थंड पाणी प्यायल्याने उन्हाळ्यात आराम मिळतोच शिवाय उष्णतेपासून वाचण्यासही मदत होते. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी लोक ज्यूस, लस्सी आणि नारळाच्या पाणी पितात. तज्ज्ञांच्या मते, या ऋतूमध्ये स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. याशिवाय योग्य तापमानात पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात थंड पाणी उष्णतेपासून झटपट आराम देण्याचे काम करते, परंतु त्याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. (Cold water in summer)
आयुर्वेदात थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे. विशेषतः फ्रीजमधील थंड पाणी पिणे टाळावे. उन्हातून आल्यानंतर थंड पाणी पिणे, व्यायाम करणे किंवा अन्न खाल्ल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. फ्रीजमधील थंड पाणी का टाळावे ते जाणून घेऊया.
पचनास समस्या
आयुर्वेदात असे मानले जाते की थंड पाणी किंवा पेय प्यायल्याने पचनक्रियेत अडथळा येतो. आयुर्वेदानुसार पचनक्रियेमध्ये अनेक गोष्टींचा सहभाग असतो, ज्यासाठी उष्णता आवश्यक असते. हे तोंडापासून सुरू होते आणि आतड्यांमध्ये संपते. तसेच, काही संशोधनांनी असे सुचवले आहे की थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे पाचन समस्या उद्भवू शकतात.
घसा खवखवणे
फ्रीजमधील थंड पाणी प्यायल्याने काहींना श्वास घेण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे घसा खवखवणे, घशाला सूज येणे अशा सुद्धा समस्या उद्भवू शकते.
हार्ट रेटवर परिणाम
थंड पाणी तुमच्या शरिरातील हृदयाचे गती कमी करु शकतो. एका अभ्यासानुसार फ्रिज मधील अधिक थंड पाणी प्यायल्याने वेगस नर्व प्रभावित होऊ शकते. नर्व शरिरातील अनैच्छिक क्रियांना नियंत्रित करण्याचे काम करते. कमी तापमान असलेल्या पाण्याचा थेट परिणाम हो वेगस नर्ववर पडतो आणि त्यामुळेच हृदयाचे ठोके सुद्धा मंदावतात.(Cold water in summer)
वजन वाढते
ज्या लोकांना वजन कमी करायचे असते त्यांनी थंड पाणी पिऊ नये. थंड पाणी प्यायल्याने शरिरात असलेले फॅट बर्न करणे मुश्किल होते. कारण फ्रिजमधील पाणी शरिरातील फॅट कठोर होतात आणि त्यामुळेच वजन कमी होत नाही.
हे देखील वाचा- हिट-स्ट्रोक ठरु शकतो जीवघेणा, बचाव करण्यासाठी कामी येतील ‘हे’ उपाय
या व्यतरिक्त अधिक थंड पाणी प्यायल्याने शरिरात जाणाऱ्या खाद्य पदार्थातील सर्व पोषक तत्व नष्ट होतात. शरिराचे तापमान ३७ डिग्री सेल्सियस होते. अशातच तुम्ही एखादी थंड गोष्ट खाल्ली तर तुमचे शरिर पूर्पणे थंड होते आणि पोषक तत्व यामुळे नष्ट होतात.
