भारतात क्रिकेट म्हणजे श्वास आहे. प्रत्येक भारतीय मग स्त्री असो किंवा पुरुष सर्वच क्रिकेटसाठी वेडे आहेत. त्यात आपल्या देशातील खेळाडू संपूर्ण जगामध्ये नंबर १ आहेत. जगामध्ये कोणता खेळाडू नंबर १ आहे हे ICC अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ठरवत असते. प्रत्येक खेळाडूचे सामन्यातील प्रदर्शन पाहून त्यांना गुण दिले जातात. त्यानुसार क्रिकेटमध्ये संपूर्ण जगामध्ये कोण टॉपवर आहे, हे समजते यालाच आयसीसी रँकिंग म्हटले जाते. आयसीसी रँकिंग ही एक प्लेयर रँकिंग ही एक प्रणाली आहे ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार गुण देऊन रँकिंग दिली जाते. ही रँकिंग ० ते १००० गुणांपर्यंत असते. (Marathi News)
नुकतेच ICC ने त्यांची नवीन रँकिंग जाहीर केली. मात्र ही रँकिंग सर्वांना धक्का देणारी ठरली. कारण या यादीत भारतातील नव्हे नव्हे संपूर्ण जगातील टॉपचे फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची नावेच नव्हती. भारतीय संघाची अनुभवी जोडी या रँकिंगमधून बाहेर नाही तर थेट गायबच झाली होती. आयसीसीच्या गेल्या आठवड्यातील बॅटिंग रँकिंगमध्ये रोहित आणि विराट टॉप 5 मध्ये होते. मात्र आता आलेल्या ताज्या आकडेवारीत या दोघांना बाहेर करण्यात आले होते. रोहित आणि विराट हे दोघेही वनडे रँकिंगमध्ये चांगल्या स्थितीत होते. दोघेही पहिल्या पाचात असल्याने क्रिकेट चाहतेही आनंदी होते. तेव्हा रोहित ७५६ रेटिंगसह दुसऱ्या स्थानी होता. तर विराट चौथ्या क्रमांकावर होता. विराटच्या खात्यात तेव्हा ७३६ रेटिंग होते. विराट चौथ्या क्रमांकावर होता. मात्र आता हे दोघेही रँकिंगमध्येच नाहीत. (Top Marathi Headline)
गेल्या आठवड्यात, जेव्हा आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केली तेव्हा भारताचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर आला. मात्र बुधवारी आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केली तेव्हा विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या दिग्गज खेळाडूंनी टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण त्यांनी अद्याप वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. असे असूनही बुधवारी जाहीर केलेल्या वनडे रँकिंगमधून रोहित शर्मा आणि विराटचे नाव काढून टाकण्यात आले होते. (Todays Marathi Headline)
रोहित आणि विराट यांची नावं टॉप १०० मधून बाहेर काढली गेली होती. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची नावं वनडे रँकिंगमध्ये नसल्यानं दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. ही यादी पाहून सोशल मीडियावर अनेकांनी ICC ला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर मोठा गोंधळच निर्माण झाला. मात्र आता आयसीसीने आपली चूक सुधारली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचा समावेश वनडे रँकिंगमध्ये पुन्हा करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
आयसीसीकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नाव वगळलं गेल्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यांनी रँकिंगच्या यादीत त्रुटी असल्याचे सांगत आता त्यांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यात आल्याचे सांगितले. आयसीसीच्या नियमानुसार एखादा खेळाडू ९-१२ महिन्यांच्या काळात एकदिवसीय सामना खेळला नसेल तर त्याचं नाव रँकिंगमधून हटवलं जातं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभाग घेतला होता. रोहित आणि विराटच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते. (Marathi Trending News)
नव्या रँकिंगमध्ये भारताचा स्टार खेळाडू शुभमन गिल ७८४ रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे तर रोहित शर्मा ७५६ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा क्रिकेटपटू ७३९ रेटिंगसह आहे. विराट कोहली ७३६ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. श्रेयस अय्यर हा सहाव्या स्थानासह अव्वल १० मधील दुसरा भारतीय फलंदाज आहे. भारताचा अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा पुरुषांच्या टी२० क्रमवारीत पहिल्या दोन स्थानांवर कायम आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादव सहाव्या आणि यशस्वी जयस्वाल १० व्या स्थानावर आहेत. जसप्रीत बुमराह कसोटीतील वेगवान गोलंदाज रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर तर रवींद्र जडेजा कसोटीतील ऑलराऊंडर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. हार्दिक पांड्या टी २० मध्ये ऑलराऊंडर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. (Top Marathi News)
=========
Golden Temple : १५०० किलो सोन्याचा वापर करून बांधलेले ‘महालक्ष्मी मंदिर’
=========
दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज वनडेतील गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. महाराजनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे सामने खेळले होते. त्यात त्यानं पहिल्या मॅचमध्ये ३३ धावा देत ५ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर महीश तीक्षणा आहे. तिसऱ्या स्थानावर कुलदीप यादव ६५० गुणांसह आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics