मृत्यू कधी कोणाला आपल्या कुशीत घेईल, हे कोणालाच माहीत नाही. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, असा एक देश आहे जिथे माणसांच्या मृत्यूवर बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही, तर प्रशासनाने घातलेल्या बंदीमुळे येथे ७२ वर्षांपासून एकाचाही मृत्यू झालेला नाही. बसला ना धक्का! हे ऐकायला जरी विचित्र वाटत असले, तरी पूर्णपणे सत्य आहे. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल, की हे शक्य आहे का? हा विचित्र आदेश नॉर्वेजियन देशातील लोन्गिरब्येन या छोट्याशा शहरातील लोकांना देण्यात आला होता. (Longyearbyen Norway)
खरं तर, १९१७ मध्ये लोन्गिरब्येनमध्ये इन्फ्लूएंझामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या पार्थिवावर शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले. लोन्गिरब्येन हे शहर नॉर्वेच्या उत्तर ध्रुवावर आहे. (Longyearbyen Norway) ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे बहुतेक लोक येथे राहतात. या ठिकाणी वर्षभर खूप थंडी असते. यामुळे येथे दफन केलेले मृतदेह कधीही कुजत नाहीत किंवा खराब होत नाहीत. त्याच वेळी, इन्फ्लूएंझा विषाणूमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बाबतीतही असेच घडले. (Longyearbyen Norway)
हे देखील वाचा: केवळ ३ लोकांच्या लोकसंख्येने बनलाय ‘हा’ देश
साल १९५० मध्ये शास्त्रज्ञांना आढळले की, त्या व्यक्तीचा मृतदेह अजूनही तसाच पडून आहे. तसेच, त्यात इन्फ्लूएंझा विषाणू अजूनही जिवंत आहे. या इन्फ्लूएंझा विषाणूमुळे हा आजार पसरू शकतो, असे त्यांच्या लक्षात आले. या तपासणीनंतर प्रशासनाने या भागात लोकांच्या मृत्यूवर बंदी घातली आहे. त्याच वेळी, जर येथे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणार असेल किंवा त्याची आपत्कालीन परिस्थिती असेल, तर त्या व्यक्तीला हेलिकॉप्टरच्या मदतीने देशाच्या अन्य भागात नेले जाते. यासोबतच त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही केले जातात. (Longyearbyen Norway)
त्याच वेळी, या शहरात एक अतिशय लहान स्मशानभूमी आहे, ज्यामध्ये ७२ वर्षांपासून कोणीलाही दफन केलेले नाही. कारण इथे इतकी थंडी आणि बर्फ आहे की, इथे पुरलेले मृतदेह जमिनीत कुजत नाहीत आणि खराबही होत नाहीत. या शहराची लोकसंख्या सुमारे २००० आहे. त्याचबरोबर, रहिवाशांना प्राणघातक रोगांच्या प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी हे कायदे शहरात आजही लागू आहेत. (Longyearbyen Norway)