Home » College Scholastic Ability Test : या परीक्षेसाठी १४० विमान उड्डाने रद्द करण्यात आली !

College Scholastic Ability Test : या परीक्षेसाठी १४० विमान उड्डाने रद्द करण्यात आली !

by Team Gajawaja
0 comment
Scholastic Ability Test
Share

परीक्षा, हा शब्द ऐकला की भल्याभल्यांना धडकी भरते. त्यात सर्वात अवघड विषयाची, गणिताची परीक्षा असेल तर विचारुच नका. अशातच भारतातील नीट, जेईई यासारख्या परीक्षा सर्वात अवघड मानल्या जातात. त्यासाठी विद्यार्थी १०-१० तास सलग अभ्यास करतात. पण फक्त आपल्याच देशात अशा कठीण परीक्षा होतात का…अर्थातच अन्य देशातही अशाच कठीण परीक्षा होतात. अशीच एक परीक्षा नुकतीच दक्षिण कोरियामध्ये झाली. दक्षिण कोरियामध्ये होणारी ही परीक्षाही सर्वात अवघड परीक्षा म्हणून ओळखली जाते. या परीक्षेसाठी दक्षिण कोरियाच्या सरकारनं एवढी तयारी केली होती, की चक्क तेथील विमानांची उड्डानेही थांबवण्यात आली. कारण ही परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना विमानांच्या आवाजाचाही त्रास व्हायला नको. दक्षिण कोरियातील ५००,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी ही सर्वात कठीण विद्यापीठ प्रवेश परीक्षा दिली. त्याची चर्चा आता सर्वत्र होत आहे. (College Scholastic Ability Test)

दक्षिण कोरियामध्ये झालेल्या एका कठीण परीक्षेनं सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या परीक्षेसाठी येथील विमान उड्डानेही थांबवण्यात आली होती. येथील विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी घेण्यात येणारी ही परीक्षा जगातील सर्वात जास्त तास घेण्यात येणारी परीक्षा आहे. तब्बल ९ तास ही परीक्षा चालते. यात दुपारचे किंवा रात्रीचे जेवणही विद्यार्थ्यांना घेता येत नाही. कॉलेज स्कॉलस्टिक अॅबिलिटी टेस्ट म्हणजेच CSAT असे या परीक्षेचे लांबच लांब नाव आहे. आणि जसे परीक्षेचे नाव लांब आहे, तसेच ही परीक्षा सर्वात जास्त तास घेतली जाते. या परीक्षेचे कोरियन संक्षिप्त नाव सुनेयुंगही आहे. (International News)

दक्षिण कोरियामध्ये नोव्हेंबर महिन्यात ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेची दहशत इतकी आहे की, कॉलेज स्कॉलस्टिक अॅबिलिटी टेस्ट ज्या दिवशी आहे, त्या दिवशी परीक्षा सेंटरच्या आसपासची सर्व हॉटेल, दुकाने बंद ठेवण्यात येतात. या विभागातील वाहतूक थांबण्यात येते. फार काय विमान उड्डानांच्या वेळाही बदलण्यात येतात. यावर्षीच्या परीक्षेसाठी १४० विमान उड्डाने रद्द करण्यात आली. फक्त विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचण्यापूरती वाहतूक सुरु ठेवण्यात येते. त्यानंतर परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांचे लक्ष विचलीत होईल, अशी प्रत्येक गोष्ट बंद केली जाते. भल्या सकाळी परीक्षेसाठी गेलेले विद्यार्थी दुपारनंतर परीक्षा हॉलच्या बाहेर येऊ लागतात. अर्थात ज्यांचा पेपर पूर्ण झाला आहे, ते विद्यार्थी हॉलबाहेर येतात. मात्र ज्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे पेपर सोडवता आलेला नाही, ते विद्यार्थी अतिरिक्त वेळ घेऊन पेपर सोडवत बसतात. त्यांना ९ तासांचा अवधी देण्यात येतो. त्यामुळे रात्र झाली तरी या परीक्षा केंद्रावर मोठी गर्दी असते. (College Scholastic Ability Test)

नुकत्याच झालेल्या या कॉलेज स्कॉलस्टिक अॅबिलिटी परीक्षेला सुमारे ५००,००० विद्यार्थी बसले होते. गेल्या सात वर्षातील ही सर्वात मोठी विद्यार्थी संख्य़ा ठरली आहे. या परीक्षेमुळे फक्त विद्यार्थ्यांचा विद्यापीठ प्रवेश निश्चित होत नाही तर, त्यांच्या रोजगाराच्या संधी, उत्पन्न, निवास आणि भविष्यातील नातेसंबंध यावरही या परीक्षेचा परिणाम होतो. दक्षिण कोरियातील या सर्वात कठीण परीक्षेसाठी विद्यार्थी जीवतोडून मेहनत घेतात. तसेच त्यांचे पालकही यात विद्यार्थ्यांसोबत रहातात. याशिवाय देशातील पोलीस यंत्रणाही कॉलेज स्कॉलस्टिक अॅबिलिटी टेस्ट विना अडथळा पार पडावी, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त असतो. विशेषतः परीक्षा देणारे सर्व विद्यार्थी वेळेवर केंद्रावर पोहलचेत किंवा नाही, याची तपासणी करण्याचे काम या पोलीसांवर असते. पोलीस विद्यार्थ्यांना प्रसंगी आपल्या गाड्यांमधून या परीक्षा केंद्रावर घेऊन येतानाचे दृष्य अनेकवेळा दिसते. ही परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी दक्षिण कोरियातील आर्थिक बाजारपेठा आणि कार्यालये एक तास उशिराने उघडण्यात येतात. (International News)

=======================

हे देखील वाचा : Antarctica : हवामान बदलाचा असाही परिणाम !

=======================

अर्थात दक्षिण कोरियाच्या या कॉलेज स्कॉलस्टिक अॅबिलिटी टेस्ट सारखीच कठीण परीक्षा म्हणून चीनमधील गाओकाओ परीक्षा ओळखली जाते. ही परीक्षाही चीनच्या विद्यापीठ प्रवेशासाठी घेतली जाते. गाओकाओ परीक्षाही अत्यंत कठीण असून तिचा अभ्यासक्रम विस्तृत आहे. यात चिनी भाषा, गणित, एक परदेशी भाषा आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि भूगोल यासारखे पर्यायी विषय समाविष्ट आहेत. ही परीक्षा साधारणपणे दोन दिवस चालते. याशिवाय कठीण परीक्षांमध्ये भारताची आयआयटी-जेईई आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचाही समावेश आहे. (College Scholastic Ability Test)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.