क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज यालाच सीओपीडीच्या (COPD) नावाने ओळखले जाते. हा एक फुफ्फुसासंदर्भातील एक आजार आहे, ज्यामध्ये एम्फाइजिमा आणि ब्रोंकाइटिस सारख्या स्थितीत फुफ्फुसांवर फार मोठा प्रभाव होतो. एम्फाइजिमा फुफ्फुसांना संक्रमित करुन श्वास घेण्यास समस्या निर्माण करतो. त्याचसोबत ब्रोंकाइटिस ब्रोन्कियल नळ्यांमध्ये सूज आणि त्या गोठण्याचे कारण ठरु शकतात. सीओपीडीच्या रोगी आजारी पडल्याने त्यांनी श्वास घेणे, खोकला आणि गळ्यात दुखणे अशा स्थितींचा सामना करतो. सीओपीडीचे मुख्य कारण स्मोकिंग आणि अस्थमा असू शकते. हेल्थ रिपोर्ट्सनुसार, जगभरात काही मिलियन लोक सीओपीडी ग्रस्त आहेत. तर जाणून घेऊयाची याची लक्षण, कारणे आणि उपायांबद्दल अधिक.
सीओपीडीची मुख्य कारणे
-हेल्थलाइन डॉट कॉममुसार सीओपीडी ४० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांमध्ये खुप दिसतो. ज्यामध्ये धुम्रपान हे एक मुख्य कारण आहे. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, सीओपीडीचा सर्वाधिक धोका अशा लोकांना असतो जे अधिक प्रमाणात स्मोकिंग किंवा तंबाखूचे सेवन करतात.
-अस्थमाच्या रुग्णांना सुद्धा सीओपीडीचा धोका असू शकतो. त्याचसोबत शरिरात अल्फा-१-एंटीट्रिप्सिन नावाचे प्रोटीनची कमतरता असणे सुद्धा एक कारण आहे.
-अधिक लोकसंख्या आणि धुळीच्या संपर्कात राहिल्याने किंवा केमिकलच्या फॅक्ट्रीत काम केल्याने सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते.
सीओपीडीची लक्षण
सीओपीडीच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये खोकला होणे, घसा दुखणे, फुफ्फुसे भरुन येणे आणि चक्कर आल्यासारखे वाटणे यांचा समावेश असतो. मात्र सीओपीडीची लक्षण हळूहळू गंभीर होण्यास सुरुवात होते. पुढील काही लक्षण सुद्धा असू शकतात.
-हलक्या स्वरुपात फिजिकल अॅक्टिव्हिटीनंतर श्वास घेण्यास त्रास होणे
-छाती भरुन येणे किंवा श्वास घेताना विचित्र आवाज येत असल्यासारखे वाटणे.
-जोरजोरात खोकला येणे, फ्लू आणि रेस्पिरेटरी इंफेक्शन होणे
-वेळोवेळी थकवा जाणवणे
-गंभीर स्थितीत पाय आणि पजांना सूज येणे आणि वजन वेगाने वाढणे
हे देखील वाचा- भारतात वर्षभरात १८ टक्क्यांनी वाढलेत टीबीचे रुग्ण, कसा कराल बचाव?
सीओपीडी (COPD) पासून कसा कराल बचाव?
सीओपीडीसाठी कोणतीही चाचणी किंवा उपचार नाही. पण याचा अंदाज केवळ लक्षण पाहून केला जातो. त्यासाठी सीओपीडीसारखी लक्षण दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा आणि आपली स्थिती सांगा.
-जर तुम्हाला स्मोकिंगची सवय असेल तर ती कमी करा
-परिवारात एखादा सीओपीडीपासून पीडित असेल
-अस्थमा किंवा कोणत्याही प्रकारच्या रेस्पिरेटरी इंन्फेक्शनमुळे ग्रस्त आहे
दीर्घकाळापासून खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नये. कारण ही सीओपीडी सारख्या गंभीर स्थितीतील लक्षण असू शकतात. अशा स्थितीत लगेच उत्तम डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.