठी आणि उंचावरील ही दहीहंडी फोडणे मोठे अव्हान ठरते. बऱ्याचदा दहीहंडी न फोडताच काही गोविंदा पथक मागे फिरतात. (top stories)
==============
हे देखील वाचा : Dahihandi : जन्माष्टमीनंतर साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी सणाचे महत्व
Janmashtami : जन्माष्टमी विशेष : भारतातील प्रसिद्ध कृष्णमंदिरं
===============
लालबाग, दहीहंडी
अनेकांना लालबाग फक्त गणपती मुळेच माहीत आहे. पण, येथील दहीहंडी देखील तितकीच प्रसिद्ध आहे. पारंपारिक दहीहंडी कार्यक्रम पाहण्यासाठी लालबाग हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे बाल गोपाळ मित्र मंडळातर्फे दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यासोबतच लोअर परळमधील जय जवान मित्र मंडळाचीही दहीहंडी पाहण्यासारखी असते. या दोन्ही दहीहंडींचं वैशिष्ट्य म्हणजे सणाचं पावित्र्य राखत पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जाणारा दहीकाला. (social news)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics