ब्रिटनचे राजघराणे हे जगातील सर्वात जुने, श्रीमंत आणि लोकप्रिय राजघराणे म्हणून ओळखले जाते. मात्र आता त्याच राजघराण्यातील महिलांचा वाद अक्षरशः चव्हाट्यावर आला आहे. ब्रिटनच्या राजघराण्याची कमान राजा चार्ल्स तिसरा यांच्या हातात आहे. पण या वादावर त्यांच्याकडेही काही उपाय नसल्यामुळे त्यांची गोची झाली आहे. तर दुसरीकडे या वादासाठी स्वतः राजे चार्ल्सच जबाबदार असल्याची भूमिका राजघराण्यातील अन्य सदस्यांनी घेतल्यामुळे ब्रिटनचे राजे चार्ल्स आणि त्यांची पत्नी राणी कॅमिला हे एकटे पडल्याचे दृश्य आहे. ब्रिटनचे राजे चार्ल्स यांनी आपली प्रेयसी असलेल्या कॅमिला पार्करसोबत लग्न केल्यापासून ब्रिटनच्या राजघराण्यात वाद सुरु झाला आहे. प्रिन्सेस डायना यांच्या मृत्यूनंतर चार्ल्स यांनी 9 एप्रिल 2005 रोजी कॅमिला पार्करसोबत लग्न केले. या लग्नाला राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा विरोध होता. मात्र चार्ल्स यांच्या आग्रहापुढे हार मानत राणीनं या लग्नाला होकार दिला आणि कॅमिला राजघराण्याचा भाग झाली. मात्र लग्नाच्यावेळी घातलेल्या पोशाखावरुनच कॅमिला राजघराण्यात तेढ निर्माण करणार अशी चर्चा सुरु झाली होती. कॅमिला यांनी लग्नात तिच्या पहिल्या नव-यापासून झालेल्या मुलांची आणि नातवंडांची नावे डिझाईन करुन घेतली होती. यानंतर तिच्या मुलांचा राजघराण्यातील समारंभात वावर वाढला, हेच कारण चार्ल्स यांची मुले, प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी यांना खटकू लागले. पुढे राणीच्या मृत्यूनंतर वयाच्या 73 व्या वर्षी चार्ल्स हे ब्रिटनचे नवे राजे झाले. (Britain)
त्यांच्यासोबत राणीपदाचा मान कॅमिला हिला मिळाला. राजकुटुंबात मान मिळत नसला तरी कॅमिला हिला तिच्या पदामुळे राजानंतरचा अधिकार प्राप्त झाला. या सर्वात प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेघन मार्कल राजघराण्यापासून वेगळे झाले. प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी राजकुमारी केट यांना राजगादीचा वारस मानण्यात येते. या जोडप्याला तीन मुले असून ही तीनही मुले राजगादीची वारस आहेत. यासोबतच राजा चार्ल्स यांची बहिण प्रिंसेस अँन हिची भूमिकाही महत्त्वाची आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय हिने तिच्या पश्चात तिच्या सर्व दागिन्यांची वारस म्हणून प्रिन्सेस शॉर्लेट हिचे नाव नोंदवले. प्रिन्सेस शॉर्लेट ही प्रिन्स विल्यमची द्वितीय कन्या आहे. सध्या राजघराण्यातील सर्वात श्रीमंत मुलगी म्हणून तिला मान मिळाला आहे. यावरुन राणी कॅमेलानं नाराजी व्यक्त केली. राणीच्या दागिन्यावर आपला हक्क असल्याचे विधान तिने केले आणि ही राजघराण्यातील नाराजी पहिल्यांदा जनतेसमोर आली. यासर्वात राजा चार्ल्स आणि राजकुमारी केट मिडलटन या दोघांनाही कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले. राजपरिवारातील सोहळे आणि अन्य समारंभातून यावेळी या दोघांनीही रजा घेतली. (International News)
राजा चार्ल्स यांच्या अनुपस्थित राणी कॅमिला यांच्यावर जबाबदारी आली. तर केटच्या अनुपस्थित तिच्या तिन्ही मुलांची जबाबदारी काहीवेळा कॅमिला यांच्याकडे आली होती. यावेळी कॅमेला यांनी छोट्या शॉर्लेटला हटकल्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर आले आणि खळबळ उडाली. यामुळे या तीनही मुलांची जबाबदारी राजकुमारी अँन यांच्याकडे आली. राणी कॅमिलावर चोहोबाजुनं टिका होऊ लागली. त्यातच राजकुमारी अँन यांनी आपला राजकुमारी किताब आपल्या पश्चात शॉर्लेटकडे जाणार असल्याचे स्पष्ट केले. या सर्वात राणी कॅमिला यांना राजघराणे आपल्यावर कुरघोडी करत असल्याची जाणीव झाली. राजा चार्ल्सही या सर्वात हतबल ठरला कारण राजघराण्यावर राणी एलिझाबेथनंतर राजकुमारी अँनही वर्चस्व असल्याची माहिती आहे. आता राजकुमारी केट ही आजारपणातून सावरली आहे. त्यानंतर ती ज्या पहिल्याच कार्यक्रमाला उपस्थित होती, त्या कार्यक्रमासाठी तिनं आपल्या सासूची, म्हणजे, प्रिन्सेस डायनाची ज्वेलरी निवडली होती. प्रिन्सेस डायनाचे हि-यांचे डूल आणि गळ्यातील लॉकेट घालून केट आली होती. केटन राणी कॅमिला हिला अप्रत्यक्ष आपल्या मनात अद्यापही प्रिन्सेस डायनाबद्दल आदरभाव असल्याचा इशारा दिल्याचे हे सचूक मानले गेले. (Britain)
=====
हे देखील वाचा : अमेरिकेच्या एका निर्णयानं या देशांमध्ये थरकाप !
========
या सर्वसमारंभात केट आणि प्रिन्सेस अँन यांच्यापासून राणी कॅमिला वेगळी पडल्याचे दृश्य टिपण्यात आले. प्रिन्स विल्यमही शाही समारंभात राणी कॅमिलापासून अंतर राखून बोलत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरुन या शाही कुटुंबातील वाद सर्वोमुख झाला. यातच भर पड़ली ती युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधील एका समारंभाची. यात कॅमिला यांना युनायटेड किंगडममधील साहित्याच्या प्रचारासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल साहित्याचे मानद डॉक्टरेट प्रमाणपत्र प्रदान केले गेले. यावेळी राजकुमारी अँनही उपस्थित होती. राजघराण्याची मुळ सदस्य असलेल्या राजकुमारी अँनचा दबदबा खूप आहे. मात्र आता तिच्यापेक्षा वरचा हुद्दा कॅमिलाला असल्यामुळे प्रथम तिला मान देण्यात आला. पण या सर्व रुढींमध्ये 77 वर्षिय कॅमिला अतिशय गोंधळलेली दिसली. राजकुमारी अँनबाबतचे दडपण तिच्या चेह-यावर जाणवत होते. या सर्वात दोघीही एकमेकींसोबत बोलतानाही दिसल्या नाहीत. त्यावरुन राजघराण्यातील या महिलांच्या वादाची चर्चा सुरु झाली आहे. (International News)
सई बने