Home » Cryptocurrency मध्ये गुंतवणूक करत असाल तर व्हा सावध, अॅपच्या माध्यमातून अशा पद्धतीने होतेय नागरिकांची फसवणूक

Cryptocurrency मध्ये गुंतवणूक करत असाल तर व्हा सावध, अॅपच्या माध्यमातून अशा पद्धतीने होतेय नागरिकांची फसवणूक

by Team Gajawaja
0 comment
Cryptocurrency
Share

जुलै ते सप्टेंबर पर्यंत मुंबईतील अंधेरीत राहणाऱ्या एका व्यक्तीने एका अॅपमध्ये पैशांची गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्याने सुरुवातीला ४ हजार आणि नंतर ४० हजारापर्यंत ही गुंतवणूक केली असता त्याला सांगण्यात आले की, त्याला २०-२५ टक्क्यांनी व्याज मिळेल. त्याने पाहिले की, त्याच्या खात्यातील रक्कम सुद्धा वाढत चालली आहे. त्यामुळे त्याने आणखी अधिक पैसे त्यात गुंतवण्यास सुरुवात केली. मात्र तो आता आपल्या बायकोच्या नावे गुंतवणूक करणार होता, पण थांबला आणि त्यामुळे अधिक पैसे त्यांचे गेले नाहीत. (Cryptocurrency)

खुप जणांचे डुबले पैसे
सध्या त्या व्यक्तीचे ६ लाख रुपये डुबले आणि आता त्याला पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यांच्याप्रमाणेच भारतात जवळजवळ २० हजार लोक अशी आहेत ज्यांना एका व्यक्तीने असे सांगून फोन केला होता की, तो युएस मधील असून रोबोट आणि क्रिप्टोकरेंसीच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास त्यांना उत्तम रिटर्न्स मिळतील.

यामुळे बहुतांश जणांनी त्यात लाखो रुपयांची गुंतवणूक केली. पण सप्टेंबर संपण्यानंतर त्या कंपनीने अॅप बंद केले आणि त्यांचे जेवढे सुद्धा पैसे होते ते डुबले. यांच्यासारखी आणखी काही माणसे आहेत त्यांचे लाखो रुपये डुबले आहेत.

cryptocurrency
cryptocurrency

ECE लिमिटेड असे क्रिप्टो ट्रेडिंगचे नाव होते. ज्यामध्ये हजारो लोकांनी कोटी रुपयांची गुंतवणूक केली. काही महिने गुंतवणूक केल्यानंतर तो अॅपच प्ले स्टोरमधून गायब झालाच पण त्याने २६ सप्टेंबर पासून काम करणे सुद्धा बंद केले. पीडितांनी फक्त आपलेच नव्हे तर आपल्या नातेवाईकांना सुद्धा त्यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितली होती.

एका तरुणीने आणि तिच्या परिवारातील लोकांनी ८ लाखांहून अधिक रुपयांची गुंतवणूक त्या अॅपच्या माध्यमातून केली होती. मात्र आता ते जेव्हा अॅपवर लॉगइन करतात तेव्हा त्यांची शिल्लक रक्कम ही शून्य दाखवली जातेय. सर्व पीडितांना टेलिग्रामच्या माध्यमातून जोडण्यात आले होते. ज्याचे नाव ईसीई इंडियन कम्युनिटी असे होते. ज्यामध्ये १९ हजारांहून अधिक सदस्य होते.जेव्हा अॅप बंद झाला तेव्हा ग्रुप ही बंद करण्यात आला. (Cryptocurrency)

हे देखील वाचा- Second Hand आयफोन खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

आता या प्रकरणी पोलिसांकडून असा तपास केला जात आहे की, खरंच हे पैसे क्रिप्टोकरंसी मध्ये गुंतवले जात होते की, नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका तज्ञाने असे म्हटले आहे की, कधी ही कोणत्याही अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करायची असेल तर त्याचे मालकी हक्क कोणाकडे आहेत ते तपासून पहावे. या संदर्भातील माहिती तु्म्हाला प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरमध्ये अॅपच्या खालीच दिलेली असते. या व्यतिरिक्त अॅप संदर्भात कोणी कशा पद्धतीने रिव्हू दिले आहेत हे सुद्धा तपासून पहा आणि त्यानंतरच त्या अॅपमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.