सध्या सगळ्यांनाच थंडीमुळे चांगलीच हुडहुडी भरली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदा सर्वत्र चांगलीच थंडी पडली आहे. उत्तर भारतामध्ये तर चांगलीच बर्फवृष्टी होत असल्याने आपल्याकडे देखील थंड वारे वाहत आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जणं स्वेटर, शाल पांघरून आणि शेकोट्या पेटवून त्या समोर तासंतास बसलेले दिसत आहे. अनेकदा चर्चांमध्ये ऐकायला मिळते की, आपल्याकडेच एवढी थंडी आहे, तर जिथे बर्फ पडतो तिथे आणि जिथे सर्वाधिक थंडी पडते तिथे राहणाऱ्या लोकांना किती थंडी वाजत असेल? खरंच तुम्हाला माहिती आहे का, की भारतातील सर्वात जास्त थंडी असणारे ठिकाण कोणते? नाही चला मग जाणून घेऊया. (Winter)
जगातील सर्वात थंड गाव हे रशिया देशातील सायबेरिया प्रदेशात, इंडिगिरका नदीच्या काठी वसलेले ‘ओयम्याकॉन’ हे आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओमध्ये आपण या गावाबद्दल ऐकले असेल. मात्र भारतातील सर्वात थंड गाव कोणते याबद्दल आपण माहिती घेऊया. तुम्हाला जर कोणी विचारले भारतातील थंड गाव कोणते? तर तुम्ही म्हणाल हिमाचल प्रदेश, काश्मीर, उत्तराखंड याच उत्तर भारतातील एखाद्या राज्यातील असेल. कोणी सांगेल शिमला, श्रीनगर आदी मात्र यापैकी कोणतेच भारतातील सर्वात थंड असलेले गाव नाहीये. (Top Stories)
देशातील सर्वात थंड गाव हे लडाख या केद्रशासित प्रदेशातील असून, या गावाचे नाव ‘द्रास’ असे आहे. द्रास हे गाव लडाखमधील कारगिलपासून फक्त ६४ किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील तापमान आपल्या रेफ्रिजरेटर फ्रीजरपेक्षा देखील खूप कमी आहे. उंची आणि हिमालयातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे येथे हाडांना थंडावा देणारी थंडी जाणवते. या गावातील तापमान दरवर्षी -२०°C ते -२५°C पर्यंत घसरते. १९९५ मध्ये या गावातील तापमान -६०°C पर्यंत घसरले होते. (Todays Marathi Headline)

द्रास हे गाव ‘गेटवे टू लडाख’ म्हणजेच लडाखचे प्रवेशद्वार म्हणूनही हे गाव ओळखले जाते. झोजिला खिंडीतून लडाखमध्ये प्रवेश केल्यानंतर लागणारे हे पहिले महत्त्वाचे गाव आहे. तसेच द्रास हे भारतातील पहिले आणि जगभरातील दुसरे सर्वात थंड ठिकाण आहे. थंडीमुळे इथे राहणे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक असते. इथले नद्या आणि ओढे आणि नळाचे पाणी पाईपमध्येच गोठते, त्यामुळे लोकांना बर्फ वितळवून पाण्याचा वापर करावा लागतो. (Latest Marathi News)
द्रास हे गाव एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. टायगर हिल, मनमन टॉप आणि रानफुलांनी भरलेली मुश्कोह व्हॅली या गावाच्या सौंदर्याला चार चांद लावतात. तर द्रौपदी कुंड आणि निंगूर मशीद देखील येथील प्रसिद्ध पर्यटन ठिकाणं आहे. द्रास हे भारतातील सर्वात थंड गाव आहे, त्यामुळे या गावाल भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात. हिवाळ्यात द्रासचा जगाशी संपर्क तुटतो, त्यामुळे स्थानिक लोक उन्हाळ्यातच अन्नधान्य, लाकूड आणि भाज्यांचा साठा करून ठेवतात. (Top Trending Headline)
इथे जर तुम्ही तुमचे केस धुतले तर केसांमध्येही बर्फ तयार होईल. एवढेच नाही तर ओले कपडे देखील बर्फ होऊन जातात. इथे राहणे खरंच खूप कठीण आहे. निसर्गाशी झगडून आणि अनेक आव्हानांना सामोरे जात लोकं इथे राहतात. डीआरएस गावातील लोकांचे जीवन प्रामुख्याने शेती, पशुपालन आणि पर्यटनावर अवलंबून असते. उन्हाळ्यात इथे बार्ली, बटाटे आणि वाटाणे पिकवले जातात. लेहला जाणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी हे आकर्षणाचे केंद्र आहे. झोजिला पास, द्रास युद्ध स्मारक, द्रौपदी कुंड आणि मुश्को व्हॅलीसारख्या ठिकाणांना पर्यटक भेट देतात. (Top Marathi News)
======
Travelling : भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिप करायची असेल तर ‘ही’ ठिकाणं आहेत परफेक्ट ऑप्शन
======
द्रास गावाला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे उन्हाळा. द्रासला भेट देण्यासाठी उन्हाळा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. तुम्ही जून ते सप्टेंबर दरम्यान भेट देऊ शकता. कारण या काळात तापमान सामान्यतः सामान्य व्यक्तीसाठी सहन करण्यायोग्य असते. हिवाळ्यात येथे खूप बर्फवृष्टी होते. या गावाला भेट देण्यासाठी तुम्ही श्रीनगर किंवा लेहला विमानाने जाऊ शकता. त्यानंतर टॅक्सी बुक करून रस्त्याने द्रासला जाऊ शकता. तसेच तुम्ही रेल्वेने जम्मू तावीला जाऊ शकता. तेथून ३८६ किलोमीटर प्रवास करून या गावाला भेट देऊ शकता. मुख्य म्हणजे पर्यटनासाठी द्रासला येणाऱ्या लोकांसाठी मुक्कामाची सोय द्रासमध्ये करण्यात आलेली आहे. या ठिकाणी अनेक निवास सुविधा उपलब्ध आहेत. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
