Home » चीन मध्ये आढळलेला BF7 किती धोकादायक, काय आहेत लक्षणं? भारतात ही आढळली प्रकरणे

चीन मध्ये आढळलेला BF7 किती धोकादायक, काय आहेत लक्षणं? भारतात ही आढळली प्रकरणे

by Team Gajawaja
0 comment
COVID BF.7 Variant
Share

चीनमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. झिरो कोविड पॉलिसीत सूट दिल्यानंतर काही दिवसातच मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. चीनमधील कोरोनाच्या या महासंकटामागील कारण म्हणजे ओमिक्रॉनचा BF7 सब-वेरियंट असल्याचे मानले जात आहे. चीनमध्ये वेगाने हा वेरियंट पसरला जात आहे. याच दरम्यान भारतात सुद्धा या वेरियंटची चार प्रकरणे समोर आली आहेत. पण ही प्रकरणे आता नव्हे तर काही महिन्यांपूर्वी आली होती आणि त्यापैकी कोणीतेही प्रकरणात तो अॅक्टिव्ह नव्हता. हे पहिल्यांदाच होत नाही आहे की, जेव्हा ओमिक्रॉनच्या बीएफ ७ वेरियंट ऐवढा पसरला गेला आहे. ऑक्टोंबरमध्ये अमेरिका आणि काही युरोपातील देशांमध्ये सुद्धा या वेरियंटचे मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळले होते. (COVID BF.7 Variant)

ओमिक्रॉनचा BF.7 वेरियंट नक्की काय आहे?
प्रत्येक व्हायरस म्युटेट होते. उदारहणासाठी SARS-CoV-2 मूळ रुप असून त्याचे विविध वेरियंट्स आणि सब-वेरियंट्स आहेत. BF.7 BA.5.52.1.7 च्या समान आहे. जे ओमिक्रॉन सब-लिनिएज BA.5 चा सब-वेरियंट आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सेल होस्ट अॅन्ड माइक्रोब जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यालात असे म्हटले होते की, बीएफ.७ सब-वेरियंट मूळ D614C वेरियंटच्या तुलनेत ४.४ पट अधिक न्युट्रलाइजेशन प्रतिरोधी आहे. बीएफ.७ सर्वात लवचिक सब-वेरियंट नाही आहे. त्या अभ्यासात BQ.1 नावाचा अन्य एक ओमिक्रॉन सब-वेरियंट मध्ये १० पटीनेअधिक उच्च न्युट्रलाइजेशन रेजिस्टेंन्स असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. एका उच्च न्युट्रलाइजेशन रेजिस्टेंसचा अर्थ असा आहे की, कोणत्याही लोकसंख्येत वेरियंट पसरण्याची संभावना अधिक आहे. ऑक्टोंबर महिन्यात अमेरिकेत पाच टक्क्यांहून अधिक बीएफ.७ वेरियंटची प्रकरणे समोर आली होती. तर ब्रिटेनमध्ये हा आकडा ७.२६ टक्के होता. पश्चिम देशांसह संपूर्ण जगातील तज्ञ या वेरियंटवर सर्वात जवळून लक्ष ठेवून आहेत.

COVID BF.7 Variant
COVID BF.7 Variant

हे देखील वाचा- कर्नाटकातील ॲंन्टी हलाल बिल काय आहे?

लक्षणं काय आहेत?
कोरोना व्हायरसच्या नव्या सब-वेरियंट बीएफ.७ संदर्भात लोकांच्या मनात विविध प्रश्न उपस्थितीत राहत आहेत. या सब-वेरियंटच्या लक्षणांबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये सुद्धा संक्रमित लोकांना ताप, कफ, शरिर दुखणे यासारखी लक्षणं दिसून येतात. दरम्यान, हा एक अधिक वेगाने दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. याच कारणामुळे कमी वेळेत मोठ्या लोकसंख्येला तो संक्रमित करु शकतो. सीके बिरला रुग्णालय, गुरुग्राम मधील डॉ. रवींद्र गुप्ता यांचे असे म्हणणे आहे की, सध्या जगभरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तो पसरण्याची शक्यता अधिक आहे. त्यांनी पुढे असे म्हटले की, सध्याच्या काळात कोरोना व्हायरसने म्युटेट केले आहे आणि त्याचे बीएफ.७ रुप समोर आले आहे. चीनमध्ये याची अधिक प्रकरणे समोर आली आहेत. हा वेरियंट अधिक वैगाने परसण्यास सक्षम आहे. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, चीनमध्ये पुढील तीन महिन्यांमध्ये कोविडचे जेवढे नवे रुग्ण समोर येतील त्यापैकी ६० टक्के या वेरियंटची असतील.(COVID BF.7 Variant)

दरम्यान, केंद्र सरकारने चीन मधील कोरोनाची स्थिती पाहता काही महत्वाची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज्य सरकार स्थितीच्या मॉनिटरिंगसाठी टास्क फोर्स किंवा एका समितीचे गठण करणार असल्याचे म्हटले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.