Home » चित्रपटांना ‘बी’ ग्रेड मिळाला तरीही सिल्वर ज्युबिली वर्ल्ड रेकॉर्ड मोडणारे ‘दादा कोंडके’

चित्रपटांना ‘बी’ ग्रेड मिळाला तरीही सिल्वर ज्युबिली वर्ल्ड रेकॉर्ड मोडणारे ‘दादा कोंडके’

by Team Gajawaja
0 comment
Dada Kondake
Share

भारतातील सिनेमांना एक वेगळेपण देण्याचे काम हे दादा कोंडके (Dada Kondke) यांनी केले होते. दादा कोंडके आज ही गाणी आणि सिनेमे प्रेक्षकांकडून आवर्जुन पाहिले जातात. त्यांच्या मराठी सिनेमातील कॉमेडी असो किंवा डबल मीनिंग डायलॉग्स हे आज ही एखाद्याला उद्देशून हमखास, खुल्यापणाने बोलले जातात. त्याचसोबत दादा कोंडके यांच्या सिनेमांची नावे जरा डबल मीनिंग मधली होती पण कधीच सेंसॉरबोर्डाने त्यांच्या सिनेमांवर बंदी आणली नाही. दादांचे सिनेमे डबल मीनिंगचे असले तरीही ते पाहण्यासाठी तुफान गर्दी व्हायची. दादा कोंडके यांच्या नावावर सातत्याने सर्वाधिक सिल्वर जुबली सिनेमे दिल्याचा गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्यांचे ९ सिनेमे २५ आठड्यांपर्यंत थिएटरमध्ये चालली. यामधील काही सिनेमे तर ५० आठवडे सुद्धा चालले. त्यांचे सिनेमातील आयुष्य जेवढे हसमुख होते तेवढेच त्यांचे खासगी आयुष्य वाटाघाटी करत काढलेले होते.

लालबागच्या चाळींमध्ये दादा कोंडकेंचा बोलबाला
१९३२ च्या वर्षातील गोष्ट आहे. पुण्याजवळील एका लहान गाव इंगावली येथून काही वर्षांपूर्वी एक कुटुंब कामाच्या शोधात मुंबईत आला होता. मुंबईत त्या कुटुंबाने लालबाग मधील चाळीत आपले घर वसवले. येथील बहुतांश सदस्य हे गिरणी कामगार होते. दादा कोंडके यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी झाला आणि त्याच दिवशी गोकुळाष्टमी होती. कृष्णाच्या नावे त्यांचे सुद्धा नाव कृष्ण असे ठेवण्यात आले. याच कृष्णाने पुढे जाऊन देशात दादा कोंडके नावाने प्रसिद्धी मिळवली. एका मुलाखतीत दादा कोंडके यांनी म्हटले होते की, लालबागच्या परिसरात माझा बोलबाला होता. माझ्या गल्लीतील कोणत्याही मुलीची छेड काढण्याची कोणाची ही हिंमत व्हायची नाही. अशा लफंग्या लोकांसोबत मी भिडलो आहे.

घरातील सदस्यांचा अपघातात मृत्यू झाला, फक्त एकच भाऊ बचावला
दादा कोंडके यांच्या तरुण वयातच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा एका अपघातात मृत्यू ढाला. फक्त दादा कोंडके आणि त्यांचा मोठा भाऊ ऐवढेच जण त्यामधून बचावले गेले. या अपघातानंतर त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. ते एक वर्षभर कोणाशी ही जास्त बोलले नाही. खाणं-पिणं सुद्धा बंद केले होते. अशातच त्यांनी आपली दु:ख न कवटाळता लोकांना हसवण्याचा विचार केला. अशाप्रकारे त्यांची कॉमेडी मध्ये एन्ट्री झाली.

