Curd side effects- उन्हाळ्यात अगदी थंडगार आणि पोटात पचेल अश्या गोष्टी खाणे आपण पसंद करतो. अशातच दही सुद्धा उन्हाळ्यात खुप प्रमाणात खाल्ले जाते. कारण दह्यात असलेले बॅक्टेरिया ह जे पाचनक्रिया सुरळीत करतात. दह्याची आणखी एक उत्तम बाब अशी की, शरिरातील अन्य खाद्य पदार्थांमधील पोषक तत्वे अवशोषित करण्यास ही मदत करतात. यामध्ये असलेले विटामिन्स आणि खनिज रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. यामुळेच त्याचे भरपूर प्रमाणात सेवन भारतात केले जाते. दह्यात मोठ्या प्रमाणात पोषण तत्व असतात याबद्दल वादच नाही पण त्या सोबत काही गोष्टी खाणे हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. तर जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी या दह्यासोबत खाऊ नयेत.
-मासे
मासे खात असाल तर नेहमीच लक्षात ठेवा दही त्यावेळी खाणे टाळा. कारण या दोन्ही गोष्टी प्रोटीनयुक्त असतात. पण एका संशोधनानुसार, दोन विविध प्रोटीन एकत्रित खाल्ल्यास शरिरात ते पचणे मुश्किल होतात. त्यामुळे पोटासंदर्भातील विकार सुरु होऊ शकतात.
-तेलकट पदार्थ
जेव्हा आपण पराठे, भटुरे, पुरी सारखे तेलकट पदार्थ खातो तेव्हा आपली पाचक्रिया हळू होते. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवस आळसावलेले वाटते. याच कारणामुळे नेहमीच सल्ला दिला जातो की, कधीच दही आणि तेलकट पदार्थ एकत्रित खाऊ नयेत.
हे देखील वाचा- औषधांसह कधीच ‘या’ गोष्टींचे सेवन करु नका अन्यथा होईल नुकसान

-आंबा
आंबा हा गरम फळ तर दही थंड असते. परंतु तुम्ही या दोन्ही गोष्टी एकत्रित खाल्ल्यास तुमची पाचनक्रिया असंतुलित होतो. त्यामुळे त्वचेसंबंधित समस्या सुरु होऊ शकतात. या दोन्ही गोष्टी एकत्रित खाल्ल्यास तुमच्या शरिरात टॉक्सिन्स निर्माण होतात.
-कांदा
आंब्याप्रमाणेच कांदा सुद्धा गरम असतो. अशातच तुम्ही कांद्यासोबत दहीचे सेवन केल्यास एक्जेमा आणि सोरोसिस सारख्या त्वचेचे इंन्फेक्शन होण्याची शक्यता असते.(Curd side effects)
-दूध
दूध आणि दही यामध्ये जरी एकच घटक असला तरीही ते एकत्रित खाऊ नयेत. कारण दूध आणि दही एकत्रित खाल्ल्यास गॅस, अॅसिडिटी, छातीत जळजळणे किंवा पोट फुगणे अशा समस्या उद्भवू शकतात. या दोन्ही गोष्टींमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते पण एकानंतर एक खाल्ल्यानंतर तुमच्या शरिराची पाचन क्रिया ही हळूहळू होते.
दही खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीऱ असतेच. पण त्याचे अधिक प्रमाणात सेवन करणे हे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. खासकरुन जेव्हा तुम्हाला सर्दी-खोकला झाला असतो तेव्हा रात्री-संध्याकाळी दह्याचे सेवन केल्याने तुमची समस्या अधिक वाढू शकते. ऐवढेच नव्हे तर ज्या लोकांना दुधाची अॅलर्जी असते त्यांनी सुद्धा दररोज दही खाऊ नये. अशातच तुम्ही ते खाल्ल्यास तुम्हाला त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. जसे की, सूज येणे, जळजळ होणे. लठ्ठपणा किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांनी सुद्धा दह्यात साखर टाकून खाऊ नये कारण त्यांची समस्या अधिक वाढू शकते. परंतु काही स्थितीत दह्याचे सेवन करणे हे योग्य असते. त्यामुळे जर तुम्हाला दह्यासंबंधित काही अॅलर्जी किंवा समस्या असतील तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.