Home » कोरोना घालतोय आता ‘या’ देशांना विळखा

कोरोना घालतोय आता ‘या’ देशांना विळखा

by Team Gajawaja
0 comment
Corona Virus
Share

चीनमध्ये गेल्या आठवड्याभरात 13000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने अवघ्या चीनला भक्कम विळखा घातला आहे. आता या कोरोनाच्या लाटेमध्ये चीनमधील सुमारे 80 टक्के लोकांना संसर्ग झाला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तर ग्रामीण भागामध्ये या कोरोनाच्या विषाणूंचा प्रसार झाल्यास काय होईल, याबाबत चिंता व्यक्त केली आहे. चीनमधील ही परिस्थिती बघता, बीजिंगच्या 92% लोकसंख्येला जानेवारीच्या अखेरीस लागण होईल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. जेवढ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होईल, तेवढा तिथला मृत्यूदरही वाढत जाण्याचा धोकाही व्यक्त केला आहे. (Corona Virus)  

कोरोनाचा विळखा बसलेल्या चीनमधील परिस्थिती भविष्यात अधिक भयावह होत चालली आहे. चीनमध्ये कोविड महामारीमुळे एका आठवड्यात 13 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील बहुतांश जनतेला कोरोना झाला आहे. चीनमध्ये गाजलेले शून्य-कोविड धोरण जनतेमधील वाढता असंतोष वाढल्यावर मागे घेण्यात आले(Corona Virus)  . त्यानंतर 8 डिसेंबर ते 12 जानेवारी दरम्यान चीनमध्ये सुमारे 60,000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननेही चीनमध्ये वाढत असलेल्या मृत्यूसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सध्या चीनमधील दवाखाने आणि आपत्कालीन कक्ष येथे गंभीर स्थितीत कोविड रुग्णांची भरती होत आहे. यासोबत राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनमधील ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून चिंता व्यक्त करीत आहेत. चीनमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांना खुली सूट देण्यात आली. जवळपास दोन वर्षानंतर सर्व सीमा उघडण्यात आल्या. याचा फायदा घेत लाखो नागरिकांना प्रवास केला. आता तोच प्रवास चीनमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत भर टाकत आहे. शिवाय तेथील मृत्यूदरही वाढला आहे. असाच कोरोनाचा संसर्ग वाढत राहिला (Corona Virus), तर चीनमधील अर्थव्यवस्थेला जबर फटका बसू शकतो, असाही धोका व्यक्त करण्यात आला आहे.  

चीनमधील या नव्या आणि वेगानं पसरणा-या कोरोनाच्या झपाट्यानं अन्य देशांनाही पुन्हा कोरोनाच्या विळख्यात (Corona Virus) अडकवायला सुरुवात केली आहे. त्यात जपानचा नंबर पहिला लागला आहे.  जपानमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 12 दिवसांत येथे 5 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  महिनाभरात 8 हजार 103 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. एका महिन्यात मृत्यूचा हा नवा विक्रम आहे.  मृत्यू झालेल्यांपैकी नव्वादटक्के नागरिक हे साठी पार केलेले होती.  हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधनानुसार बीजिंगसह चीनच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वांनाच झाल्यासारखी परिस्थिती आहे.  चीनमधील चंद्र वर्षाच्या उत्सवा दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवास झाला आहे.  त्याचा परिणाम चीनला तर भोगावा लागत आहेच, शिवाय शेजारील राष्ट्रांवरही त्यामुळे कोरोनाची छाया पसरली आहे.  चंद्र नववर्षानिमित्त जगभरातून चिनी लोकांची ये-जा सुरू असते.  अशा परिस्थितीत अमेरिकेतही चीनमधून येणा-या पर्यटकांवर बंदी घालावी किंवा त्यांना आयसोलेशनचा पर्याय द्यावा असा प्रस्ताव आणण्यात आला होता.   स्वीडन, जर्मनी, मलेशिया, कतार, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मोरोक्को, फ्रान्स, यूके, स्पेन, अमेरिका, जपान, इस्रायल, भारत, इटली आणि दक्षिण कोरियाने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.  या देशात चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट दाखवावा लागतो.  

=======

हे देखील वाचा : येथे वर्षात दोनदा बदलली जाते घडाळ्याची वेळ… पण का?

======

सध्या चीनमधील कोरोनाची परिस्थिती ही 2020 या वर्षाची आठवण करून देण्यासारखी आहे.  तेव्हापासून शी जिनपिंग सरकारने कठोर नियम लागू केले होते. झिरो कोविड पॉलिसी आणली. अत्यंत कडक लॉकडाऊन चालू राहिले. सर्व दावे आणि आश्वासने देऊनही कोरोनावर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे शी जिनपिंग सरकारच्या धोरणावरही शंका व्यक्त करण्यात येत आहे. जगभरात दोन वर्षापूर्वी कोरोनानं थैमानं घातले होते. पण या महामारीला बहुतांश देशांनी आटोक्यात आणले.  आता जगभरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरु असतांना चीनमध्ये मात्र पुन्हा कोरोनाचा कहर (Corona Virus) सुरु आहे. ज्या देशांनी ही महामारी जगाला दिली तिथे अजूनही त्याचा प्रकोप सुरु असल्यानं धास्ती व्यक्त होत आहे. आता तर चीनमधील बहुतांश वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अनेक पॉझिटिव्ह डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करण्यास भाग पाडले जात असल्याचीही माहिती आहे. शिवाय मृत्यूंची संख्या वाढल्यानं मृतदेह ठेवण्यासाठीही जागा कमी पडत असल्याची भयावह परिस्थिती चीनमध्ये निर्माण झाली आहे. या परिस्थिबरोबर चीनमधील जनता झगडत आहे. मात्र जगभरात धास्ती व्यक्त होत आहे.  अशीच भयावह परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास सर्व अर्थव्यवस्था कोसळेल, अशी चिंता आहे. त्यामुळे चीनमधील पर्यटकांवर वेळीच रोख लावण्यासाठी सर्व देशांनी आपली कोरोना पॉलिसी कडक केली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.