Home » जेव्हा एखादा देश दिवाळखोर होतो तेव्हा जनतेवर काय परिणाम होतो?

जेव्हा एखादा देश दिवाळखोर होतो तेव्हा जनतेवर काय परिणाम होतो?

by Team Gajawaja
0 comment
Country bankrupt effects
Share

श्रीलंका हा गेल्या ६ महिन्यापासून दिवाळखोर झाला आहे. या देशावर ५१ बिलियनचे कर्ज असून त्याची परतफेड सुद्धा त्यांना करता आलेली नाही. त्यामुळेच तेलासह सर्व गरजेचे सामान विदेशातून ही आयात करु शकत नाहीत. त्यामुळेच श्रीलंकेतील सामान्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत ही भरमसाठ वाढ झाली आहे. श्रीलंकेतील जनतेला दररोज आयुष्यात ज्या गोष्टींचा सामना करावा लागतो त्यामध्ये महत्वाच्या गरजा सुद्धा भागवता येत नाही आहेत. सर्वाधिक मुश्किल बाब अशी की श्रीलंकेत सर्वसामान्य रुपात कमी गोष्टींचे उत्पादन होते. त्यामुळे श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते आणि देश यावर सर्वाधिक अवलंबून आहे. प्रत्येक दिवस जगायचा कसा हे तेथील लोकांना कळत नाहीये. यामुळेच कोलंबो मध्ये मोठ्या प्रमाणात लोक राष्ट्रपती भवनात घुसले. त्याचसोबत आक्रमक झालेल्या लोकांनी पंतप्रधान रानिलसिंघे यांच्या घराला आग सुद्धा लावली. तर जाणून घेऊयात दिवाळखोर झालेल्या देशातील जनतेवर काय परिणाम होतात त्याबद्दल अधिक.(Country bankrupt effects)

-१४-१५ तास वीज कपात किंवा वीजेचा पुरवठा बंद
विजेसाठी तेल ते कोळश्याची गरज असते. जे श्रीलंकेत फार कमी आहे किंवा जवळजवळ संपुष्टात आले आहे. श्रीलंकेत कोळश्याचे उत्पादन होत नाही. ते विजेसाठी लागणारा कोळसा आणि तेल बाहेरुन मागवतात. त्यासाठी त्यांना तब्बल २५ लाख टन कोळश्याची आयात करावी लागते, जी परदेशी चलन नसल्याने पुर्णपणे संपत चालली आहे. सध्या त्यांना जो कोळसा मिळत आहे तो चीन आणि भारताकडून दिला जात आहे. दरम्यान, श्रीलंका दिवाळखोर होण्यापूर्वी त्यांनी घोषणा केली होती की, २०३० मध्ये वीजेसंदर्भात आत्मनिर्भर देश होईल. परंतु तेथीन नागरिकांनी सुद्धा सध्याच्या परिस्थितीचा कधीच विचार केला नव्हता.

-वीजेचा पुरवठा होत नसल्याने काय होतेय?
श्रीलंकेतील शहरात काही प्रमाणात वीजेचा पुरवठा होतोय पण गाव, जिल्हा आणि दूरदूरवरच्या क्षेत्रात तर अंधाराची स्थिती आहे. सध्या वीजेवर अधिक काम अवलंबून आहेत. त्यामुळे याचा थेट परिणाम रुग्णालय ते कार्यालय आणि शाळांच्या कामकाजावर होत आहे. तसेच वीज कपात केल्याने गरमीच्या दिवसात झोप पूर्ण होणे सुद्धा मुश्किल झाले आहे. रुग्णालयातील रुग्णांना समस्या येत असून ऑपरेशन ही थांबवण्यात आली आहेत. आपत्कालीन सेवेवर अत्यंत वाईट संकट आले आहे.

-तेल संपल्याने वाहतूक आणि महत्वाची कामे खोळंबली
श्रीलंका आतापर्यंत आपल्या गरजेपेक्षा अधिक तेल आयात करत होता. दरम्यान अत्यंत कमी प्रमाणात ते सुद्धा तेल काढतात पण ते आता सर्व थांबले आहे. पेट्रोल पंप बंद पडले आहेत. देशभरात प्रत्येक ठिकाणची वाहन तेथच्या तेथेच थांबलेल्या अवस्थेत आहत. श्रीलंकेत दररोज तेलाचा १२७००० बॅरल पुरवठा केला जातो. त्याचा एक चतुर्थांश भाग ते मागवताना सुद्धा त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरातून निघताना सुद्धा लोकांना वाहतूकीची साधन शोधावी लागत आहेत. घरात गॅस संपल्याने लोक लाकड आणि चुल्ह्याचा वापर करत आहेत.

हे देखील वाचा- श्रीलंकेतील आर्थिक अराजकतेची कारणं आणि सद्यस्थिती… 

Country bankrupt effects
Country bankrupt effects

-कशी सुधारेल तेलाची स्थिती
श्रीलंकेतील वृत्तपत्र डेली मिररने १२ जुलैला एक रिपोर्ट दिला आहे की, या महिन्याच्या अखेर पर्यंत पेट्रोल आणि डिझेल भरलेली चार जहाज ही श्रीलंकेत पोहचणार आहेत. त्यानंतर देशातील तेलाची समस्या दूर होऊ शकते.

-खाण्यापिण्याच्या वस्तूंची समस्या तर डाळी सुद्धा महागल्या

श्रीलंका आधी आपल्या गरजेपेक्षा कमी अन्नधान्याचे उत्पादन करत होता. पण जेव्हा पासून देशातील ऑर्गेनिक शेती करण्याचा कायदा तयार करण्यात आला तेव्हा शेती सुद्धा चौपट झाली. लोकांना नाश्ता तर सोडा जेवण सुद्धा मिळणे मुश्किल झाले. अशा परिस्थितीत लोक काम करत आहेत. कामागार हे एकत्रित मिळून जेवण बनवत आहेत. मुख्य रुपात नारळ आणि तांदूळ याचाच अधिक वापर केला जात आहे. खाण्यापिण्यामध्ये डाळींचे दर ही तुफान वाढले आहेत. डिझेल नसल्याने मच्छिमार समुद्रात सुद्धा आपली नाव घेऊन जात नाही आहेत, यामुळे माशांचा तुटवडा निर्माण झाला असून जरी ते मिळत असतील तरीही खुप महागले आहेत.

-आवाक्याबाहेर महागाई वाढली
श्रीलंका कंगाल झाला असल्याने तेथील महागाईचा फटका आता सर्वांनाच बसला आहे. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू सुद्धा दुप्पट-तिप्पट किंमतीने विक्री केल्या जात आहेत. महागाई सातत्याने वाढत आहे. सर्वकाही महागले आहे. अशा स्थितीत काळाबाजार आणि माफिया लोकांचा मोठा फायदा होत आहे.(Country bankrupt effects)

-औषधांचा तुटवडा
औषधांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. सर्वसाधारणपणे देशात सर्व औषध ही आयात केली जातात. देशात त्यांचे उत्पादन कमी होते. औषध ही मुख्यत्वे भारतातून आयात केली जात होती पण ते सुद्धा कमी झाली आहेत. मेडिकल स्टोअवर मोठ्या रांगा आणि औषध सुद्धा मिळत नाही आहेत.

-अर्थव्यवस्था
देशातील बदलत्या परिस्थितीमुळे दररोज कामगारांना रोजगारच मिळत नाही आहे. तर नोकरी करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्या सुद्धा जात आहेत. कारण त्यांना सॅलरी देणे कठीण होत आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये बेरोजगारी पूर्णपणे वाढत आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.