आपण ज्यावेळी महामार्गांवरुन प्रवास करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी सातत्याने दिसतात. जसे की, टोल नाका किंवा रस्त्याच्या बाजूला असलेले रंगीत माइलस्टोन दगडं. या दगडांवर तुम्हाला ज्या ठिकाणी पोहचायचे आहे किंवा तुम्ही जाणार असता त्याचे अंतर किती किमी अजून दूर आहे हे लिहिलेले असते. मात्र या दगडांचा रंग आपण पाहतो की, वेगवेगळा असतो. कधी ते पिवळ्या रंगाचे, हिरव्या रंगाचे तर कधी ऑरेंज रंगांमध्ये दिसतात. पण तुम्हाला कशी असा प्रश्न पडला आहे का, की या दगडांवर फक्त माहिती लिहिण्याऐवजी त्यांना रंगीत का केलेले असते? आज त्याचबद्दल आपण आज अधिक जाणून घेणार आहोत. (Colorful stones on highway)
सर्वात प्रथम जाणून घेऊयात पिवळ्या रंगाची म्हणजेच पिवळ्या रंगाच्या माइलस्टोनची. महामार्गांवर हे सर्वाधिक आपल्याला दिसून येतात. त्यांना राष्ट्रीय महामार्गांवर लावले जाते. ते अशा महामार्गांवर असतात जी ठिकाणं शहर आणि राज्यांना जोडली जातात. त्यांची देखरेख आणि डागडुगी करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची असते.
राष्ट्रीय महामार्ग म्हणजे काय?
राष्ट्रीय महामार्ग म्हणजे ज्याची डागडुजी आणि बांधकामाची जबाबदारी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ची असते. आपल्या देशात NH 24, NH 8, NH 6 सारखे काही नॅशनल हायवे आहेत.
जर तुम्हाला ग्रीन स्ट्रिप असलेले माइलस्टोन दिसल्यास ते असे दर्शवतात की, तुम्ही राज्याच्या महामार्गावर आहात. जर एखादा महामार्ग किंवा रस्ता सरकारकडून बनवला गेला असेल तर त्या ठिकाणी हा माइलस्टोन दिसतो. तो असे सांगतो की, या महामार्गाची जबाबदारी ही राज्य सरकारच्या हातात आहे. हे महामार्ग राज्यातील एका शहराला दुसऱ्या शहराशी जोडतात.(Colorful stones on highway)
राज्य महामार्ग म्हणजे काय?
राज्यातील महामार्गाची निर्मिती आणि देखभालची जबाबदारी राज्य सरकारची असते. खासकरुन राज्यात प्रवेश केल्यानंतर विविध शहरांमध्ये जाण्यासाठी या महामार्गांचा वापर केला जातो.
त्याचसोबत तुम्हाला काळा, निळ्या स्ट्रिपचा माइलस्टोन दिसल्यास त्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात किंवा जिल्ह्यात प्रवेश करत आहात. या रस्ता एखाद्या ठरवल्या गेलेल्या जिल्ह्यात किंवा शहरात येतो. याच्या देखरेखीची जबाबदारी तेथील प्रशासनावर असते.
हे देखील वाचा- Tatkal Passport Service साठी कसा कराल अर्ज? जाणून घ्या अधिक
तर ऑरेंज रंगाचा माइलस्टोनचा वापर गावातील रस्त्यांसाठी केला जातो. हा माइलस्टोन असे सांगतो की, तुम्ही ग्रामीण क्षेत्रात प्रवेश करत आहात. जसे की, पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या चिन्हासाठी सुद्धा ऑरेंज रंगाचा वापर केला जातो.