आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या घरात स्वयंपाक कढीपत्त्याशिवाय कधीच पूर्ण होत नाही. शक्य तितक्या पदार्थांमध्ये कढीपत्ता घातला जातो. फोडणीमध्ये कढीपत्ता घातल्यानांतर येणार आवाज आणि सुटणार सुवास म्हणजे भूक द्विगुणित करणारा असतो. काहींना पदार्थांमध्ये कढीपत्ता घालायचा असतो, घातलेला चालतो मात्र तो ते खात नाही. कढीपत्त्याचा पदार्थला येणारा वासच त्यांच्यासाठी पुरेसा असतो. त्यामुळे असे लोकं जेवताना पदार्थांमधला कढीपत्ता बाजूला काढून ठेवतात. कोथिंबीरसोबत कायम फ्री येणाऱ्या या कढीपत्त्याचे महत्व खूप जास्त आहे. (Curry Leaves)
आपल्याकडे कायमच असे पाहिले गेले आहे की, फ्री येणाऱ्या वस्तूंची आपल्याला जास्त किंमत नसते. त्या वस्तू आपण कशाही वापरतो, खराब करतो, वेळ आली तर फेकूनही देतो. कढीपत्त्याच्या बाबतीतही असेच अनेकदा घडताना दिसते. तुमच्याही घरात जर असेच होत असेल तर हा लेक नक्कीच तुमच्यासाठी आहे. कढीपत्ता जरी फ्रीमध्ये येत असला तरी हा तुमचे लाखो रुपये वाचवू शकतो. (Top Stories)
कढीपत्ता हा शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट गुण असणारा हेल्दी पदार्थ आहे. कढीपत्त्याचे सेवन करणे हे कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर सारख्या मोठ्या आजारांवर गुणकारी आहे. यामध्ये कॉपर, मिनरल्स, कॅल्शियम, फास्फोरस, फायबर कार्बोहायड्रेट मॅग्नेशियम आणि लोह सारख्या पोषकतत्वांनी समृद्ध असते. त्यामुळे कढीपत्त्यामधून शरीराला असंख्य फायदे मिळतात. कढीपत्ता खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक आहे. याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. कोणते जाणून घेऊया.(Marathi News)
शरीर थंड राहते
कढीपत्ता हा थंड आहे. उन्हाळ्यात याचे सेवन केल्यास शरीर थंड राहण्यास मदत होते. रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन केले तर गॅस, ऍसिडिटी, पचनाच्या सर्व समस्या दूर होतात.
कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते
कढीपत्ता खाल्ल्यावर घाणेरडा कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतो. तसेच हृदयाशी संबंधित आजारही दूर होतात. जर शरीरात घाणेरड्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते.
डायबिटिज कंट्रोलमध्ये राहतो
ब्लड शुगर कायमच जास्त असेल तर सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन करावे. कढीपत्त्याचे सेवन केल्यावर शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. (Latest Marathi News)
वजन कमी होते
कढीपत्त्याचे सेवन केल्यावर वजन कमी होण्यास मदत होते. एका अभ्यासानुसार, कढीपत्त्यामध्ये गायक्लोरोमेथेन, एथिल एसीटेट सारखे घटक आहेत. जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
त्वचा आणि केस सुधारतात
कढीपत्त्याची पेस्ट स्किनवर लावल्यास त्वचा अतिशय तजेलदार होते. चेहऱ्यावरील पिंपल्स देखील कमी होतात. तसेच कढीपत्त्याचा वापर हेअर मास्क म्हणून देखील करू शकतो. यामुळे केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होऊन केस सिल्की होतात आणि चकाकतात.
डोळ्यांसाठी फायदेशीर
दृष्टी सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए खूप महत्वाचे आहे. कढीपत्त्यामध्ये विटामिन ए मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. कढीपत्त्याच्या सेवनाने मोतीबिंदूपासून आराम मिळतो. (Top Marathi Headlines)
यकृतासाठी फायदेशीर
अल्कोहोल, तेलकट अन्न, जंक फूड यांच्या अधिक सेवनामुळे यकृत खराब होते. यकृतावर अनावश्यक चरबी वाढते. कढीपत्ता यकृतासाठी फायदेशीर आहे. एका संशोधनानुसार, कढीपत्ता खाल्ल्याने यकृत कोणत्याही प्रकारच्या ऑक्सिडेटिव्ह तणावापासून दूर राहू शकते. हे यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यकृत निरोगी ठेवण्याचे काम करतात.
सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम
सर्दी, खोकला, कफ, छातीत रक्तसंचय होत असेल आणि सायनुसायटिसची समस्या कायम असेल तर यात कढीपत्ता खूप आराम देतो. छातीत जमा झालेला कफ बाहेर काढण्याचे काम कढीपत्ता करतो. कॅम्पफेरॉल, व्हिटॅमिन सी आणि ए चे संयुग, त्यात दाहक-विरोधी घटक असतात. हे छातीला आराम देण्याचे काम करते. (Todays Marathi News)
मॉर्निंग सिकनेसपासून आराम
अनेकांना सकाळी उठल्यावर मरगळ किंवा भोवळ येते. अशावेळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यास मॉर्निंग सिकनेस कमी होतो. तसेच सकाळचा थकवा जाऊन तुम्ही फ्रेश फील करतात.
हृदयाचे आरोग्य सुधारते
कढीपत्त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आणि फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल यामुळे कमी होते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. (Latest Marathi Headline)
==========
हे देखील वाचा : Vitamin D : उन्हाळ्यात व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी खा हे पदार्थ, रहाल तंदुरुस्त
==========
पचन समस्येवर गुणकारी
कढीपत्त्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. रिकाम्या पोटी सकाळी कढीपत्ता खाल्ल्याने पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठते सारख्या समस्यांपासून आराम मिळतो कढीपत्ता खाल्ल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास कमी होतो.
कसे करा कढीपत्त्याचे सेवन
कढीपत्त्याची पाच ते सहा पाने सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने त्याचा फायदा होतो. एक ते दोन महिने सतत याचे सेवन केल्याने त्याचे फायदे तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला चवीला हे कडू वाटत असेल तर एक ग्लास पाण्यात सोबत देखील ही पाने खाऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी किंवा उपाशी तोंडी कढीपत्ता चावून खाऊ शकता. मीठ कमी आणि पोटॅशियम जास्त असलेला कढीपत्ता उच्च रक्तदाबाच्या उपचारांसाठी खूप औषधी व प्रभावी असल्याचे जाणकार सांगतात. (Social Update)
टीप: जास्त प्रमाणात कढीपत्ता खाल्ल्यास पोटात दुखणे किंवा गॅस होऊ शकतो.
(कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या )