डालडा संदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. असे सांगितले जाते की, पुन्हा एकदा डालडाने बाजारात एंन्ट्री केली आहे. काही व्यावसायिक रिपोर्ट्समध्ये तर याबद्दल उल्लेख ही करण्यात आला आहे की, डालडा नव्या रुपात बाजारात येणार आहे. वनस्पती तूपाच्या अधिक नुकसानीची चर्चा झाल्यानंतर डालडाचा व्यवसाय हा मंदावला होता. डालडा हा एकेकाळी सर्वांच्याच घरी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी वापरला जायचा. आता ही वापरला जातो पण त्याचा अधिक कोणीही पूर्वीसारखा वापर करतना दिसून येत नाही. मात्र बाजारातून त्याची एक्झिट कशी झाली आणि त्याचा इतिहास काय आहे याबद्दलच आपण आज अधिक जाणून घेऊयात.(Dada to Dalda History)
भारतात कशी सुरुवात झाली?
१९३० मध्ये भारतातील एका कंपनीने नव्हे तर नेदरलँन्ड मधील एका कंपनीने या डालडाची सुरुवात केली होती. त्यावेळी या ब्रँन्डचे नाव डाडा असे होते आणि ते वनस्पती तूपाचा ऑप्शन म्हणून उपलब्ध होऊ शकत होते. त्यावेळी हा हाइड्रोजेनेड वेजिटेबल ऑयलके नावाने ओळखला जात होता. डट व्यापाऱ्यांनी त्याला भारतात आणले. १९२०-१९३७ च्या दरम्यान हिंदुस्तान वनस्पती मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (आज हिंदुस्तान युनिलिवर) शिवडी मध्ये याची फॅक्ट्री सुरु केली. त्यानंतर हिंदुस्तान युनिलीवरने त्याची विक्री करण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी सुद्धा डाडा हेच नाव होते.

असे म्हटले जाते की, त्यावेळी भारतात कासिम दादा नावाच्या व्यक्तीने १९३० च्या दशकाच्या आधी एका डच कंपनीकडून स्वदेशी तूप किंवा क्लॅरिफाइड मस्का हे स्वस्त अशा ऑप्शनच्या रुपात वनस्पती तूपाची आयात करत होते. ते सुद्धा वनस्पती तूप दादा नावाने विक्री करत होते. त्यावेळी डालडाने बाजारात एकाधिकार केला आणि हिंदुस्तानात वनस्पती डालडा ऐवढा प्रसिद्ध झाला की, हाइड्रोजनेटेड वनस्पती तेलाला मुख्यकरुन वनस्पती तूपाच्या रुपाने ओळखले जाऊ लागले. मात्र त्यानंतर यामध्ये भेसळ करण्यात येत असल्याचे आरोप ही लावण्यात आले. वनस्पती तूप आरोग्यावर करणाऱ्या परिणांमुळे त्याचा विरोध सुद्धा झाला.
त्यानंतर २००० नंतर त्याच्या विक्रीत घट होऊ लागली आणि २००३ मध्ये Bunge Limited ने कथित रुपात १०० कोटी रुपयांपेक्षा कमी मध्ये हिंदुस्तान युनिलीवर लिमिडेटने डालडाचा ब्रँन्ड आपल्याकडे घेतला. तर पाकिस्तानात डालडा हा पाकिस्तानात सुद्धा विक्री केला जात होता. भारता प्रमाणेच पाकिस्तानात ही डालडा खुप प्रसिद्ध झाला होता.(Dada to Dalda History)
हे देखील वाचा- BATA कंपनी स्वत:च्याच देशात व्यवसाय करण्यास झाली फ्लॉप पण भारतात रचला इतिहास
कसे पडले नाव?
याआधी तो डाडा किंवा दादा नावाने ओळखळा जात होता. त्यानंतर यामध्ये युनिलीवरने वेगळी ओळख देण्यासाठी यामद्ये एल किंवा एल शब्द जोडण्याचा विचार केला. त्यासाठी त्याच्या नावात एल शब्द जोडून डालडा असे केले. त्यानंतर १९३७ मध्ये युनिलिवरने भारतात डालडाची सुरुवात केली.