होम मिनिस्टर या लोकप्रिय कार्यक्रमाने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन सन्मान केला आहे. या कार्यक्रमाचं नवीन पर्व ‘महामिनिस्टर’ची नुकतीच घोषणा झाली आणि प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
कारण या पर्वात आदेश भाऊजी चक्क ११ लाखांची पैठणी महाविजेत्या वहिनीला देणार आहेत. या ११ लाखांच्या पैठणीची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात आहे.
====
हे देखील वाचा: किचन कल्लाकारच्या किचनमध्ये तू तेव्हा तशी मालिकेच्या कलाकारांचा कल्ला
====
याबद्दल आदेश बांदेकर यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले, “होम मिनिस्टर या कार्यक्रमाने १८ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं. या १८ वर्षांच्या प्रवासात कुठेही खंड पडला नाही.
लॉकडाऊनमध्ये देखील होम मिनिस्टरने घरच्या घरी वहिनींना पैठणीचा मान दिला आणि यावर्षी महामिनिस्टरच्या रूपाने एक महास्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. महाराष्ट्रभर हा पैठणीचा खेळ रंगेल आणि ११ लाखांची पैठणी जिंकण्याची चुरस रंगेल.
====
हे देखील वाचा: मराठमोळ्या संदीपचा कॅनडामध्ये डंका
====
हि ११ लाखांची पैठणी कशी असेल हि पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांप्रमाणेच मला देखील आहे, त्यामुळे महामिनिस्टर या नवीन पर्वासाठी मी देखील खूप उत्सुक आहे. “महामिनिस्टर हे नवीन पर्व पाहायला विसरू नका ११ एप्रिल पासून सोमवार ते रविवार संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.