गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक केली जात असल्याची प्रकरणे अधिक वाढू लागली आहेत. जर तुम्ही सुद्धा क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर त्याच्या सुरक्षिततेसंदर्भातील अधिक गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. काही गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावी लागते. ज्यामुळे तुम्हाला क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीपासून दूर राहता येते. तर जाणून घेऊयात क्रेडिट कार्ड संदर्भातील काही महत्वाच्या टीप्स. (Credit Cards Safety Tips)
-कोणासोबत ही क्रेडिट कार्डचे डिटेल्स शेअर करु नका
कधी ही क्रेडिट कार्डचा पिन, इंटरनेट बँकिंग पासवर्ड किंवा मोबाईल बँकिंग पासवर्ड शेअर करु नका. जरी तो तुमचा मित्र असेल किंवा परिवारातील सदस्य. ती माहिती गुपित राहिलेलीच बरी, जर तुम्हाला क्रेडिट कार्डची माहिती शेअर करण्यासाठी एखादा मेसेज किंवा ईमेल आला आल्यास त्यावर उत्तर देण्यापासून दूर रहा. त्यावेळी लक्षात ठेवा की, बँक किंवा कोणतीही आर्थिक संस्था अशा पद्धतीचे डिटेल्स मागत नाहीत. या व्यतिरिक्त सार्वजनिक वायफायचा वापर करुन क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ट्रांजेक्शन करु नका.

-कार्डसाठी मर्यादा घाला
तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या खर्चावर मर्यादा घालू शकता. तुम्ही एटीएमचा वापर, मर्चेंट आउटलेट स्वाइप, ऑनलाईन ट्रांजेक्शन, कॉन्टॅक्सलेसचा वापर आणि इंटरनॅशनल ट्रांजेक्शन लिमिट व्यतिरिक्त विविध मर्यादा घालू शकता. या सुविधेचा समजूतदारणणाने वापर करा. ही सु्द्धा गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही कोणत्याही सुविधेला रोखू शकत नाहीत. पण गरज भासल्यास ती पुन्हा सुरु करु शकता. जसे इंटरनॅशनल ट्रांजेक्शन, परदेशात जाणे असो.
-बिल आणि दररोजच्या खर्चासाठी वेगळे कार्ड ठेवा
जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड आहे तर त्यापैकी एक कार्ड हे ऑटोमॅटिक पेमेंटसाठी ठेवा. जसे फोन बिल, मंथली सब्सक्रिप्शन, ईएमआयसाठी वापरा. हे कार्ड दुसऱ्या कोणत्याच खर्चासाठी वापरु नका. तुम्ही हे कार्ड रिटेल कार्ड रीडर, रेस्टॉरंट मालक किंवा पेट्रोल पंपाच्या ठिकाणी वापरु नका. तुम्ही दररोजच्या कामासाठी एखादे दुसरे कार्ड वापरु शकता. जेथे तुम्ही लिमिट लावलेली असेल.(Credit Cards Safety Tips)
हे देखील वाचा- CIBIL Score वाढवण्यासाठी ‘या’ गोष्टींकडे जरुर लक्ष द्या
-अलर्ट रहा
तुमचे क्रेडिट कार्डचे बिल प्रत्येक महिन्याला तपासून पहा. जर त्यात ही गडबड, चुकीचा चार्ज किंवा ट्रांजेक्शनसाठी तुम्ही तुमचे बिल जरुर पहा.