कोल्ड प्लेबद्दल तुम्ही ऐकलं आहे का? सॉरी, कोल्ड प्ले यांचे गाणे तुम्ही ऐकलेत का? अनेकांना कोल्ड प्ले काय आहे हे माहिती नसेल. पण जे कोल्ड प्लेचे फॅन आहेत, त्यांच्यात सध्या दोन गट पडेलेले आहेत. एक ज्यांच्याकडे त्यांच्या कॉन्सर्टचं तिकीट आहे आणि दुसरे असे जे अजूनही आशा करत आहेत की, त्यांना त्यांच्या कॉन्सर्टचं तिकीट मिळेलं. कोल्ड प्ले हा एक ब्रिटिश रॉक म्युझिक बॅन्ड आहे, ज्याने नुकतंच भारतात त्यांच्या कॉन्सर्टची डेट Announce केली आणि त्या कॉन्सर्टचं तिकीट मिळवण्यासाठी भारतीय लोकांनी बूकिंग साइटवर अक्षरश: इतकी गर्दी केली की, बुकिंग वेबसाइट आणि बूकिंग ॲप क्रॅश झालं. ज्यांना तिकीट मिळाली, त्यांनी ती ब्लॅकने विकायला सुरूवात केली, ती सुद्धा ३-४ लाख रुपयांना. कोल्ड प्ले या बॅन्डचं भारतात इतकं मार्केट कसं झालं? आणि कोल्ड प्ले काय आहे? जाणून घेऊया. (Coldplay Music Band)
कोल्ड प्ले हा रॉक बॅन्ड युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या काही विद्यार्थांनी मिळवून बनवला. ज्यामध्ये चार मेंबर्स होते. गिटारीस्ट जॉनी बकलैंड, इलेक्ट्रिक गिटारीस्ट गाय बेरीमैन, ड्रमर विल चॅम्पियन आणि लीड सिंगर व पियानिस्ट ख्रिस मार्टिन. सुरुवातीला या बॅन्डच नाव त्यांनी बिग फॅट नॉईसेस ठेवलं होतं. नंतर स्टार फिश आणि आता कोल्ड प्ले या नावानेच ते फेमस आहेत. त्यांनी सर्वात पहिले इनडीपेडेंटली सेफ्टी हा अल्बम1198 ला लॉंच केला. त्यानंतर कोल्डप्लेने 1999 मध्ये पर्लोफोनसोबत अॅग्रीमेंट साइन केलं आणि आपला पहिला कमर्शियल अल्बम पॅराशूट्स 2000 साली लॉंच केला. या अल्बममधील येलो गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यासाठी त्यांना ब्रिटिश अल्बम ऑफ द इयरसाठी ब्रिट पुरस्कार आणि बेस्ट ऑल्टरनेटिव म्युझिक अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्ड मिळाला. मग या अल्बमनंतर आलेल्या प्रत्येक अल्बमने तितकाच धुमाकूळ घातला. सगळ्यात जास्त अवॉर्डस मिळवणाऱ्या म्युझिक बॅन्डच्या यादीत कोल्ड प्लेचा नंबर सहावा आहे. (Coldplay Music Band)
सर्वात जास्त विकला अल्बम असो किंवा ऑनलाइन म्युझिक प्लॅटफॉर्मसवर सर्वात जास्त ऐकला गेलेला अल्बम असे सर्व विक्रम कोल्ड प्लेच्या नावावर आहेत. गाण्यांसोबत ते गाण वेगळ्या पद्धतीने परफॉर्म करण्याची शैली सुद्धा त्यांच्यात आहे. त्यामुळे या बॅंडच्या कॉन्सर्ट्सची तिकिटं हातो हात विकली जातात. कॉन्सर्ट्ससाठी येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला हातात घालण्यासाठी चमकणारे एलईडी बॅंडस दिले जातात. शिवाय प्रत्येक गाण्यावर त्या गाण्याच्या मूड प्रमाणे थीरकणाऱ्या लाइटस सुद्धा या कॉन्सर्ट्समध्ये असतात. ज्यामुळे दुसऱ्याच ग्रहावर गेल्याचा अनुभव होतो. असं फॅन्सच म्हणण आहे. (Coldplay Music Band)
त्यामुळेच जेव्हा त्यांनी त्यांची इंडिया टूरची डेट Announce केली आणि त्याची ऑनलाइन तिकीट विक्री सुरू झाली, तेव्हा १.३ कोटी लोकांनी एकसाथ हे तिकीट बूक करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा शो आधी फक्त 18 आणि 19 जानेवारी 2025 ला होणार होता. या दोन दिवसांच्या कॉन्सर्टची तिकीटं 30 मिनिटांच्या आत संपली सुद्धा. फॅन्सची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी 21 जानेवारीला आणखी एक शो अॅड केला. हे सर्व कॉन्सर्टस नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहेत. आधी या तिकीटांची किंमत 2000 ते 3500 हजार अशी ठेवण्यात आली होती. पण जबरदस्त रेस्पॉन्समुळे या हे तिकिटं जास्त किंमतीने ब्लॅकने विकल्याच्या तक्रारी सुद्धा समोर येत आहेत. तिकीट न मिळाल्याने निराश झालेल्या चाहत्यांनी तिकीट विक्री व्यवस्थेबद्दल तक्रार केली आहे, आणि बूक माय शोने अनाधिकृत वेबसाइटवरुन जास्त किंमतीने विकत घेतलेल्या तिकीटांना अवैध ठरवलं आहे. (Coldplay Music Band)
======
हे देखील वाचा : आर्याला बिग बॉसने दिली जेलमध्ये जाण्याची शिक्षा
======
इतकी क्रेझ असणारा हा बॅन्ड फक्त गाण्यांंमुळेच प्रसिद्ध नाहीये. कोल्ड प्ले सुरू झाल्या पासून ते त्यांच्या प्रॉफिट मधला 10% भाग हा सामाजिक कामांसाठी दान करत आले आहेत. कोल्डप्लेच्या कॉन्सर्टच्या प्रत्येकी एका तिकीट विक्री मागे ते एक झाड लावणार आहेत. त्यामुळेच हा बॅन्ड लोकांच्या मनावर गाण्यांसोबतच अशा उपक्रमांमुळे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. ज्यांना कोल्ड प्ले यांच्या म्युझिक ऑफ द स्फिअर्स या शो ची तिकीटं मिळाली आहेत त्यांना Congratulation आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना हे दुख पचवण्यासाठी ऑल द बेस्ट. (Coldplay Music Band)