Cracked Heels Care : पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी दररोज फुट केअर रुटीन फॉलो करावे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, पायांची चमक आणि सौंदर्य वाढवण्यासाठी सध्या नवनव्या ट्रिटमेंट केल्या जातात. यावर काह स्किन केअर प्रोडक्ट्सही वापरले जातात. पायांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास पाय कोरडे आणि फाटण्यास सुरुवात होऊ शकते. जाणून घेऊया पायांना पडलेल्या भेगांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी कोणता घरगुती उपाय करू शकता यावर जाणून घेऊया….
फाटलेल्या पायांसाठी कोणत्या गोष्टींचा वापर करावा?
-एलोवेरा जेल
-नारळाचे तेल
एलोवेरा जेल त्वचेला लावल्याने होणारे फायदे
-एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन-बी असते. यामुळे त्वचेला पुरेशा प्रमाणात पोषण मिळते.
-जेलमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.
-त्वचेसाठी एलोवेरा जेल अत्यंत फायदेशीर मानले जातेच. पण त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर होण्यासही मदत होते.
नारळाच्या तेलाचे फायदे
-त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते
-त्वचेवर होणाऱ्या इन्फेक्शनपासून दूर राहता
-त्वचेला पोषण देण्यास मदत होते
भेगा पडलेल्या पायांची अशी घ्या काळजी
-भेगा पडलेल्या पायांसाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये एलोवेरा जेल काढून घ्या
-यामध्ये एक ते दोन चमचे नारळाचे तेल मिक्स करा
-दोन्ही गोष्टी व्यवस्थितीत मिक्स केल्यानंतर भेगांना लावा
-हलक्या हाताने पायाला मसाज करा (Cracked Heels Care)
-रात्री झोपण्याआधी दररोज तुम्ही नाराळाचे तेल आणि एलोवेरा जेलचे मिश्रण पायांना लावून ठेवू शकता
-काही दिवसानंतर पायांना पडलेल्या भेगा कमी झाल्याचे दिसून येईल