Home » दिलीप वेंगसरकर.. ‘लॅार्ड ॲाफ द लॅार्डस्’

दिलीप वेंगसरकर.. ‘लॅार्ड ॲाफ द लॅार्डस्’

by Correspondent
0 comment
Dilip Vengsarkar | K Facts
Share

दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांना ‘लॉर्ड आॕफ दी लॉर्डस्’ या किताबाने क्रिकेट जगत ओळखते. लॉर्डस् क्रिकेट ग्राउंडवर सलग तीन दौऱ्यांमध्ये सलग तीनही कसोटींमध्ये शतके झळकावणे आजवर जगातल्या कोणत्याही फलंदाजाला जमले नाही. त्यावर सलग तीन वेगवेगळ्या दौऱ्यांमध्ये शतके झळकावणारा दिलीप वेंगसरकर हा जगातला एकमेव फलंदाज आहे.

लॉर्डस् क्रिकेट ग्राउंड (Lord’s Cricket Ground) म्हणजे क्रिकेट ची काशी, मक्का वगैरे… भारताचा लिटल मास्टर सुनील गावस्कर व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोन्ही दिग्गजांना कारकिर्दीत याच लॉर्डसवर एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यावर सलग तीन वेगवेगळ्या दौर्यांमध्ये शतके झळकावणारा दिलीप वेंगसरकर हा जगातला एकमेव फलंदाज आहे. क्रिकेटचे सर्वोच्च आणि आराध्य समजल्या जाणाऱ्या ‘लॉर्डस्’ मैदानावर लागोपाठ तीन कसोटी सामन्यात तीन दमदार शतके झळकावण्यासाठीच दिलीप वेंगसरकर यांना ‘लॉर्ड आॕफ दी लॉर्डस्’ म्हणतात.

याव्यतिरीक्त वेंगसरकर यांच्या अनेक लक्षवेधक कामगि-या क्रिकेट जगतात त्यांची वेगळी जागा निर्माण करतात. भल्या भल्या फलंदाजांना लॅार्डस् च्या भूमीवर आपला कस टिकवून ठेवता आला नाही अशा लॉर्डसवर दिलीप वेंगसरकरने चक्क शतकांची हॅटट्रिक केली. ब्रिटिशांनी वेळीच या कामगिरीची दखल घेतली. विस्डेनने लॉर्डसवरील एका प्रेक्षक विभागाला दिलीप वेंगसरकर यांचे नाव दिले शिवाय आपल्या पंचकमध्ये दिलीप यांना स्थानही दिले.

 Dilip Vengsarkar
Dilip Vengsarkar

एमसीसीने दिलीपचे तैलचित्र काढण्यासाठी एका नामवंत चित्रकारास मुंबईत पाठवले होते. ते चित्र लॉर्डसच्या विश्वविख्यात “लाँग रुम”मध्ये लावण्यात आले आहे. ही ‘लाँग रुम’ म्हणजे क्रिकेटच्या काशीतील विश्वेश्वरांचा गाभारा आहे. जगातील निवडक क्रिकेटपटूंचीच चित्रे तेथे आहेत, त्या पंक्तीत आपला दिलीप वेंगसरकर आहे.मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारिणीने त्यांचे नाव ‘नॉर्थ स्टँड’च्या ‘आय ब्लॉक’ला देण्याचे ठरवले आहे. मुंबईच्या क्रिकेटपटूंमध्ये हा स्टँड मानाचा मानला जातो. आजचे आणि उद्याचे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय, रणजी व अन्य सामने तेथे बसून पाहणे गौरवाचे मानतात.

या लॅार्ड ॲाफ दी लॅार्डस् च्या अथक साधनेतून क्रिकेट विश्वाची पुढची फळी कसून तयार होतेय. मागे नाशिकमध्ये झालेल्या एका मुलाखतीमध्ये ते बोल्ले – “आम्हाला टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये तटपुंजी तर त्यापेक्षाही कमी मानधन वन डे मध्ये मिळत होते; मात्र आम्ही देशासाठी खेळत असल्याच्या आनंदात मानधनाचा विचारही केला नव्हता, मात्र बदलत्या काळात क्रिकेट खेळ व्यवसायिक आणि मनोरंजनामुळे जगप्रसिद्ध झाला”. त्यामुळे  आता क्रिकेटच्या नव्या पिढीने वेंगसरकरांच्या शब्दांवर विचार केल्यास भारतीय क्रिकेट विश्व नक्कीच कात टाकेल.

शब्दांकन- शामल भंडारे. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.