Home » क्रेडिट कार्डच्या माध्यमातून किती खर्च केला पाहिजे?

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून किती खर्च केला पाहिजे?

by Team Gajawaja
0 comment
Credit Card Hidden Charges
Share

क्रेडिट कार्डचा वापर बहुतांशजण करतात. खासकरुन तरुणांमध्ये ते अतिशय खुप वापरले जाते. जेव्हा तुमच्या खिशात पैसे नसतात तरीही खरेदीवर कोणताही परिणाम होत नाही कारण तेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता. काही लोक खरेदी करण्यासाठी त्याचा वेळोवेळी वापर करतात आणि किती खर्च केलाय याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. अशातच तुम्ही अधिक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च केल्यास त्यावर आयकर विभागाची नजर पडू शकते. (Credit Card Expenses Limit)

आरबीआयच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास नोव्हेंबर २०२२ मध्ये ई-कॉमर्स वेबसाइटवर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत ३.७ टक्के म्हणजेच जवळजवळ चार पटींनी वाढ झाली आहे. ऐवढेच नव्हे तर प्वाइंट ऑफ सेलव सुद्धा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी ही डेबिट कार्डच्या तुलनेत १.२ पटींनी वाढली आहे. अशातच याच्या माध्यमातून खरेदी करणे ग्राहकांना सोप्पे वाटते. परंतु ते कधीकधी मर्यादेपेक्षा अधिक खर्च करतात.

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करत असल्यास काय आहे नियम?
खरंतर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी संदर्भात आयकर विभागाकडून काही खास नियम तयार करण्यात आलेला नाही. पण बँका आणि आर्थिक संस्थांनी असे जरुर म्हटले आहे की, अधिक मूल्य असणाऱ्या ट्रांजेक्शनचा रिपोर्ट इनकम टॅक्स विभागाला द्यावी. आयकर नियमाअंतर्गत १० लाखांहून अदिक ट्रांजेक्शनचा रिपोर्ट बँकेचा फॉर्म 16A च्या माध्यमातून द्यावी लागते. ऐवढेच नव्हे तर एखाद्या व्यक्तीला क्रेडिट कार्डच्या खर्चाची माहिती सुद्धा बँकेला फॉर्म 26A च्या माध्यमातून द्यावी लागते. जर एखाद्या क्रेडिट कार्ड धारकाने अधिक रक्कमेचे ट्रांजेक्शन केले तर त्याची सुद्धा माहिची द्यावी लागते. (Credit Card Expenses Limit)

कधी येते इनकम टॅक्सची नोटीस
आयकर विभागाने हे सुद्धा सांगितले आहे की, एखादा व्यक्तीगत ग्राहक किती खर्च करणार त्यानुसार तो इनकम टॅक्सच्या नजरेत येऊ शकतो. आयकर विभागानुसार, प्रत्येक ग्राहक १ लाखांपेक्षा अधिक क्रेडिट कार्डचे बिल जमा करतो तर त्याला स्क्रुटनीचा सामना करावा लागू शकतो. खासकरुन एखादा ग्राहक कॅश मध्ये बिल जमा करत असेल तर त्याच्यावर आयकरची नजर पडू शकते आणि त्याला नोटीस येऊ शकते.

हे देखील वाचा- गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी, आरबीआय २५ जानेवारीला घेऊन येणार Sovereign Green Bond

प्रत्येक वर्षी बँक देते माहिती
आयकर विभागाने बँका, कंपन्या आणि पोस्ट ऑफिससाठी प्रत्येक वर्षाच्या क्रेडिट कार्ड ट्रांजेक्शनचा रिपोर्ट फॉर्म 61A च्या अंतर्गत देणे अनिवार्य केले आहे. यामध्ये आर्थिक देवाणघेवाणाची संपूर्ण स्टेटमेंट असते. ऐवढेच नव्हे तर टॅक्सपेयर्सला सुद्धा २६एएस फॉर्ममध्ये आपल्या ट्रांजेक्शनची माहिती द्यावी लागते. यामध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून झालेल्या ट्रांजेक्शनचा समावेश असतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.