जगभरात नुकताच वेलेंटाइन डे साजरा केला गेला. वेलेंटाइनला प्रत्येकालाच आपला परफेक्ट पार्टनर मिळेल अशी अपेक्षा असते. तर काहींचे हार्ट ब्रेक ही होतात. पण खासकरुन यादिवशी लोक आपल्या प्रेमाची कबुली देतात आणि पार्टनरला लाल रंगाचे गुलाब दिले जाते. या दिवशी प्रत्येक ठिकाणी लाल रंग कुठे ना कुठेतरी दिसतोच. अशातच मनात असा प्रश्न उपस्थित राहतो की, जगात ऐवढे रंग आहेत, पण प्रेमाचा रंग लालच का? पिवळा, गुलाबी, सफेद असे अन्य रंग का नाहीत? प्रेमासंबंधितच्या गिफ्ट्स, ड्रेस, सजावट, फूल हे सुद्धा लाल रंगाचेच का असतात? खरंतर प्रेमाचा रंग लाल असण्यामागे खास कारण आहे. (Color of Love)
हृदयाशी जोडलेले नाते
पहिले कारण असे की, लाल रंगाचा संबंध हा हृदयाशी आहे. प्रेम आणि भावनेचे केंद्र हे हृदय असल्याचे मानले जाते. त्याचसोबत आपल्या हृदयाचा रंग ही लाल असतो. याच कारणास्तव लाल रंग हा प्रेमाचे एक शक्तीशाली प्रतीक मानले जाते.
इच्छा-उमेदचे प्रतीक
दुसरे कारण असे की, लाल रंग हा इच्छा आणि उमेदचे प्रतीक मानले जाते. लाल रंग एक बोल्ड रंग असून आत्मविश्वासाचे प्रतीक सुद्धा आहे. तो उर्जा आणि इमोशन सारखी भावना ही व्यक्त करते. त्यामुळे प्रेमाची कबुली देण्यासाठी लाल रंग परफेक्ट मानला जातो.
सौभाग्याचे प्रतीक
तिसरे कारण असे की, बहुतांश संस्कृतीमध्ये लाल रंग हा भाग्यशाली मानला जातो. असे ही म्हटले जाते की, हा रंग सौभाग्य, प्रेम आणि आनंद दर्शवतो. त्यामुळेच वेलेंटाइन डे साठी हा रंग ही परफेक्ट असल्याचे मानले जाते.
===========
हे देखील वाचा- गुलाबाचे रंग नेमकं सांगतात तरी काय?
===========
जुना आहे इतिहास
लाल रंग आणि प्रेम याचा संबंध फार जुना आहे. लार रंग हा यापूर्वी ही प्रेमाचे चिन्ह मानले जायचे. खरंतर १३व्या शतकात प्रसिद्ध फ्रेंच कविता ‘रोमन डे ला रोज’ मध्ये याचा उल्लेख केलेला आढळतो. एका बागेत लेखक लाल रंगाचे फुल शोधत होता. त्याच्या कवितेत लाल रंगाचे फूल त्याच्या जीवनात स्री प्रेमाचा शोधत घेत असल्याचे दर्शवतो. (Color of Love) अशातच लाल रंग हा संपूर्ण जगात प्रेमाचा रंग म्हणून ओळखला जातो. जरी तुम्ही संयुक्त राज्य अमेरिका, युरोप, एशिया आणि कुठे ही असाल तेथे लाल हा असा एक रंग आहे जो प्रेम आणि स्नेह दर्शवतो.