Home » Dada Kondke : चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व-दादा कोंडके

Dada Kondke : चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व-दादा कोंडके

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dada Kondke
Share

आज संपूर्ण जगामध्ये मराठी चित्रपटांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. मराठी चित्रपटांचे विषय, दिग्दर्शन, अभिनय आदी सर्वच गोष्टींमध्ये मराठी सिनेमे उजवे ठरतात. आज आपल्या मराठीला, मराठी चित्रपटांना जागतिक ओळख मिळवून देण्यामागे अनेक लोकांचा मोठा वाटा आहे. हे वाचताना तुमच्या डोक्यात जेवढ्या मराठी कलाकारांची, दिग्दर्शकांची, लेखकांची आदी जेवढी नावे येत असतील तेवढ्या सर्वच लोकांनी मराठी चित्रपटाला आपापल्यापरीने पुढे नेण्यात हातभार लावला आहे. मात्र मराठी सिनेमे म्हटले की, एक नाव आजही सहज डोक्यात येते ते म्हणजे दादा कोंडके. (Dada Kondke News)

साधारण रूप, उंची जेमतेम, मोठा आवाज मात्र अभूतपूर्व प्रतिभा. दादा कोंडके यांचा कोणताही सिनेमे पाहा त्यांचा लूक सेमच. डोक्यावर टॉप, अंगात एक सदरा हाल्फ पॅन्ट आणि पॅन्टची नाडी कायम बाहेर आलेली. बस इतका साधा आणि सहज लूक त्यांचा होता. दादा कोंडके यांचे सिनेमे म्हणजे निखळ आनंद आणि पोट दुखेपर्यंत हसू. दादा यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शन आणि निर्मितीमध्ये देखील अफाट नाव कमावले. आज दादा कोंडके जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते कायम सोबत आहेत आणि राहतील. अशा या दादा कोंडके यांची आज जयंती. यानिमित्ताने जाणून घेऊया दादा कोंडके यांच्या जीवनप्रवासाबद्दल. (Marathi News)

कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी नायगांव, मुंबईत झाला. गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्म झाल्यामुळे त्यांचे नाव कृष्णा ठेवण्यात आले. त्यांना आजूबाजूचे लोकं ‘दादा’ म्हणून हाक मारू लागले. जेष्ठ बंधूंच्या अकाली निधनामुळे त्यांच्यावर घर सांभाळायची जबाबदारी आली. त्यामुळे त्यांनी ‘अपना बाजार’ मध्ये दरमहा साठ रुपयाने कामावर नोकरी करण्यास सुरुवात केली. दादा सेवादलाच्या बँडमध्ये काम करू लागले. प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी लिहिणे, त्यांना चाली लावणे हे काम ते फावल्या वेळेत करू लागले. सेवादलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी झाली आणि सेवादलाच्या नाटकांत दादा छोटी-मोठी कामे करू लागले. दादा कोंडके यांनी ‘दादा कोंडके आणि पार्टी’ नावाचे एक कला पथक काढले. (Todays Marathi Headline)

=========

हे देखील वाचा : Spirituality : लक्ष्मीचे रूप समजल्या जाणाऱ्या एकाक्षी नारळाची रंजक माहिती

===========

Dada Kondke

यादरम्यानच दादा कोंडके लेखक वसंत सबनिसांच्या संपर्कात आले. नाटक कंपनी उघडल्यानंतर त्यांनी वसंत सबनिसांना नाटकाचे लेखन करण्याची विनंती केली. वसंत सबनिसांनी दादांच्या ‘खणखणपूरचा राजा’ या नाटकाचा प्रयोग आधीच पाहिला होता, त्यामुळे त्यांना दादांच्या अभिनयाने प्रभावित केलेच होते. पुढे सबनिसांनी लिहिलेल्या ‘विच्छा माझी पुरी करा’ ह्या नाटकाने दादांना रंगभूमीवरील सुपरस्टार अभिनेता बनवले. दादांनी या नाटकाचे सुमारे १५०० च्या वर प्रयोग केले. त्यानंतर पुढे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. (Entertainment News)

आशा भोसले यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. दादा बेधडकपणे त्यांचे संवाद बोलायचे मात्र ते चुकीच्या ठिकाणी थांबत असल्यामुळे त्यातून विनोदाची निर्मिती व्हायची आणि एकच हशा पिकायचा. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ ह्या चित्रपटातून दादांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर मात्र दादांनी मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या सोंगाड्या- १९७१ ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. ‘सोंगाड्या’ ही त्यांची प्रथम निर्मिती होती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. (Top Marathi Stories)

१९७२ साली ‘एकटा जीव सदाशिव’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाची लोकांमध्ये एवढी क्रेझ होती की, सांगितले जाते की, खुद्द राज कपूरने त्यांच्या ‘बॉबी’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आणि तो सिनेमा पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. ‘आंधळा मारतो डोळा’ने पुन्हा दादा कोंडकें अफाट गाजले. १९७५ मध्ये ‘पांडू हवालदार’ सिनेमाने तर दादांना लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. पांडू हवालदार मध्ये दादांनी ‘अशोक सराफ’ यांना देखील संधी दिली आणि अशोक मामांनी देखील त्याचे सोने केले. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या ह्या चित्रपटानंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन दादांनी लावली. दादा कोंडके यांनी स्वतःच्या कामाक्षी प्रॉडक्शन ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रदर्शित केले. (Top Marathi Headline)

