Home » ड्यु डेट नंतर सुद्धा पेनल्टीशिवाय करता येईल क्रेडिट कार्डच्या बिलाचे पेमेंट

ड्यु डेट नंतर सुद्धा पेनल्टीशिवाय करता येईल क्रेडिट कार्डच्या बिलाचे पेमेंट

by Team Gajawaja
0 comment
Credit Card Hidden Charges
Share

आजकाल बहुतांश लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही बॅलेंसची चिंता न करता पेमेंट करु शकता. क्रेडिट कार्डचा सध्या वापर करणे अगदी सोप्पे झाले आहे. त्याचसोबत याचे काही फायदे ही आहेत. मात्र क्रेडिट कार्डच्या बिलाचे पेमेंट करण्यासाठी एक ड्यु डेट असते. बिल जारी केल्यानंतर त्या तारखेपर्यंत तुम्हाला पेमेंट करावे लागते. असे न केल्यास तुम्हाला पेनल्टी ही बसते आणि क्रेडिट स्कोर घराब होण्याची भीती राहते. (Credit Card Bill Payment)

काही वेळेस लोक ड्युट डेटच्या दिवशीच क्रेडिट कार्डचे पेमेंट करणे विसरतात. अशात त्यांचा क्रेडिट स्कोर घराब होते. दरम्यान, ड्यु डेट नंतर सुद्धा तुम्हाला कोणत्याही पेनल्टीशिवाय क्रेडिट कार्डच्या बिलाचे पेमेंट करण्याची सुविधा मिळते. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर घराब ही होत नाही तर याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

क्रेडिट कार्डच्या बिलाच्या पेमेंट संदर्भात गेल्या वर्षात आरबीआयने एक नवा नियम लागू केला होता. त्यानुसार बिल पेमेंट ड्यु डेट नंतर ही पेनल्टीशिवाय भरता येऊ शकते. या नियमाच्या नुसार क्रेडिट कार्ड होल्डर ड्यु डेट नंतर ही ३ दिवसात पेनल्टीशिवाय पेमेंट करु शकतो.

आरबीआयच्या नियमानुसार जर तुम्ही ड्यु डेट नंतर पुढील २ दिवसापर्यंत आपल्या क्रेडिट कार्डच्या बिलाचे पेमेंट करत असाल तर तुम्हाला कोणतीही पेनल्टी लागत नाही. यामुळे क्रेडिट स्कोर ही खराब होत नाही. अशातच तुम्ही एखाद्या महिन्यात ड्यु डेटवर क्रेडिट कार्डच्या बिलाचे पेमेंट करण्यास विसरलात अथवा पैशांची व्यवस्था वेळीच करु शकला नाहीत तर तुम्हाला पुढील ३ दिवस चिंता करण्याची गरज नसते. (Credit Card Bill Payment)

हे देखील वाचा- बँक बुडालीय हे कसे ठरवले जाते? ग्राहकांवर होतो असा परिणाम

मात्र जर ड्यु डेट नंतर तुम्ही क्रेडिट कार्डच्या बिलाचे पेमेंट करु शकला नाहीत तर कंपनी तुमच्याकडून पेनल्टी वसूल करते. पेनल्टीची रक्कम तुमच्या क्रेडिट कार्डच्या बिलावर निर्भर करते. जर तुमचे बिल अधिक असेल तर अधिक पेनल्टी भरावी लागते. तसेच कमी असल्यास त्यानुसार कमी पेनल्टी लागते. जसे की, स्टेट बँक ५०० ते १ हजार रुपयाच्या बिलावर ४०० रुपये पेनल्टी वसूल करते. १ हजार ते १० हजारांवर ७५० रुपये आणि १० ते २५ हजारापर्यंतच्या रक्कमेवर ९५० रुपये पेनल्टी लावली जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.