Home » क्रेडिट कार्डच्या अधिक वापरामुळे IT return भरतेवेळी होईल समस्या

क्रेडिट कार्डच्या अधिक वापरामुळे IT return भरतेवेळी होईल समस्या

आरबीआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार असे समोर आले आहे की, देशात क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केले जाणारे ट्रांजेक्शन फार वाढले आहेत.

by Team Gajawaja
0 comment
Credit card use
Share

सध्या क्रेडिट कार्डचा वापर फार वाढला गेला आहे. नुकत्याच आरबीआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार असे समोर आले आहे की, देशात क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केले जाणारे ट्रांजेक्शन फार वाढले आहेत. अशातच तुम्ही सुद्धा क्रेडिट कार्डचा गरजेपेक्षा अधिक वापर करत असाल तर हे आधी जरुर वाचा. खरंतर क्रेडिट कार्डचा अधिक वापर केल्याने तुमचा सिबिल स्कोर बिघडला जातोच पण त्याचसोबत इनकम टॅक्स रिटर्न भरताना सुद्धा समस्या उद्भवू शकते. (Credit card use)

जर आतापर्यंत तुम्ही तुमचा सिबिल स्कोर तपासून पाहिला नसेल तर तो आधी पहा. तेथे तुम्हाला एक कॉलम दिसेल तेथे क्रेडिट कार्ड युटिलाइजेशन असे लिहिलेले असेल. या कॉलमचा तुमचा सिबिल स्कोरवर मोठा परिणाम होतो. जेवढं अधिक तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड वापरले असेल तेवढाच सिबिल स्कोरवर त्याचा परिणाम दिसेल.

इनकम टॅक्सची असते नजर
खरंतर क्रेडिट कार्डचा अधिक वापर केल्याने तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. क्रेडिट कार्डचा मर्यादेपेक्षा अधिक वापर केल्यास इनकम टॅक्स विभाग तुमच्यावर लक्ष ठेवते. इनकम टॅक्स विभागाच्या नियमानुसार १० लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे ट्रांजेक्शन केले तर त्याची माहिती ६१ए अंतर्गत बँकेला द्यावी लागते. ऐवढेच नव्हे तर एखाद्या व्यक्तीला आपल्या क्रेडिट कार्डच्या खर्चाची माहिती बँकेला फॉर्म २६ए अंतर्गत द्यावी लागते. या नियमानुसार जर तुम्ही अधिक किंमतीचे ट्रांजेक्शन केल्यास तरीही त्याची माहिती द्यावी लागते.बँक आणि दुसऱ्या आर्थिक संस्थांनी असे म्हटले आहे की, अधिक किंमतीच्या ट्रांजेक्शनची माहिती इनकम टॅक्स विभागाला द्यावी.

काय सांगतो नियम
इनकम टॅक्स विभागाच्या नियमानुसार बँक, पोस्ट ऑफिस, कंपन्यांना प्रत्येक वर्षी क्रेडिट कार्ड संबंधित ट्रांजेक्शनची माहिती फॉर्म ६१ए अंतर्गत देणे अनिवार्य आहे. तर फॉर्म २६ एएसच्या अंतर्गत टॅक्सपेअरला आपल्या ट्रांजेक्शनची माहिती द्यावी लागते. या ट्रांजेक्शनमध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ट्रांजेक्शनची सुद्धा माहिती असते. जर असे केले नाही तर इनकम टॅक्स विभागाची नजर पडू शकते. त्यामुळे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ट्रांजेक्शनकडे लक्ष द्यावे.(Credit card use)

हेही वाचा- YouTube वरुन कमावत असाल तर आधी ‘हे’ वाचा

काय सांगतात तज्ञ?
टॅक्स एक्सपर्ट्स असे म्हणतात की, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करण्यात आलेले खर्च खासकरुन १० लाखांवरील ट्रांजेक्शनची माहिती आयटी रिटर्नवेळी द्यावी लागते. जर एखाद्या व्यक्तीने १० लाखांपेक्षा अधिक रक्कमेचे ट्रांजेक्शन क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केले असेल तर त्याला १ टक्के टॅक्सच्या रुपात द्यावा लागतो. खरंतर जर तुम्ही २० लाखांचे ट्रांजेक्शन क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केले असेल तर तुम्हाला १ टक्क्यांच्या हिशोबाने म्हणजेच २० हजार रुपयांचा टॅक्स द्यावा लागेल. यामुळे कधीही मोठ्या रक्कमेचे ट्रांजेक्शन क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करत असाल तर सावधान. तुम्ही सावधगिरी बाळगली नाही तर इनकम टॅक्स विभाग जरुर तुमच्यावर नजर ठेवेल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.