किराणा दुकानात नोकरी ते लोकल बँन्ड पर्यंतचा प्रवास
जेव्हा कुटुंबातील लोकांना गमावल्याच्या दु:खातून दादा कोंडके(Dada Kondke) जेव्हा पजले तेव्हा त्यांनी अपना बाजार मधील एका किराणा दुकानात काम केले. तेथे त्यांना महिन्याला ६० रुपये मिळायचे. तर लोकांचे मनोरंजन करण्यासाठी एक लोकल बँन्डचा ते हिस्सा झाले. त्यांना नंतर स्टेज शो करण्याची संधी मिळाली. दादा कोंडके यांची नाटकं संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली. त्यांच्या अभिनयाला प्रत्येक प्रेक्षक वाह वाह करु लागले होते. नंतर त्यांनी आपली थिएटर कंपनी सुरु केली.

Dada Kondke
Dada Kondke

आशा भोसले यांनी निर्मात्यांशी करुन दिली ओळख
त्यांच्या वेळी प्रसिद्ध गायिका म्हणून आशा भोसले यांच्या एक मोठा वर्ग होता. त्या मुंबईत होणाऱ्या ‘विच्छा माझी पुरी करा’ याचा प्रत्येक शो पाहण्यासाठी जायच्या. त्यांना दादांचा अभिनय ऐवढा आवडायचा की त्यांनी त्यांच्या अभिनयामुळे आनंदित होऊन त्यांची ओळख मराठी निर्माते भालजी पेंढाकर यांच्यासोबत करुन दिली.

भालाजी पेंढाकर यांनी दादा कोंडके यांना तंब्डी माती मधून १९६९ मध्ये मराठी सिनेमात एन्ट्री करण्याची संधी दिली. त्यांच्या या सिनेमाला बेस्ट मराठी फिचर फिल्मचा नॅशलन अवॉर्ड ही मिळाला. त्यानंतर १९७१ मध्ये दादांनी सोंगाड्या सिनेमा प्रोड्युस केला आणि त्यात त्यांनी स्वत: मुख्य भुमिका साकारली.

हे देखील वाचा- वडिलांचा आधार ते सिनेमा क्षेत्रातील संजू बाबाचा प्रवास, संजय दत्तच्या आयुष्यातील काही खास किस्से

मराठी सिनेमांचा हिंदीत रिमेक करण्याचा ट्रेंन्ड
मराठी सिनेमे सुपरहिट होत असल्याने दादा कोंडके यांनी ‘तेरे मेरे बीच मे’, ‘अंधेरे रात मे दीया तेरे हाथ में’, ‘आगे की सोच’ आणि ‘ले चल अपने साथ’ सारखे हिंदी सिनेमांमध्ये दिसले. यामधील अंधेरी रात में दीया तेरे हाथ मे सिनेमा अधिकच चर्चेत राहिला होता. हेच कारण होते की,, डबल मीनिंग टायटल आणि कॉमेडी डायलॉग्स. सिनेमांना अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न तर केला जायचा. पण त्यांना बी किंवी सी ग्रेड अभिनेत्याचा दर्जा दिला जात होता. यामुळेच नाराज होऊन दादा कोंडने यांनी मराठी सिनेमांचे हिंदीत रिमेक करण्याचा ट्रेंन्ड सुरु केला होता.

अभिनेते धर्मेंद्र, जितेंद्र, अमिताभ बच्चन यांच्यासारख्या बड्या कलाकारांनी सुद्धा दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या अभिनयाचे कौतुक केले होता. रेखा यांनी तर भिंगरी सिनेमात कुठे जायचे हनीमुन यावर लावणी केली आहे. त्याचसोबत यांच्या काही सिनेमांना आशा भोसले यांनी आपला आवाज दिला.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा होती
राजकरणात असताना दादा कोंडके यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत खुप चांगली मैत्री होती. जेव्हा ८० च्या दशकात शिवसेना पुन्हा सरकार स्थापन करणार होती तेव्हा दादांना अपेक्षा होती की, त्यांना आमदाराचे तिकिट मिळेल. पण त्यांच्या हाती निराशा आली. त्यांनी एका मुलाखतीत त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.