Home » पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वाटले गेले २ लाख कंडोम ?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वाटले गेले २ लाख कंडोम ?

by Team Gajawaja
0 comment
Paris Olympic 2024
Share

सध्या सर्वत्र पॅरिस ऑलिम्पिकची लहर आहे, त्यातच भारताने दोन ब्रॉंझ मेडल जिंकून दमदार कामगिरी केली आहे. इतिहासात पहिल्यांदा ऑलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी नदीवर करण्यात आली. पॅरिसच्या सीन नदीवर हा दिमाखदार सोहळा रंगला होता. मात्र या सोहळ्यात ड्रॅग क्वीन्स आणि वेगवेगळ्या डान्सर्सचाˈटॅब्लो’ होता. याशिवाय LGBTQ कम्युनिटीचा सहभाग या सोहळ्यात पाहायला मिळाला. त्यामुळे अनेकांनी पॅरिस ऑलिम्पिकवर टीका केली. या सोहळ्यात धार्मिक प्रतिमांचा वापर केल्याचा आरोप आयोजकांवर करण्यात आला आहे. मात्र एका गोष्टीची सर्वात जास्त चर्चा होती, ती म्हणजे कंडोम वाटप ! पण असं कंडोम वाटप पहिल्यांदा झाल आहे का? (Paris Olympic 2024)

१९८८ साली जगभरात एड्स एचआयव्ही ने थैमान घातलं होतं. त्याच काळात, ऑलिम्पिक स्पर्धा साऊथ कोरियाच्या Seoul शहरात भरवण्यात आली होती. सुरुवातीला, या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंची एचआयव्ही या आजाराची चाचणी करण्यात येणार होती, पण काही कारणासत्व ही चाचणी रद्द करण्यात आली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सर्व खेळाडूंना Unprotected Sex चे धोके सांगणारी पत्रके आणि सोबत कंडोम पुरवले. त्यामुळे एकीकडे एड्स एचआयव्ही या आजाराबद्दल जनजागृती सुद्धा झाली आणि खेळाडूही सुरक्षित राहीले. (Paris Olympic 2024)

नंतर ऑलिम्पिक आयोजकांनी ही परंपरा कायम राखत १९९२ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंसाठी ३६,००० कंडोम मोफत वाटले, तर इतर कर्मचाऱ्यांसाठी अंदाजे २ डॉलर प्रति पॅक अशी किमंत ठेवली. मनोरंजक गोष्ट म्हणजे कंडोम ऑलिम्पिक रिंगच्या रंगांशी देखील मिळतेजुळते होते. पुढे, कंडोम वाटण्याची प्रथा गरज बनली कारण, २००० साली ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंसाठी ठेवण्यात आलेला ५०,००० कंडोमचा साठा इतक्या वेगाने कमी झाला की समारोप समारंभाच्या काही दिवस अगोदर अतिरिक्त २०,००० कंडोम उत्पादकांना पाठवावे लागले होते.

आताच्या प्रचलित असलेला कंडोम ब्रॅंड ड्युरेक्सने २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकसाठी पुरवठादार म्हणून पदभार स्वीकारला आणि १,३०,००० कंडोम पॅकेट्स प्रदान केले. पण २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कंडोम वाटपाचे सर्व रेकॉर्डस मोडले गेले, तेव्हा 4,50,000 कंडोम खेळाडूंमध्ये वाटण्यात आले ज्यामध्ये १0,00,00 महिलांचे कंडोम होते आणि हे ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं. (Paris Olympic 2024)

==================

हे देखील वाचा : शूटिंग प्रकारात पदक जिंकणारी भारताची पहिली महिला !

================

पण २०२० च्या टोकीयो ऑलिम्पिकमध्ये कोरोना महामारीमुळे इंटमसीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे १५०,००० कंडोम वाटून सुद्धा त्याचा वापर न करण्याचे आदेश खेळाडूंना देण्यात आले होते. शिवाय खेळाडूंना झोपण्यासाठी अॅंटी सेक्स बेड देण्यात आले होते, त्याला कार्डबोर्ड बेड असही म्हणतात. त्या बेडवर फक्त एकच जण झोपू शकतो. असेच बेड २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा देण्यात आले, त्यामुळे खेळाडूंकडुन याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. जर खेळाडू शांतपणे झोपू शकत नसतील, तर ते चांगली कामगिरी कशी करू शकतील, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

सोबत असाही प्रश्न विचारला गेला की, कंडोम वाटपाची गरज काय ? कारण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २ लाखाच्यावर कंडोम वाटण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक खेळाडूला 20 पॅकेट देण्यात आले आहेत.बऱ्याच जणांना असं वाटत की कंडोम खेळाडूंना सेक्ससाठी वाटले जातात. पण खरतर खेळाडूंना कोणत्याही लैंगिक आजारा पासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि एचआयव्ही आणि एड्सबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी खेळाडूंना कंडोम वाटले जातात, ज्यामध्ये काहीच गैर नाही. (Paris Olympic 2024)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.