मोहाली मध्ये एका खासगी युनिव्हर्सिटीमध्ये कथित रुपात खासगी व्हिडिओ लीक केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपी विद्यार्थीनी आणि त्याच्या मित्रासह एकूण तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून महिलांच्या विरोधातील सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वर्ष २०२१ मध्ये देशभरात महिलांच्या विरोधात सायबर गुन्ह्यांमध्ये २५९७ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. ऐवढेच नव्हे तर गेल्या पाच वर्षात अशा अपराधांची संख्या चौपटीने वाढली आहे. (Cyber crimes against women)
५ वर्षात ४ पट सायबर गुन्ह्यांची नोंद
तंत्रज्ञानाच्या बदलत्या सुविधांसह सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पाच वर्षापूर्वी २०१७ मध्ये ६०० प्रकरणे दाखल केली होती. गेल्या पाच वर्षात अशा प्रकारचे एकूण ८९९६ प्रकरणे दाखल करण्यात आली. वर्ष २०२१ मध्ये महिलांच्या विरोधात सायबर गुन्ह्यांमधअये २५९७ प्रकरणे दाखल केली होती. पाच वर्षात या अपराधांची संख्या चौपटीने वाढली आहे.
उडिसा आणि आसाममध्ये सर्वाधिक प्रकरणे
राज्याच्या आकडेवारीनुसार असे कळले की, गेल्या ५ वर्षात महिलांच्या विरोधात सायबर गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रकरणे ओडिसा (१७१२) दाखल करण्यात आली. त्यानंतर आसाम (१६२०), उत्तर प्रदेशात (९५१), कर्नाटक (४७०), आणि केरळात (४४७). त्यानंतर २०२१ या वर्षात ओडिसा (५६५), आसाम (४३२), उत्तर प्रदेश (२७६), कर्नाटक (१७२) आणि केरळात (१७७) महिलांच्या विरोधात सायबर गुन्हे सर्वाधिक दाखल करण्यात आले आहेत.(Cyber crimes against women)
हे देखील वाचा- व्यक्तीची ४३ वर्षात ५३ लग्न, कारण ऐकून व्हाल हैराण
दरम्यान, यापूर्वी सुद्धा जेव्हा देशात लॉकडाऊन लावण्यात आला होता तेव्हा ही महिलांच्या विरोधातील सायबर गुन्हे घडले होते. त्यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल मध्ये सायबर गुन्हे ५४ तर मार्च मध्ये ३७ आणि फेब्रुवारी मध्ये २१ तक्रारी समोर आल्या होत्या. खरतंर त्या वेळी महिलांच्या मोबाईल एखादी लिंक पाठवून त्यामध्ये सर्व खासगी माहिती मागवून घेत हे प्रकार करण्यात आले होते.
तर गुन्हे जरी वाढत असले तरीही कायदा हा सर्वांसाठी समान असतो. गुन्ह्या केल्यानंतर सर्वांनाच एक सारखीच शिक्षा होते. भारतीय कायद्यानुसार महिलांना सुद्धा एखाद्या गुन्ह्यात अपराधी ठरवता येते. Rare of rarest केल्यानंतर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा मिळू शकते. महिलांच्या विरोधात होणाऱ्या गुन्ह्यांचा भारती दंड संहितेत वेगळ्या पद्धतीने उल्लेख करण्यात आला आहे.