१९७१ ते ९७ या २६ वर्षांच्या कालखंडात, दादा कोंडके सतत नवनवीन चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. आपल्या गावंढळ व्यक्तिमत्वाने दादांनी उभ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. दादांच्या चित्रपटांमुळे पूर्णत: डबघाईस आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला त्या काळात नवसंजीवनी मिळाली. बॉलिवूड कलाकारांमध्येही दादा कोंडके खूप लोकप्रिय होते. अभिनेत्री उषा चव्हाण यांच्यासोबत दादांची जोडी विशेष गाजली. याशिवाय त्यांच्या चित्रपटांत आईचे पात्र निभावणाऱ्या रत्नमालाबाई, संगीतकार राम-लक्ष्मण, पार्श्व गायनासाठी महेंद्र कपूर यांचा आवाज आदी घटकही तितकेच लोकप्रिय ठरले. (Latest Marathi Headline)

Dada Kondke

दादांनी नेहमी एकाच टीमसोबत काम केलं. त्यांच्या सिनेमांत अभिनेते, तंत्रज्ञ आणि पार्श्वगायकांची टीम कधीच बदलली नाही. त्यांच्या यशात टीमचा फार मोठा वाटा असल्याचं ते अनेकदा म्हणायचे. दादा कोंडके नऊ चित्रपट चित्रपटगृहात सलग २५ आठवडे चालू होते. या नऊ चित्रपटांसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही प्रवेश केला. (Top Marathi Headline) 

दादा कोंडके यांच्या ‘सोंगाड्या’ या चित्रपटासंबंधीचा वाद तुफान गाजला. ‘सोंगाड्या’ ही त्यांची निर्माता म्हणून पहिली कलाकृती होती. वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या कथेवर गोविंद कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केले होते. दादरच्या कोहिनूर थिएटरच्या मालकाने कोंडके यांनी चार आठवडे आधी थिएटर बुक करूनही देव आनंदचा ‘तीन देवियां’ प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दादा कोंडके यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. काही वेळातच शिवसैनिक जमा झाले आणि त्यांनी चित्रपटगृहाबाहेर निदर्शने सुरू केली. अखेरीस ‘सोंगाड्या’ कोहिनूरमध्ये प्रदर्शित झाला आणि तो खूप गाजला. (Top Trending News)

दादांनी त्यांच्या आयुष्यात अफाट लोकप्रियता आणि प्रसिद्धी कमावली. मात्र त्यांचे आयुष्य कायम विवादीतच राहिले. एकत्र त्यांच्या चित्रपटांमध्ये असलेले डबल मिनिंग संवाद बाबी अभिनेत्रींशी त्यांची गरजेपेक्षा जास्त होणारी लगड अनेकांना जास्त आवडली नाही. दादांचे वैयक्तिक आयुष्य देखील वादग्रस्त राहिले. त्यांनी नलिनी नावाच्या महिलेशी लग्न केले होते आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या याचिकेत नलिनी यांनी म्हटले होते की दादा आणि तिने कधीही लग्न केले नव्हते आणि १९६७ पासून तिचा त्यांच्याशी कोणताही संपर्क नव्हता. तिला तेजस्विनी नावाची मुलगी होती जिचा जन्म १९६९ मध्ये झाला होता. अनेकांच्या मते तेजस्विनी दादाची मुलगी नव्हती तर काहींच्या मते ती दादाची मुलगी होती पण त्यांनी हयातीत तिचा स्वीकार केला नाही. (Top Marathi News)

१४ मार्च १९९८ रोजी पहाटे मुंबई येथील रामा निवास या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने सुश्रुषा नर्सिंग होममध्ये नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. दादांचा मृत्यू झाला तेव्हा ते उषा चव्हाण यांच्यासोबत ‘जरा धीर धरा’ सिनेमात काम करत होते. त्यांच्या मृत्यूच्या बाबतीत नेहमीच संभ्रम राहिला आहे. दादांच्या मृत्यूच्या काही महिन्यांनंतर समोर आले की, सुश्रुषा येथील डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला पण तेव्हा अचानकपणे दादा कोंडके यांना घरी आणण्यात आले होते. मात्र असे का करण्यात आले आजही अनुत्तरीतच आहे. (Latest Marathi News)

=========

हे देखील वाचा : Narali Purnima : जाणून घ्या नारळी पौर्णिमा सणाचे महत्व

Rakshabandhan : भावा बहिणीचे प्रेमळ नाते अधोरेखित करणारे ‘रक्षाबंधन’

===========

दादा कोंडके यांच्या मृत्यूनंतर ही त्यांची संपत्तीच्या वाटणीवरून मोठे वाद झाले. दादांनी मृत्युपत्रात आपली संपत्तीची कार्यवाह म्हणून एक संस्था स्थापन करायला सांगितले होते. विश्वस्त म्हणून उषा चव्हाण, डॉ. अनिल वाकणकर, साबीर शेख, गजानन शिर्के व वसंत भालेकरांचा समावेश होता. पुढे दादांच्या वारसांनी त्यांच्या मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले व त्यांची सर्व संपत्ती वादग्रस्त ठरली. (Top Stories)

दरम्यान दादांनी १९७२ – एकटा जीव सदाशिव, १९७३ – आंधळा मारतो डोळा, १९७५ – पांडू हवालदार, १९७६ – तुमचं आमचं जमलं, १९७७ – राम राम गंगाराम, १९७८ – बोटं लावीन तेथे गुदगुल्या, १९८० – ह्योच नवरा पाहिजे, १९८७ – आली अंगावर, १९८८ – मुका घ्या मुका, १९९० -पळवा पळवी, १९९२- येऊ का घरात, १९९४ – सासरचे धोतर आदी अणे ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.