अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध हा आपल्या प्रतिष्ठेचा विषय करुन घेतला आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षाची शपथ घेतानांच हे युद्ध आपण काही दिवसातच थांबवणार असे सांगितले होते, मात्र त्यांत त्यांना अपयश आल्यानं ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना टेरीफ कार्डाची भीती दाखवली. त्यातूनही काही साध्य न झाल्यामुळे ट्रम्प आणि पुतिन यांची अलास्का येथील ऐतिहासिक भेटही झाली. मात्र त्यातूनही काहीही निष्पन्न झाले नाही. उलट पुतिन यांनी या युद्धा मागची रशियाची मानसिकता किती पक्की आहे, हेच जगाला दाखवलून दिले. (Russia And Ukraine)
वास्तविक अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात युक्रेनला भरपूर पाठिंबा देण्यात आला होता. युरोपिय देशांनही ही संधी साधून युक्रेनला मदत करत, पुतिन यांचा पराभव करण्यासाठी युक्रेनला आर्थिक आणि शस्त्रसामुग्रीची मदत केली. या सर्वांमुळेच तब्बल साडेतीन वर्ष होऊनही रशिया-युक्रेन युद्धावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. या सर्वात या युद्धाच्या मुळ कारणकाडे दुर्लक्ष झाले आहे. हे युद्ध काही भागासाठी होत आहे, त्यात क्रिमिया या शहराचा समावेश आहे. काही वर्षापूर्वी क्रिमियाचा ताबा युक्रेनकडे देण्यात आला असला तरी क्रिमियाच्या नागरिकांचा कायम ओढा रशियाकडे होता. या भागात रशियन भाषाच अधिक बोलली जाते. याच क्रिमियावरुन रशिया, युरोपिनयन देशांविरोधात उभा राहिला आहे. मात्र पुतिन-ट्रम्प भेटीपासून ट्रम्प यांचा रोख बदलला आहे. अमेरिकेच्या भेटीवर असलेल्या युक्रेनच्या अध्यक्षांना त्यांनी क्रिमियाचा ताबा रशियाकडेच रहाणार असे सांगितले आहे. शिवाय ही गोष्ट झेलेन्स्की यांनी मान्य केली तर युद्ध लगेच थांबेल असा आशावादही व्यक्त केला आहे. आता याबाबत झेलेन्स्की काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (International News)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अलास्कामध्ये भेट झाल्यापासून ट्रम्प यांनी युक्रेन युद्धाबाबत आपली भूमिका बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. अलास्का भेटीनंतर आता ट्रम्प, झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. मात्र हा दौरा सुरु होण्यापूर्वीच ट्रम्प यांनी त्यांना धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना अगदी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, युक्रेनने क्रिमिया रशियाला सोपवावा आणि नाटोमध्ये सामील होण्याचा त्यांचा हेतू सोडून द्यावा. रशिया-युक्रेन युद्धासाठी हेच दोन कळीचे मुद्दे आहेत. या दोन्ही मुद्द्यापासून झेलेन्स्की दूर झाले तर हे युद्ध लगेच संपणार असे ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र झेलेन्स्की यांनी याबाबत आधीही विधान करत, युक्रेन आपली थोडीही जमिन रशियाला देणार नसल्याचे सांगून ट्रम्प यांची कोंडी केली आहे. ट्रम्प यांच्या विधानामुळे झेलेन्स्की यांची शेवटची आशाही धुळीस मिळाल्यासारखी झाली आहे. मुळात हा क्रिमिया भाग कसा आहे, आणि त्यासाठी रशिया-युक्रेन हे दोन्ही देश युद्धावर का उतरले आहेत, हे जाणणेही महत्त्वाचे आहे. (Russia And Ukraine)
क्रिमियाचा इतिहास मोठा आहे आणि 18 व्या शतकापासून ते 1954 पर्यंत रशियाचा भाग होता. 1944 मध्ये तत्कालीन सोव्हिएत नेते निकिता ख्रुश्चेव्ह यांनी क्रिमिया हा भाग युक्रेनला भेट म्हणून दिला. तेव्हापासूनच या दोन्ही देशामध्ये क्रिमियाबाबत वाद सुरु झाला. 2014 मध्ये, युक्रेनमधील राजकीय संकटानंतर, रशियाने क्रिमियामध्ये सैन्य पाठवले आणि क्रिमियावर ताबा घेतला. शिवाय क्रिमियामध्ये जनमत चाचणी घेण्यात आली. क्रिमियामधील बहुतांश नागरिक हे रशियाला देश मानत होते. आणि तेथील बोलीभाषाही रशियन असल्यामुळे क्रिमियाच्या नागरिकांनी रशियाच्या बाजुने मतदान केले. तेव्हापासून रशियानं क्रिमिया आपला भाग असल्याचे घोषित केले. मात्र युक्रेन आणि इतर अनेक देशांनी या जनमत चाचणीला बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले. शिवाय रशियाने क्रिमियाचे जे विलनीकरण केले त्याचा निषेध केला. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनेही रशियाच्या या निर्णयावर टीका केली. युरोपमधील अनेक देश या वादात उतरले. त्यांनी पुतिन यांना खच्ची करण्यासाठी युक्रेनला बरोबर ठरवत, क्रिमिया भाग युक्रेनचा असल्याचे जाहीर केले. मात्र क्रिमियामधील जनतेचा ओढा हा रशियाकडे असल्याचे स्पष्ट होते. (International News)
================
हे देखील वाचा : Alaska : पुतिन-ट्रम्प भेटीसाठी अलास्कालाच का निवडले ?
================
त्यातूनही क्रिमिया हा भाग रशियाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. क्रिमियावरील नियंत्रणामुळे रशियाला काळ्या समुद्रात प्रवेश आणि व्यापारी मार्गांवर अधिक नियंत्रण मिळत आहे. पण युक्रेन, क्रिमिया हा आपला अविभाज्य भाग असून त्याला काहीही करुन परत मिळवणार या मुद्द्यावर अडून आहे. युक्रेनी सैन्यानं क्रिमियामधील जनतेवर अत्याचार केल्याच्याही घटना पुढे आल्या आहेत. या सर्वांमुळेच रशियानं युक्रेनबरोबर युद्ध सुरु केले असून या युद्धापासून नाटो देशांनी दूर रहावे असा इशारा दिला आहे. हे युद्ध संपवायचे असल्यास क्रिमियाचा पूर्ण ताबा रशियाकडे देणे गरजेचे आहे, हे पुतिन यांनी स्पष्टपणे डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले आहे. आता ट्रम्प हाच संदेश झेलेन्स्की यांना कसा देतात, आणि झेलेन्स्की त्याबाबत काय भूमिका घेतात, यावरच रशिया-युक्रेन युद्ध संपूष्टात येणार की अधिक तीव्र होणार हे अवलंबून आहे. (Russia And Ukraine)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics