Home » एकेकाळी कोलगेट बनवायची साबण-मेणबत्त्या, कंपनीच्या ‘या’ रणनितीने बदलले नशीब

एकेकाळी कोलगेट बनवायची साबण-मेणबत्त्या, कंपनीच्या ‘या’ रणनितीने बदलले नशीब

by Team Gajawaja
0 comment
Colgate success story
Share

जगातील अशा काही कंपन्या आहेत ज्यांची सुरुवात एखाद्या प्रोडक्ट्सपासून झाली आहे. मात्र ओळख झाली ती म्हणजे दुसऱ्या प्रोडक्टमुळे. कोलगेटसोबत सुद्धा असेच काहीसे झाले. जवळजवळ १५० वर्ष जुन्या कोलगेटची सुरुवात अमेरिकेतील व्यावसायिक विलियम कोलगेट यांनी केली होती. १८७५ मध्ये त्यांनी याची सुरुवात केली होती. साबण आणि मेणबत्त्या विक्री करण्यास सुरुवात केली पण त्यामधून मनासारखा नफा मिळवता आला नाही. याच्या सामाधानाच्या आधारावर त्यांनी टूथपेस्ट तयार करण्याचा निर्णय घेतला. (Colgate success story)

ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा टुथपेस्टची पॅकिंग करण्यासाठी अगदी सहज मशीन्स उपलब्ध नव्हत्या. पाउडर लॉन्च केल्यानंतर जेव्हा विल्यियम यांनी टूथपेस्ट लॉन्च केली तेव्हा त्यांना डिब्ब्यांमध्ये बंद करुन विक्री करण्यास सुरुवात केली. याचा वापर अशा पद्धतीने केला जायचा जसे व्यक्ती तुप काढण्यासाठी आपल्या हातांचा वापर करायचा.

जेव्हा टुथपेस्टला टुब मध्ये सादर केले
दीर्घ काळापर्यंत टुथपेस्टच्या पॅकेजिंगची समस्या कायम राहिली होती. मात्र १८९६ मध्ये त्यात बदल करण्यात आला. टूथपेस्ट पहिल्यांदाच एखाद्या ट्युबमध्ये बंद करुन लॉन्च करण्यात आली होती. त्याच्या माध्यमातून टूथपेस्टचा वापर करणे सोप्पे झाले. आपल्या याच कल्पनेमुळे कोलगेटला अधिक प्रसिद्धी मिळण्यास फायदा झाला. वेगाने प्रसिद्धी मिळत असल्याने १९२८ मध्ये पामोलिव्ह नावाच्या कंपनीने कोलगेटला खरेदी केले. १९५३ मध्ये त्याचे नाव बदलून कोलगेट पामोलिव्ह ठेवले गेले.

Colgate success story
Colgate success story

जेव्हा कोलगेटला जोरदार टक्कर मिळाली
अमेरिकेतील लोकांच्या मध्ये कोलगेट हा चर्चित ब्रँन्ड झाला पण त्याला जोरदार टक्कर दिली ती म्हणजे P&G कंपनीच्या टूथपेस्टने. ही कंपनी फ्लोराइड असणारे टूथपेस्ट घेऊन आली. कंपनीने त्याचे फार मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केले. लोकांच्या मध्ये याची प्रसिद्धी वाढली गेली. १९५५ पर्यंत या कंपनीने कोलगेटला मागे टाकले. कोलगेटने आपली रणनिती बदलण्यास दीर्घकाळ लागला. अशा पद्धतीने कंपनीने रणनिती बदलली. कंपनीने १९६४ मध्ये फ्लोराइड असणारी टूथपेस्ट लॉन्च केली. यामुळे कोलगेटला आपले नाव पुन्हा मार्केटमध्ये मिळवण्यास फार मोठी मदत मिळाली. त्यानंतर कंपनीने एकामागोमाग एक प्रयोग केले जे लोकांना पसंद आले.(Colgate success story)

हे देखील वाचा- साबण-तेल बनवणाऱ्या कंपनीने असा रचला इतिहास, बनली दिग्गज IT कंपनी

लॉन्च केले कोलगेट टोटल
कंपनीने आपली रणनिती पुढे सुद्धा सुरु ठेवली. १९९२ मध्ये कोलगेट टोटल नावाने एक नवे प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरवले. कंपनीने या प्रोडक्टच्या तीन महत्वाच्या गोष्टींची अधिक मार्केटिंग केली. त्यामध्ये असे सांगितले गेले की, ती दातांमधील जागा म्हणजेच कॅविटी, दातांमधील घाण आणि हिरड्यांच्या समस्येपासून दूर ठेवते. या तीन मुख्य गोष्टींवरुन त्यांच्या प्रोडक्टला फार मोठा हातभार लागला. त्यानंतर कंपनीने १४ अन्य प्रकारचे प्रोडक्ट्स भारतासह जगभरात लॉन्च केले. प्रियंका चोप्रा ते करिना कपूर पर्यंत यांना ब्रँन्ड अॅम्बेसेडर बनवले गेले. त्यानंतर कंपनीने कधीच मागे वळून पाहिले नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.