सध्या युथमध्ये कोल्डप्ले कमालीचा लोकप्रिय होताना दिसत आहे. या कोल्डप्ले ची लोकप्रियता केवळ तरुणाईमध्येच आहे असे नाही तर प्रत्येक वयोगटातील लोकांना या कोल्डप्ले बँडने अक्षरशः वेड लावले आहे. या बँडचे जगभरात जेवढे शो होतात ते सर्वच फुल्ल असतात. सामान्य लोकांपासून ते दिग्गज लोकांपर्यंत सर्वच या बँडचे दिवाने आहेत. आपल्या शोजमुळे कायम कोल्डप्ले बँड सोशल मीडियावर गाजत असतो आणि लाइमलाइट मिळवतो. कोल्डप्लेचे कॉन्सर्ट त्यांच्या धमाकेदार म्युझिकमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या म्युझिक कॉन्सर्टच्या तिकिटांसाठी अक्षरशः लोकांचा एकच कल्ला असतो. मात्र सध्या या बँडमुळे एका वेगळाच किस्सा समोर आला असून, त्याची चर्चा संपूर्ण जगासमोर होताना दिसत आहे. (Marathi News)
सध्या सोशल मीडियावर कोल्डप्लेच्या म्युझिक कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बोस्टनमध्ये झालेल्या कोल्डप्ले कॉन्सर्ट दरम्यानचा असून, यामध्ये डेटा सॉफ्टवेअर स्टार्टअप अॅस्ट्रोनॉमर कंपनीचे सीईओ अँडी बायर्न दिसत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अँडी बायर्न यांचे अफेयर जगासमोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. झाले असे की, एस्ट्रोनॉमर कंपनीचे सीईओ अँडी बायरन हे आपल्या सहकारी असलेल्या क्रिस्टिन कॅबोटसोबत बॉस्टनमध्ये झालेल्या एका कोल्डप्ले कॉन्सर्टला गेले होते. (Top Headline)
कॉन्सर्ट सुरु असताना अचानक या दोघांवर कॅमेरा आला आणि स्क्रीनवर हे दोघं एकमेकांच्या मिठीत कोझी मध्ये दिसले. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर कॅमेरा फिरतो आणि त्यांचे अफेअर असल्याचे समोर येते. मुख्य म्हणजे, अँडी बायरन यांचे लग्न झालेले आहे. त्यामुळे या व्हिडिओमुळे बॉस आणि त्याच्या कर्मचाऱ्यांमधील त्या वेगळ्याच नात्यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Todays Marathi Headline)
जेव्हा कॉन्सर्टचा ‘किस कॅम’ अँडी बायर्न यांच्यावर झूम झाला, तेव्हा ते त्यांची सहकारी क्रिस्टिन कॅबोटसोबत दिसले. लोक त्यांना पाहत आहेत हे त्यांच्या लक्षात येताच क्रिस्टिनने तिचा चेहरा लपवला आणि अँडीही लगेच खाली लपला. या दोघांना किस कॅमवर पाहून कोल्डप्लेचा मुख्य गायक क्रिस मार्टिन म्हणाला, ‘एकतर ते दोघेही खूप लाजाळू आहेत किंवा त्यांचे अफेयर आहे. (Latest Marathi News)
अँडी बायर्न हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य खूपच खासगी ठेवतात. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या कामाव्यतिरिक्त फारशा इतर पोस्ट दिसत नाहीत. अँडी बायर्न हे डेटा सॉफ्टवेअर स्टार्टअप अॅस्ट्रोनॉमरचे सीईओ आहेत. ते जुलै २०२३ मध्ये या कंपनीत सामील झाले. अॅस्ट्रोनॉमर ही न्यूयॉर्कमधील एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. (Top Trending News)
सध्या अँडी बायर्न विवाहित आहे आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव मेघन आहे. अँडी बायर्न यांचा त्यांच्या सहकाऱ्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मेघन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या नावातून तिच्या पतीचे नाव काढून टाकले आहे. मात्र मेघनने नंतर तिचे सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले. तर दुसरीकडे क्रिस्टिन कॅबॉटचा नवऱ्याशी घटस्फोट झाला आहे. परिणामी, दोघांच्या नात्याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. (Top Stories)
=========
हे ही वाचा : Pakistan : जेव्हा पाकिस्तानमध्ये श्रीरामांचा जयघोष होतो….
=========
क्रिस्टिन कॅबोट नोव्हेंबर २०२४ मध्ये अॅस्ट्रोनॉमरमध्ये चीफ पीपल ऑफिसर म्हणून रुजू झाल्या. त्या कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या प्रमुख आहेत. अॅस्ट्रोनॉमरमध्ये येण्यापूर्वी त्या निओ४जे, प्रूफपॉइंट आणि ऑब्झर्व्ह आयटी सारख्या कंपन्यांमध्ये एचआर प्रमुख म्हणून काम करत होत्या. क्रिस्टिनने गेटिसबर्ग कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने केनेथ थॉर्नबीशी लग्न केले. तथापि, २०२२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मात्र यावर अजून कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics