उद्योग जगतासह देशासाठी अत्यंत दु:खद घटना सध्या घडली आहे. कारण टाटा सन्सचे माजी चेअरमन साइरस मिस्री यांचे रविवारी एका रस्ते अपघातात निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. मात्र एक काळ असा होता की, साइरस मिस्री हे रतन टाटा (Cyrus Mistry- Ratan Tata) यांचे निकटवर्तीय होते. सर्वात प्रथम सायरस मिस्री यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांची आई पेट पेरिन डबास या आयरलँन्ड येथे राहणाऱ्या होत्या. १९९३ मध्ये आयरलँन्डच्या डबलिनमध्ये त्यांचा जन्म झाला. पेट पेरिन डबास यांच्या लग्नानंतर पलोनजी मिस्री सुद्धा आयरिश नागरिक झाले होते. त्यांना दोन मुलं आणि दोन मुली झाल्या.
पलोनजी शापूरजी यांच्या दोन्ही मुलांचे नाव शापूर मिस्री आणि साइरस मिस्री असे ठेवण्यात आले. तर मुली लैला आणि अल्लू. पलोनजी यांची मुलगी अल्लू हिचा विवाह नोएल टाटा यांच्यासोबत झाला. अशाप्रकारे टाटा आणि मिस्री परिवाराचे नातेसंबंध जोडले गेले. तर नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत.
म्हणजेच बहिण अल्लू हिचा नवरा नोएल टाटा हे नात्याने साइरस मिस्री यांचे भावोजी झाले. अशाप्रकारे नोएल यांचे सावत्र भाऊ रतन टाटा सुद्धा त्यांचे भावोजी झाले. म्हणजेच साइरस मित्री हे रतन टाटा यांच्यासोबतचे संबंध अगदी परिवारातील खास व्यक्तीप्रमाणे होते. तर वडिलांप्रमाणेच साइरस मिस्री यांच्याजवळ सुद्धा आयरलँन्डची नागरिकता होती. मात्र त्यांनी लग्न हे भारतात केले. देशाच्या प्रमुख वकिलांपैकी एक असलेले इकबाल छागला यांची मुलगी रोहिका छागला हिच्यासोबत त्यांनी विवाह केला होता. साइरस यांना दोन मुलं आहेत.(Cyrus Mistry- Ratan Tata)
हे देखील वाचा- या लोकप्रिय राजकीय नेत्यांचा झाला होता अपघाती मृत्यू
खरंतर साइर पालोनजी मिस्री यांना २८ सप्टेंबर, २०१२ मध्ये टाटाचे चेअरमन पद दिले गेले. मिस्री यांनी सहाव्या चेअरमन पदी ग्रुपचा कारभार सांभाळला होता. तर मिस्री यांना पदावरुन हटवल्यानंतर टाटा ग्रुपने असे म्हटले होते की, बोर्डने आपल्या एकमताने आणि टाटा ट्रस्टच्या शेअरहोल्डर्सच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतला आहे. टाटा सन्स आणि टाटा ग्रुपच्या उत्तम भवितव्यासाठी हा बदल करणे गरजेचे होते. जेव्हा मिस्री यांना हटववण्यात आले तेव्हा टाटा सन्सचे १८.५ टक्के शेअर्स हे याच परिवाराकडे होते. त्यामुळेच ते मोठे शेअरहोल्डर्स होते.