भारताच्या राजकरणात आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा मुद्दा म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल असे ठरल्याचे मानले जात आहे. मात्र आता हे पाहणे फार महत्वाचे ठरणार आहे की, खुप वर्षानंतर गांधींशिवाय अध्यक्षच्या रुपात कोणाला पक्षाची कमान मिळणार. खरंतर दीर्घकाळापासून काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली नव्हती. परंतु आता २२ वर्षानंतर होणार आहे. जेव्हा निवडणूका व्हायच्या तेव्हा त्यांचे निकाल फार हैराण करणारे असायचे. याच पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी कोण कोण दावेदार राहिले होते त्याबद्दल सांगणारच आहोत. त्याचसोबत जेव्हा गांधी-नेहरुंचा पराभव झाला होता त्यावेळी नक्की काय घडले हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. (Congress President)
सुभाष चंद्र बोस विरुद्ध पट्टाभि सीतारमैया
काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीबद्दल बोलायचे झाल्यास स्वातंत्र्याच्या सुद्धा आधी काही वर्ष १९३९ पासून सुरु करुयात. या वर्षी सुभाष चंग्र बोस यांनी अध्यक्ष पदासाठी पट्टाभि सीरमैया यांच्या विरोधात निवडणूक लढायची होती आणि ते जिंकले. असे म्हटले जाते की, त्यावेळी सीतारमैया हे महात्मा गांधींना समर्थन देणारे उमदेवार होते. मात्र ते त्या पदामुळे नाखुश असल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मार्च मध्येच राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष बनवण्यात आले. त्यानंतर १९४०-४६ पर्यंत अब्दुल कलाम आजाद, १९४६-४७ मध्ये जेबी कृपलानी अध्यक्ष राहिले होते. त्यानंतर सुरुवात होते ती म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा काळ.
पुरुषोत्तम टंडन विरुद्द जेबी कृपालानी
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, जेव्हा देश स्वातंत्र्य झाला त्यानंतर पट्टाभि सीतारमैया यांच्या हाती काँग्रेसची कमान होती. मात्र वर्ष १९५० मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणूकीत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी जेबी कृपालानी यांना समर्थन दिले आणि त्यांच्या समोर उभे होते पुरुषोत्तम टंडन. नेहरुंच्या समर्थनानंतर सुद्धा जेबी कृपालानी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता आणि टंडन यांचा विजय झाला होता.
त्यानंतर वर्ष १९५१ मध्ये बातमी आली की, नेहरु सीडब्लूसीचा राजीनामा देऊ शकतात आणि समोर स्वातंत्र्य भारतापूर्वी सार्वत्रिक निवडणूका होत्या. अशातच टंडन यांनी स्वत: पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नेहरु पक्षाचे अध्यक्ष झाले. वर्ष १९५४ पर्यंत ते अध्यक्ष पदाची कमान सांभाळत होचे मात्र युएन धोबार, इंदिरा गांधी, नीलम संजीव रेड्डी सारख्या नेत्यांच्या हाती काँग्रेसची कमान होती.(Congress President)
नीलम संजीव रेड्डी विरुद्ध वीवी गिरी
त्यानंतर १९६७ ते १९७७ चा काळ, जो इंदिरा गांधींचा होता असे म्हटले जाते. या काळात काँग्रेसमध्ये खुप बदल झाल्याचे दिसून आले होते. १९६८ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झालेले एस निजलिंगप्पा त्यांच्यासोबत त्यांचे फार मतभेद राहिले. त्यानंतर काँग्रेस तुटली. खरंतर १९९९ मध्ये एक निवडणूक झाली होती, त्यामध्ये नीलम संजीव रेड्डी हे अधिकृत काँग्रेसचे अध्यक्ष झाले होतो. इंदिरांनी वीवी गिरी यांना समर्थन दिले आणि त्या जिंकल्या. त्यानंतर कटु निजलिंगप्पांनी पंतप्रधान इंदिरांची हकालपट्टी केल्याने काँग्रेसचे काँग्रेस (ओ) आणि काँग्रेस (आय) मध्ये विभाजन झाले होते. तर इंदिरांच्या गटाने जगजीवन राम यांचा अध्यक्ष म्हणून निवडले आणि ते १९७ २ पर्यंत अध्यक्ष राहिले.
इंदिरा आणि संजीव यांचा काळ
जगजीवन राम यांच्यानंतर दयाल शर्मा आणि नंतर देवकांत बरुआ अध्यक्ष झाले. नंतर वर्ष १९७८ मध्ये इंदिरा गांधी अध्यक्ष झाल्या आणि १९८४ मध्ये त्यांच्या हत्येपर्यंत त्या अध्यक्षाच होत्या. नंतर राजीव गांधींना काँग्रेसची कमान मिळाली आणि वर्ष १९९१ मध्ये जेव्हा त्यांची हत्या झाली तो पर्यंत ते अध्यक्ष राहिले. त्यानंतर नरसिम्हा राव पीएम यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष ही झाले. दरम्यान, काँग्रेसमध्ये सर्वकाही ठिक नव्हते.
सीताराम केसरी विरुद्ध शरद पवार, राजेश पायलट
१९९६ मध्ये राव यांनी पदाचा राजीनामा दिला आणि सीताराम केसरी यांच्यासाठी मार्ग मोकळा केला.त्यांनी आधी दोन दशकापर्यंत पक्षाच्या कोषाध्यक्षच्या रुपात कार्य केले होते. मात्र त्यांच्या समोर शरद पवार आणि राजेश पायलट हे निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सीताराम केसरी या निवडणूकीत जिंकले. ते काँग्रेस मधील गांधी शिवाय राहिलेले अध्यक्ष होते. (Congress President)
हे देखील वाचा- इटलीमध्ये आता जॉर्जियाराज मेलोनी आणि हुकुमशहा बेनितो मुसोलिनी यांच्या नावाची चर्चा
सोनिया गांधी विरुद्ध जितेंद्र प्रसाद
वर्ष १९९८ मध्ये काँग्रेसची कमान सोनिया गांधी यांना मिळाली. जेव्हा १९९८ मध्ये जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी झाल्या तेव्हा काही नेतेमंडळी नाराज झाली होती. त्यामध्ये जितेंद्र प्रसाद यांचा सुद्धा समावेश होता. या लिस्टमध्ये शरद पवार, पीएम संगमा आणि तारिक अनवर यांचे सुद्धा नाव होते, जे काँग्रेस मधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. राजेश पायलट यांच्या निधनानंतर जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधींना आव्हान दिले. पण निकाल हा सर्वांना हैराण करणारा होता.
त्यांनी सोनिया गांधींच्या तुलनेत अध्यक्षपदासाठी उभे राहिले होते. वर्षाच्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर मध्ये निवडणूका झाल्या आणि त्यांचा अत्यंत वाईट पराभव झाला. निवडणूकीत एकूण ७५४२ मतं पडली, त्यापैकी फक्त ९४ मतं त्यांना मिळाली होती आणि सोनिया गांधी दीर्घ मतांच्या अंतराने जिंकल्या होत्या.