घराची स्वच्छता करणे हे दैनंदिन कामांपैकी एक आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत भारत सरकार सुद्धा स्वच्छता अभियानाबद्दल वेगाने काम करत आहे. लोकांच्या घरातून टाकला जाणारा कचरा हा कचरा व्यवस्थापनाच्या येथे टाकण्याचा सल्ला दिला जातो. काही वेळेस त्या उलट केल्यास दंड ही भरावा लागतो. परंतु तुम्ही कधी नोटीस केले आहे का, जेव्हा सकाळी तुमच्या घरी कचरा नेण्यासाठी स्वच्छता कर्मचारी येतो तेव्हा त्याच्याजवळ निळ्या रंगाचा किंवा हिरव्या रंगाची कचरापेटी असते. (Colored dustbins in hospital)
आपल्याला ही सांगितले जाते की, सुका आणि ओला कचरा हा वेगवेगळा टाकावा. तर ओला कचरा हा हिरव्या रंगाच्या डब्यात आणि सुका कचरा हा निळ्या रंगाच्या डब्यात टाकला पाहिजे. परंतु जेव्हा तुम्ही रुग्णालयात विविध रंगाचे कचरा डबे पाहता तेव्हा त्यासंदर्भात ही काही कोड आहेत. म्हणजेच त्या डब्यांचा ही कोणत्या ना कोणत्या कारणासाठी विशेष वापर केला जातो. तर याच बद्दल जाणून घेऊयात की, रुग्णालयात असलेल्या विविध रंगाच्या कचरा डब्यांचा नक्की अर्थ काय?
-लाल रंगाचा कचरा डबा
याचा वापर ब्लड बँक, युरिन बँक, ट्युबिन, ग्लब्स, आयवी सेट, सिरिंज आणि अन्य इंफेक्टेड गोष्टी फेकण्यासाठी केला जातो. खरंतर पॅथोलॉडी आणि ऑपरेशन थिएटरमध्ये वापरल्या गेलेल्या गोष्टी या लाल रंगाच्या कचरापेटीत टाकल्या जातात.
-पिवळ्या रंगाची कचरापेटी
पिवळ्या रंगाच्या डब्यात ह्युमन टिशूज, ह्युमन प्लेसेंटा (लहान बाळाची नाळ), पट्टया किंवा रक्त लागलेला कॉटन फेकला जातो.
-काळ्या रंगाचा डबा
बायोमेडिकल कचरा फेकण्यासाठी याचा वापर केला जातो. यामध्ये बेबी डायपर, सॅनेटरी पॅड्स आणि एक्सपायर झालेली औषधं फेकली जातात. या व्यतिरिक्त यामध्ये ब्युटी प्रोडक्ट्स आणि केमिकल युक्त गोष्टी सुद्धा टाकल्या जातात.(Colored dustbins in hospital)
-निळ्या रंगाचा डबा
निळ्या रंगाची कचरापेटी ही सुका कचऱ्यासाठी असते. यामध्ये प्लास्टिकचे सामान, पिज्जाचा बॉक्स, मेटल, जार किंवा प्लास्टिकच्या वस्तू फेकल्या जातात. या व्यतिरिक्त चिप्सचे पॅकेट्स, दूधाची पिशवी अशा गोष्टी यामध्ये फेकल्या जातात.
हे देखील वाचा- Acid खरेदी-विक्री करण्यासंदर्भात काय आहेत नियम?
-हिरव्या रंगाची कचरापेटी
हिरव्या रंगाचा वापर ओला कचरा फेकण्यासाठी केला जातो. यामध्ये फळांची साल, ओली चहा पावडर, शिल्लक राहिलेले अन्न आणि खराब झालेली फळं किंवा सामान फेकले जाते. या व्यतिरिक्त सुकी फुलं सुद्धा हिरव्या डब्यात टाकली जातात.