देशात क्रेडिट कार्डचा वापर दिवसागणिक वाढत चालला आहे. परंतु तुम्ही जर समजूतदारपणे त्याचा वापर केल्यास तर तुमच्या फायद्याचे ठरते. अन्यथा त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तुम्ही कर्जात अडकले जाऊ शकता. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर कराल अथवा ते बँकेकडून घ्याल तेव्हा त्या संदर्भातील नियम, अटी किंवा त्याची मर्यादा किती आहे ते सुद्धा जाणून घ्या. कारण काही वेळेस आपण एखादी गोष्ट खरेदी केल्यानंतर पाकिटात पुरेसे पैसे नसल्यास लगेच क्रेडिट कार्ड काढतो. अशी चुक वेळोवेळी करणे टाळा. त्याचसोबत आणखी कोणत्या चुका क्रेडिट कार्ड वापरताना करु नये याच बद्दल पाहूयात. (Credit Card Mistakes)
-ATM मधून पैसे काढणे
क्रेडिट कार्ड जर तु्म्ही वापरत असाल आणि त्याच्या माध्यमातून एटीएमने पैसे काढणार असाल तर थांबा. असे करु नका. कारण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढल्यानंतर क्रेडिट पीरियड मिळत नाही. कार्डावर जे व्याजदर लावला जातो तो एटीएम मधून पैसे काढल्याच्या दिवसापासूनच सुरु होतो.
-संपूर्ण क्रेडिट लिमिटचा वापर करणे
क्रेडिट कार्डच्या संपूर्ण लिमिटचा वापर कधीच करु नये. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर प्रभावित होऊ शकतो. सर्वसामान्यपणे क्रेडिट कार्ड कंपन्या क्रेडिट युटिलाइजेशन रेश्यो ३० टक्क्यांपेक्षा अधिक स्तर असल्याने कर्जाचे संकेत असल्याचे मानतात. खरंतर क्रेडिट स्कोरवर क्रेडिट युटिलाइजेशन रेश्योचा अत्यंत प्रभाव पडतो. तुमचा क्रेडिट युटिलाइजेशन रेश्यो यावर निर्भर करतो की, तुम्ही क्रेडिट कार्डचा किती वापर केला आहे.
-केवळ कमीतकमी रक्कमेच्या ड्यु चे पेमेंट करणे
जेव्हा कार्डधारक केवळ कमीतकमी रक्कमेच्या ड्यु चे पेमेंट करतो तेव्हा त्यांना लेट पेमेंट चार्जचे पेमेंट करण्याची आवश्यकता नसते. कमीत कमी रक्कमेचे ड्यु युजर्ससाठी आउटस्टँडिंग बिलाचा एक लहान हिस्सा जो ५ टक्के असतो. यामुळे तुमचे कर्ज वेगाने वाढू शकते. कारण दिवसागणिक पेमेंट न केल्यास त्यावर अतिरिक्त चार्ज लावला जातो. येथे लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी की, क्रेडिट कार्डवर अतिरिक्त चार्ज हा ४० टक्के वर्षभरापेक्षा अधिक असतो.(Credit Card Mistakes)
-रिवॉर्ड पॉइंट्ससाठी खर्च करणे
क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्ही अधिक खर्च करावा म्हणून विविध ऑफर्स देते. खासकरुन रिवॉर्ड पॉइंटच्या नावाखाली ती ऑफर असते.मात्र हे पॉईंट्स मिळवण्यासाठी अधिक खर्च क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करु नका. तुमच्या बजेट नुसार खर्च जरुर करा. प्रत्येक वर्षी, दोन वर्षांनी रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर करावा जर तुमची क्रेडिट कार्ड कंपनी तुम्हाला याचा वापर बिल पेमेंटसाठी देत असेल तर तुम्ही ते करु शकता.
हे देखील वाचा- पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात बदल
-अचानक कार्ड बंद करणे
काही लोक दोन कार्ड असल्याने एक कार्ड बंद करतात. असे करु नये. खरंतर क्रेडिट युटिलाइजेशन रेश्यो यामुळे बिघडत. एक कार्ड बंद केल्यानंतर क्रेडिट युटिलाइजेशन रेश्यो वाढतो. कारण जो रेश्यो यापूर्वी दोन कार्डमध्ये विभागला गेला होता तो दुप्पट होईल. कार्डचा वापर करु नका पण ते अॅक्टिव्हेट जरुर ठेवा.