Home » क्रिकेट अंपायर होण्यासाठी पात्रता, निवड आणि मैदानावर घडलेले काही ‘हे’ खास किस्से सुद्धा पहा

क्रिकेट अंपायर होण्यासाठी पात्रता, निवड आणि मैदानावर घडलेले काही ‘हे’ खास किस्से सुद्धा पहा

by Team Gajawaja
0 comment
Cricket umpire
Share

क्रिकेट म्हणजे भारतात हे आदराचे स्थान असलेल्या गोष्टींपैकी एक आहे. त्यामुळेच जेव्हा कधी क्रिकेटचा सीझन सुरु होते तेव्हा प्रत्येकजण त्याचा आनंद घेताना दिसून येतात. परंतु क्रिकेटच्या मैदानातील खेळाडूंसह असा ही एक व्यक्ती अत्यंत फार महत्वाचा असतो तो म्हणजे अंपायर. अंपायरच्या व्यतिरिक्त कोणताही सामना पूर्ण होऊ शकत नाही. कारण अंपायरच्या आदेशानुसारच क्रिकेटचा सामना सुरु होतो आणि त्यांच्याच सहमतीने खेळाची सुरुवात होते. आपण पाहतो अंपायर हे एकाच ठिकाणी उभे राहिलेले असतात आणि त्यांची नजर ही प्रत्येक चेंडूंवर असते. अंपायरची एखादी लहान चुक सुद्धा सामन्याचा निर्णय बदलू शकतो. अशातच तुम्हाला माहिती आहे का अंपायर होण्यासाठी पात्रता, शिक्षण काय असली पाहिजे? तर याबद्दलच आपण आज अधिक जाणून घेणार आहोतच त्याचसोबत काही अंपायरचे क्रिकेटच्या मैदानातील खास किस्से सुद्धा आपण पाहणार आहोत. (Cricket Umpire)

कोण होऊ शकते अंपायर?
अंपायर होण्यासाठी कोणतेही कठोर नियम नाही. मात्र अंपायर होण्यासाठी तुमची करडी नजर आणि क्रिकेटच्या ४२ नियमांची माहिती तुम्हाला पाहिजे. त्याचसोबत फक्त क्रिकेट खेळलेला व्यक्तीच अंपायर होतो असे नाही. तर ज्यांनी क्रिकेट खळले आहे आणि ज्यांना बनवण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी अंपायर होण्याचा मार्ग थोडा सोप्पा होतो.

कसे होता येते अंपायर?
अंपायर होण्यासाठी राज्य स्तरावर स्पोर्ट्स कोट्यातून वेळोवेळी प्रयोगात्मक आणि लेखी परिक्षा घेतल्या जाता. अंपायर बनण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना यामध्ये भाग घ्यावा लागतो. यामध्ये सुद्धा जर तुम्ही लहान स्तरावर याआधी अंपायरिंगचे काम केले आहे तर तुमच्यासाठी हा मार्ग सोप्पा होऊ शकतो. परिक्षेत पास झाल्यानंतर बीसीसीआय द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षेत सुद्धा बसणे योग्य मानले जाते. तर बीसीसीआय कडून सुद्धा अंपायरच्या पदासाठी परिक्षा घेतल्या जातात. त्यामुळे एखादा उमेदवार त्यांच्या परिक्षेत सुद्धा पास झाल्यास त्याला देशाअंतर्गत आणि देशाबाहेर सुद्दा अंपायरिंग करण्याची संधी मिळते. या सामन्यांव्यतिरिक्त अंपायर काही अन्य टूर्नामेंट्समध्ये ही अंपायरिंग करतात ज्यामुळे त्यांना त्यांच्या कामाचे उत्तम पैसे मिळतात.(Cricket Umpire)

हे देखील वाचा- ‘कॅप्टन कुल’ महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यात आलं आहे त्याचं नवं प्रेम…

Cricket Umpire
Cricket Umpire

क्रिकेटच्या मैदानावर घडलेले अंपायर्सचे हे खास किस्से

-क्रिकेटच्या मैदानावर एखाद्याचे केस कापणे म्हणजे थोडे विचित्रच आहे. पण एका अंपायरने फलंदाजाचे केस कापले होते. खरंतर हा किस्सा सुनील गावस्कर आणि डिकी बर्ड. तर सुनील गावस्कर हे जगातील एकमात्र फलंदाज आहेत ज्यांचे केस कोणत्या न्हाव्याने नव्हे तर मैदानात अंपायरने कापले होते. खरंतर हा किस्सा घडण्यामागे असे झाले होते की, भारताचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. १९७४ मध्ये एक टेस्ट मॅच होणार होती. तेव्हा भारताचा संघ फलंदाजी करत होता. त्याचवेळी मैदाना गावस्कर होते आणि सामना अटीतटीचा झाला होता. सातत्याने सुनील गावस्कर आपल्या संघाला जिंकवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण तेव्हा मैदानावर जोरदार वारे वाहत होते आणि त्यावेळी त्यांची केस सुद्धा थोडी मोठी होती. मोठे केस आणि हवा येत असल्याने केस सतत त्यांच्या डोळ्यांवर येत होती आणि त्यामुळे त्यांना फलंदाजी करता येत नव्हती. हा सर्व प्रकार अंपायर पाहत होते आणि त्याच वेळी गावस्कर केस कापण्यासाठी सुद्धा कसे जाणार त्यामुळेच अंपायरने आपल्या खिशातील कैची काढली आणि मैदानातच सुनील गावस्कर यांचे केस कापण्यास सुरुवात केली.

-भारतातीलच एक टुर्नामेंटमध्ये अंपायरने डान्स केल्याचा व्हिडिओ ही सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये अंपायरने एका क्रिकेटच्या सामन्यावेळी आपले सर्व निर्णय हे डान्स करतच जाहीर केले होते. त्या व्हिडिओमध्ये अंपायर हा बॉलिवूडच्या गाण्यांवर ठुमके लावत असल्याचे ही दिसून आले होते. यामुळे मैदानातील सर्व खेळाडूंसह प्रेक्षकांचे सुद्धा मनोरंजन झाले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.