Cold Milk in Summer : दूधात वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन आणि मिनिरल्स असतात. जे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, प्रत्येक वयातील व्यक्तीने दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. एक कप दूधामुळे शरिरात 2 टक्के हेल्दी फॅट्स, 100 ते 120 कॅलरीज, 8 ग्रॅम प्रोटीन, 12 ग्रॅम कार्बोहाइड्रेट आणि 12 ग्रॅम नॅच्युरल शुगर मिळू शकते.
पण उन्हाळ्याच्या दिवसात थंड दूध प्यावे का असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. थंड दूध प्यायल्याने शरिराला पोषण तत्त्वे मिळतात का? याबद्दल हेल्थ एक्सपर्ट्स काय म्हणतात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
हेल्थ एक्सपर्ट्स म्हणतात की, दूधात काही प्रकारचे कॅल्शिअम असतात. सर्वसामान्यपणे दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीरच असते. पण प्रत्येक ऋतूत दूध पिण्याची पद्धत वेगवेगळी असते. उन्हाळ्यात तुम्ही दूधाचे सेवन गरम किंवा थंड दोन्ही प्रकारचे पिऊ शकता. खरंतर थंड दूधाचे अधिक सेवन करणे फायदेशीर असते. (Cold Milk in Summer)
उन्हाळ्याच्या दिवसात प्या थंड दूध
उन्हाळ्याच्या दिवसात पचनासंबंधित काही समस्या उद्भवतात. या समस्या दूर करण्यासाठी थंड दूधाचे सेवन करणे फायदेशीर असते. पण तुम्ही फ्रिजमधील नव्हे थंड दूधाचे सेवन केले पाहिजे. कधीकधी दूध वारंवार उकळल्यानेही पोषण तत्त्वे दूर होतात. अशातच थंड दूधाचे सेवन केल्याने पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वे मिळण्याची शक्यता अधिक वाढली जाते. याचा अर्थ असा होत नाही की, दूध न उकळवता प्यावे. दूध गरम केल्यानंतर ते थंड झाल्यानंतर प्यावे. थंड आणि गरम दूध पिण्याचे वेगवेगळे फायदे असतात. पण उन्हाळ्याच्या दिवसात थंड दूधाचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.