कोविड-१९ नावाची महामारी पुन्हा येण्याची शक्यता आहे. यावेळी ही महामारी चीनच्या वाटेनं न येता, अमेरिकेतून येण्याचा धोका आहे. जागतिक महासत्ता म्हणवणा-या अमेरिकेमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढिस लागली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग इतका झाला आहे की गेल्या महिन्यात आठपट अधिक कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. शिवाय या रुग्णांना आयसीयुमध्ये दाखल करण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभाग रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या घेत नाही. तर अमेरिकेत आता रोजच्या चाचणीऐवजी सांडपाण्याच्या पाण्यातून कोरोना रोगाचा संसर्ग किती झाला आहे, हे मोजण्यात येते. त्यातून अमेरिकेत कोरोनाचे तीन प्रकार सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे. कोरोनाच्या बदलत्या स्वरूपामुळे लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचा प्रसार असाच होत झाला तर पुढच्या काही महिन्यात अमेरिका पुन्हा कोरोनाच्या छायेखाली जाण्याची शक्यता आहे. शिवाय अमेरिकेतून हा रोग पुन्हा जगभर पसरण्याचीही भीती व्यक्त कऱण्यात आली आहे. (Corona In America)
कोविड महामारीने अमेरिकेत पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. अमेरिकेमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण वाढले असून त्यासंदर्भात आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अमेरिकेत पुढच्या दोन महिन्यात निवडणुका येत आहेत. त्यातच ख्रिसमस आणि इअरएन्डचेही तिथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात. यावेळी हजारो नागरिक एकत्र येतात. अशावेळी वाढत असलेल्या कोरोनाचे घातक परिणाम अमेरिका आणि त्यातून जगावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या दोन वर्षांत अमेरिकेत सर्वाधिक कोविड रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन तर्फे सांडपाण्याची चाचणी करण्यात येते. त्यातून अमेरिकेत कोविड-१९ ची मोठी लाट सुरू असल्याचे धक्कादायक अहवाल पुढे आला आहे. याचाच अर्थ अनेक नागरिक घरातूनच कोरोनावर उपचार करत आहेत. या नागरिकांच्या घरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावरून हे उघड झाले आहे. या सांडपाण्यातील विषाणूजन्य क्रियाकलाप गेल्या दोन वर्षांत उच्च पातळीवर पोहोचला आहे. (Corona In America)
जगभरात जेव्हा कोविड-१९ साथीचे थैमान होते, त्यापेक्षा हे प्रमाण तब्बल आठ टक्के अधिक असल्यानं वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यात चिंतेची अधिक गोष्ट अशी की, नागरिकांची रोगप्रतिकार क्षमताही कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशावेळी कोरोना रोगाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. ज्या संस्थेतर्फे सांडपाण्याच्या पातळीवरुन हा अहवाल देण्यात आला आहे, त्या सीडीसीने देशभर कोविडची पातळी आणखी वाढू शकते, असा इशारा दिला आहे. या संस्थेचे डॉ. जोनाथन योडर यांनी यासंदर्भात आत्तापासून काळजी घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. गेल्यावर्षीही अमेरिकेत कोरोनाची लाट आली होती. मात्र यावर्षी ही लाट अधिक लवकर येण्याची शक्यता आहे. यावर्षीचा अहवाल बघता अमेरिकेत सप्टेंबर महिन्यात कोरोनाची लाट पिकवर जाण्याची शक्यता आहे. (Corona In America)
======
हे देखील वाचा : जेव्हा आदिवासींनी ब्रिटिशांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं !
======
त्यातून अमेरिकेतील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या मृत्युदरातही वाढ होत आहे. अमेरिकेत घरात राहून कोरोनावर उपचार घेणा-या नागरिकांची संख्या मोठी आहे. अशामुळे सरकाराला योग्य आकडेवरी ठेवण्यास अडचण होत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे, या देशात एकाचवेळी कोरोनाचा उद्रेकही होऊ शकतो, असा इशारा जाणकारांनी दिला आहे. बहुतांश रुग्ण हे अतिधोकादायक स्थितीत आल्यावर रुग्णालयांमध्ये जात आहेत, त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तपासणीनुसार मे महिन्यापासून अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णात वाढ होऊ लागली आहे. मे महिन्यात जिथे हे प्रमाण एक टक्का होते, ते आता आठ टक्क्यावर पोहचले आहे. अमेरिकेत निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर मध्ये होणा-या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सभा आणि मेळावे होत आहेत. यासाठी हजारो नागरिक एकत्र येत आहेत. यातून हा संसर्ग वाढल्यास कोरोनाला अटकाव करणे कठिण जाईल, असा इशारा आहे. मुख्य म्हणजे, अमेरिकेत कोरोनालसीचे लसीकरणही किती झाले, याची अचूक आकडेवारी नाही. ही सर्व काळजीकरणारी स्थिती असल्याचे आरोग्यतज्ञांनी सांगितले आहे. (Corona In America)
सई बने