काही लोक आपले नाते दीर्घकाळ टिकवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतात. परंतु काही वेळेस अशी चुक होते की, त्यामुळे नाते तुटते किंवा तुटण्याच्या वाट्यावर येते.परंतु जर तुम्हाला वाटत असेल तुमचे नाते पार्टनर सोबत दीर्घकाळ टिकावे तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तसेच काही असे प्रश्न आहेत ते चुकून सुद्धा आपल्या पार्टनरला कधीच विचारु नका. अन्यथा तुमच्या नात्यात वाद सुरु होऊ शकतात.(Couple goal)
खरंतर कोणत्याही नात्याची सुरुवात ही विश्वासाने आणि पारदर्शकतेने व्हावी असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे कोणती ही गोष्ट आपल्या पार्टनरला अगदी मनमोकळेपणाने सांगताना कोणतेही दडपण वाटत नाही. मात्र काही प्रश्न असे आहेत जे तुमचे नाते अधिक घट्ट करण्याऐवजी तुटण्याच्या दिशेने तुम्हाला घेऊन जातील. त्यासाठीच आम्ही तुम्हाला अशा रिलेशनशिप टीप्स ज्या तुम्हाला दीर्घकाळापर्यंत तुमचे नाते टिकवण्यास नक्कीच मदत करतील.
-एक्स पार्टनर संबंधित प्रश्न
रिलेशनशिप हे दीर्घकाळ टिकवण्यासाठी काहीजण आपल्या एक्स पार्टनरबद्दल स्पष्टपणे सांगतात. मात्र वारंवार एक्स पार्टनर संदर्भातील प्रश्न विचारणे टाळा. खासकरुन मुली या आपल्या एक्स पार्टनर बद्दल अधिक भावनिक असतात. अशातच मुद्दाम एक्स पार्टनर बद्दल प्रश्न विचारणे हे तुमच्या पार्टनरचे मन दुखावू शकते. असे वेळोवेळी केल्यास तुमचे नाते तुटू शकते.
-मित्रमैत्रीणींच्या वारंवार चौकशा करणे
जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा पार्टनरसोबत सर्वकाही शेअर करतात. अशातच पार्टनरचा उत्तम मित्रमैत्रीणीसंबंधात काही वेळा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुमच्या पार्टनरच्या फ्रेंड सर्कलमुळे वाद निर्माण होऊ शकता. पण मित्रमैत्रीणींबद्दल आपल्या पार्टनरला स्पेस देण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या संदर्भात अधिक प्रश्न विचारणे टाळा.
हे देखील वाचा- पार्टनरसोबत छोट्या-छोट्या कारणांवरुन वाद होतात? ‘या’ काही गोष्टी लक्षात ठेवा

-सोशल मीडियाचे पासवर्ड
सोशल मीडियात जवळजवळ सर्वांचेच अकाउंट असते. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये आलात म्हणून पार्टनरकडे त्यांच्या सोशल मीडियाचे पासवर्ड मागण्याची चूक करु नका. तुमची ही वागणूक तुमच्या पार्टनरला हर्ट करु शकते. त्यामुळे पार्टनरला पर्सनल स्पेस देण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या फोनचा किंवा अकाउंटचे पासवर्ड मागू नका.(Couple goal)
-सॅलरी संदर्भातील प्रश्न
तुमचे नाते अधिक घट्ट बनवण्यासाठी तुमच्यामध्ये विश्वास असू द्या. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या पार्टनरला आवडणार नाहीत असे वागू नका. खासकरुन पार्टनरला कधीच त्याच्या सॅलरी संदर्भात प्रश्न विचारणे टाळा. तसेच त्यांच्या बँक खात्यात किती पैसे जमा आहेत आणि ते आपल्यावर त्याने खर्च करावेत असे तुम्हाला वाटत असेल तर ही मोठी चूक तुम्ही करत आहात.