Cooking Tips : जेवणाची मजा अशावेळी येते जेव्हा पदार्थ संतुलित असते. अशातच जेवणात एखादा इंग्रीटिएंट अत्याधिक झाल्यास पदार्थाची चव बिघडली जाते. तुमच्यासोबत कधी भाजीत आंबटपणा अधिक झाला आहे का? यावर कोणत्या ट्रिक्स वापरल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेऊया…
गुळाचा वापर
पदार्थामध्ये आंबटपणा अधिक झाला असल्यास त्याला गोडसरपणा येण्याासाठी गुळाचा वापर करू शकता. यासाठी साखर, गुळ अथवा मध वापरू शकता. गुळ वापरायचा नसल्यास ब्राउन शुगरचाही पर्याय निवडू शकता. यामुळे चव वाढण्यासह पदार्थामधील आंबटपणा कमी होतो.
डेअरी प्रोडक्ट्सचा वापर
दह्यामुळे आंबटपणा येते. पण यामुळे आंबटपणा दूरही होऊ शकतो. पदार्थ आंबट झाला असल्यास त्यामध्ये दह्यामध्ये अर्धा कप दूध मिक्स करुन वापरावे. यामुळे पदार्थातील आंबटपणा कमी होण्यास मदत होते. याशिवाय फ्रेश क्रिमचाही वापर करू शकता.
भाज्या वाढवा
पदार्थ अथवा भाजी आंबट झाल्यास त्यामध्ये अधिक भाज्या टाकू शकता. यामुळे पदार्थामधील आंबटपणा दूर होईल. याशिवाय पदार्थ भाज्या वाढवल्यानंतर व्यवस्थितीत शिजवून घ्या.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा आपल्या अॅसिडिट नेचरमुळे लोकप्रिय आहे. बेकिंगमध्ये याचा वापर केला जातो. करीमध्ये चिमूटभर बेकिंग सोडा व्यवस्थितीत मिक्स करा. अत्याधिक प्रमाणात बेकिंग सोडा वापरू नका. पदार्थातील आंबटपणा बेकिंग सोड्यामुळे दूर होऊ शकतो. (Cooking Tips)
नारळाची पेस्ट
नारळाची पेस्टमुळे आंबटपणा दूर होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय चवही वाढू शकते. क्रिमी टेक्चरसाठी ताजी आणि सुकं खोबर वाटून त्याची पेस्ट तयार करा. हीच पेस्ट पदार्थात टाकल्याने त्यामधील आंबटपणा दूर होईल.