जसे जसे तुमचे नाते अधिक घट्ट होत जाते आणि पुढे जाते तेव्हा पार्टनर आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा गंभीरतेने घेऊ लागतात. अशातच पैसे असो किंवा त्या संबंधित जबाबदाऱ्या अथवा कोणतीही गोष्ट. जेव्हा रिलेशनशिपमध्ये एकच पार्टनर पैसे कमावतो आणि गरजा पुरवतो तेव्हा दोघांच्या गरजा तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण दुसरा मात्र काहीच करत नसेल तर काही वेळेस विविध प्रश्न उद्भवतात की, मी एकट्यानेच का हे सर्व करायचे? अशा स्थितीत तुम्ही पार्टनर पासून दूर होऊ नका तर तुमच्यावरील समस्येला कसे दूर करता येईल ते पहा. त्यामुळेच आम्ही तुम्हाला अशा स्थितीत काय करावे याबद्दलच्या काही टीप्स सांगणार आहोत. जेणेकरुन तुमचे पार्टनरसोबतच्या नातेसंबंधात पैशावरुन होणारे वाद हे कमी होतील.(Couples argument over money)
रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. कारण त्याच गोष्टीवर तुमचे नाते दीर्घकाळ टिकू राहतो. मात्र नात्यात मी पणाची भावना आल्यास गोष्टी कठीण होतातच. त्याचसोबत तुम्ही कमावते असाल तर अधिकच समस्या येते. त्यामुळे दोघांमध्ये वाद ही निर्माण होतात. परंतु वाद घालण्यापेक्षा समजून घेऊन त्यावर तोडगा काढणे फार महत्वाचे असते.
हे देखील वाचा- परफेक्ट लाइफ पार्टनरच्या शोधात आहात तर ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा

नात्यात पैशांवरुन वाद होत असतील तर पुढील काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा
-सर्वात प्रथम दोघांमधील अंतर शोधा. तुमच्या पार्टनरमधील अशा काही गोष्टी शोधा जसे की, तो पैशांची बचत करण्यास किंवा पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवचो. त्यानुसार काही गोष्टी होत असतील तर उत्तमच. पण असे होत नसेल तर पैसे कमावण्यासह ते भविष्याच्या दृष्टीने बचत करण्यासाठी सुद्धा शिका. जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा जसा तुम्ही एकमेकांवर हक्क दाखवत पार्टनरला आपलेसे करता, त्याचप्रमाणे त्याच्या पैशांवर हक्क दाखवण्यापूर्वी आपण समजदारीने वागावे.
-दोघांचे जॉइंट अकाउंट काढून त्यात तुम्ही पैशांची बचत करु शकता. कारण जेव्हा तुमचा पार्टनर विनाकारण पैसे खर्च करत असेल तर तुम्हाला ते लगेच कळेल. अशातच तुमचे जर यावर लक्ष असेल तर पार्टनर कमी खर्च करण्याचा ही प्रयत्न करेल.
-जर एखाद्या ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन असेल तर तुमच्या खर्चाचे बजेट ठरवा. जेणेकरुन तुमच्या खिशाला अधिक फटका बसणार नाही आणि पैसे सुद्धा ठरवल्यानुसार खर्च करता येतील.
-दोघांपैकी एकावर कर्जाचा बोझा झाल्यास एकमेकांना दोष देण्याऐवजी ती समस्या कशी दूर करता येईल याकडे लक्ष द्या. तसेच या कर्जातून आपण लवकर कसे मुक्त होऊ यावर ही तोडगा काढा.(Couples argument over money)
-एकमेकांना समजू घ्या. जसे की, दोघांचा महिन्याभरात किती खर्च होते किंवा किती पैशांची बचत केली पाहिजे या गोष्टीवर ही चर्चा करणे फार महत्वाचे आहे. त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्या.