Home » पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारतातील मंदिरांच्या पुनरुज्जीवनाचे धडे

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारतातील मंदिरांच्या पुनरुज्जीवनाचे धडे

by Team Gajawaja
0 comment
Cultural Awakening
Share

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या आधी अयोध्येतील सरयू नदीच्या काठी आरती केली होती. तर ही आरती रामाला सपर्मित करण्यात आली होती. त्यानंतर पीएम मोदी यांनी केदारनाथ आणि बंद्रीनाथ येथे सुद्धा पूजा केल्याचे दिसून आले. येथे मुख्य बाब अशी की, नरेंद्र मोदी यांनी एकामागून एक भारतातील मंदिरांना भेटी देत आहेत. यामागे निवडणूकीचा मुद्दा असूच शकतो. मात्र भारताची संस्कृती आणि धर्मांची ओळख कायम राखून ठेवली जाईल यासाठी सुद्धा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. (Cultural Awakening)

तर २०१४ मध्ये जेव्हा पीएम मोदी नरेंद्र मोदी यांनी आपला प्रवास सुरु केला होता तेव्हा त्यांना वाराणसीच्या घाटावर गंगा आरती केली होती. त्यानंतर पीएम मोदी यांनी सातत्याने भारतातील ऐतिहासिक मंदिरांची डागडुजी करण्याकडे अधिक भर दिला. जेणेकरुन भारतात पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल. यापेक्षा अधिक म्हणजे समाजात या संस्कृतीची पायामुळं अधिक घट्ट रोवली जातील.

राम मंदिरची उभारणी
पीएम मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येत ५ ऑगस्ट २०२० मध्ये भुमीपूजन केले होते. त्या दरम्यान कोरोनाचा काळ होताच. पण तरीही मोदी यांनी राम मंदिरात रामलल्लांचे आगमन व्हावे यासाठी ती पूजा केली. अयोध्या मंदिरासंदर्भातील प्रकरणाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून दिला गेला. त्यानंतर मोदी हे मंदिरांची संस्कृती जपण्यामागील एक नवा चेहरा म्हणून समोर आले. गेल्या ८ वर्षात मोदी यांनी देशातील विविध मंदिरांची पुर्ननिर्मिती करण्याकडे अधिक भर दिला आहे.

Cultural Awakening
Cultural Awakening

त्याआधी मोदींनी उज्जैन मधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा कायापालट केला होता. यासाठी भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन ही करण्यात आले होते. त्यावेळी मोदींनी असे म्हटले होते की, यामधून सनातन धर्म आणि धार्मिक उर्जा ही आता येथे कायम टिकून राहिल.

तसेच जून २०२२ मध्ये मोदींनी गुजरात मधील पावागढ हिल येथे भेट दिली होती. तेथे त्यांनी कालिका मातेच्या मंदिराच्या उभारणीसाठी पायाभरणी केली होती. तर आता एका दशकानंतर हे मंदिर पूर्णपणे उभारले गेल्याने आता आपली मान अधिक उंचावली गेल्याचे ही मोदींनी म्हटले होते. त्याचसोबत या वर्षाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१६ फूट उंच अशा भक्त संत रामानुचार्यांचा पुतळा हैदराबाद मध्ये उभारला. (Cultural Awakening)

हे देखील वाचा- नोटांवर गणपती-लक्ष्मीचा मोदी सरकारने फोटो लावावा, अरविंद केजरीवाल यांचे अपील

२०२१ मध्ये मोदींनी काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन केले होते. तर मुशल शासक औरंगजेबाकडून पाडण्यात आलेले अहिल्याबाई होळकर यांच्या मंदिराची सुद्धा पुन्हा निर्मिती करण्यात आली होती. २०१७ मध्ये नरेंद्र मोदींनी ११२ फूट उंच अशा आदियोगी शंकराचा पुतळा कोइंबंटुर येथे उभारला. त्याचसोबत २०१३ मध्ये केदारनाथ धामला पुरामुळे फटका बसल्यानंतर त्याची पुन्हा मोदींच्या सरकारमध्ये डागडुजी करण्यात आली. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की, मोदी यांनी २०१८ मध्ये अबु धाबी मध्ये पहिलेच हिंदू मंदिराचे उद्घाटन केले होते. त्याच्या एका वर्षानंतर बहरिन मधील २०० वर्ष जुन्या अशा भगवान कृष्णाच्या मंदिराच्या पुर्ननिर्मितीसाठी त्यांनी $4.2 मिलियनचा खर्च केला होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.