थंडीच्या दिवसात सर्वसामान्यपणे आपले पाय थंड होतातच. पण यापासून बचाव होण्यासाठी आपण जाड मोजे घालतो. जेणेकरुन आपल्या पायाला ऊब मिळेल. पाय थंड होणे ही शरिरातील सामान्य प्रक्रिया आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का, पाय अधिक थंड होणे म्हणजे शरिरात एखाद्या गंभीर आजाराचे लक्षणं ही असू शकतात. जर तुम्ही मधुमेह, उच्चरक्तदाब अशा आजारांपासून ग्रस्त असाल तर त्याचा परिणाम आपल्या पायांवर होतो आणि ते थंड होतात. ऐवढेच नव्हे तर ही समस्या काही वेळेस रक्तवाहिन्यांमध्ये एखाद्या समस्येच्या कारणास्तव ही होऊ शकते. (Cold Feet)
पाय थंड का पडतात?
मेडिकल न्यूज टुडे यांच्या मते, जेव्हा आपण थंड तापमानात जातो तेव्हा तळवे आणि हाताच्या रक्तवाहिन्या गोठल्या जातात. याच कारणास्तव त्या ठिकाणी रक्ताचा प्रवाह कमी होतो आणि त्यामुळे तेथील तापमान कमी होते. या व्यतिरिक्त काही मेडिकल कारणांमुळे सुद्धा पाय थंड पडण्याची समस्या उद्भवते.
![Cold Feet](https://kfacts.in/wp-content/uploads/2023/01/Cold-Feet.jpg)
पाय थंड पडण्याची अन्य कारणं
-अॅनिमिया
जर शरिरात रेड ब्लड सेल्सची कमतरता असेल आणि व्यक्तीला अॅनिमिया झाला असेल तर त्याच्या पायाला अधिक थंडावा लागतो. या व्यतिरिक्त, शरिरात लोहाची कमतरता, विटामिन बी१२, फॉलेट, क्रोनिक किडनी डिजीजची समस्या असल्याने ही असे होऊ शकते.
-मधुमेह
जर तुमचे पाय नेहमीच थंड राहत असतील तर तुम्ही एकदा तरी मधुमेहाची चाचणी करुन पहावी. खरंतर शरिरात सातत्याने साखर अनियंत्रित झाल्यानंतर पाय थंड पडण्याची समस्या सुरु होऊ शकते.
-रक्त पुरवठ्यामध्ये समस्या
काही वेळेस एकाच ठिकाणी बसून राहिल्यानंतर पायांमधून रक्ताचा शरिराला होणारा पुरवठा योग्य पद्धतीने होत नाही. याच कारणास्त पाय थंड पडतात. जर तुम्ही धावपळीचे आयुष्य जगत नसाल तर ही सु्द्धा समस्या उद्भवू शकते. (Cold Feet)
-मज्जातंतूची समस्या
जर तुम्हाला मज्जातंतू संबंधित समस्या असेल तर पाय थंड पडण्याची समस्या सामान्य आहे. काही वेळेस मज्जातंतू एखादी दुर्घटना, अपघात किंवा अत्याधिक तणावामुळे खराब होतात. अशा स्थितीत पायांची ही समस्या अधिक वाढते.
हे देखील वाचा- रात्रीच्या वेळी झोपेत घाम येणे आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक, ‘या’ आजाराचे तर लक्षणं नाही ना?
-अधिक तणाव
पाय थंड पडण्याची समस्या ही अधिक तणाव आणि एंग्जायटीच्या कारणास्तव ही होऊ शकते. जर तुम्ही अधिक तणावात असाल तर तुम्हाला जाणवेल की, तुमच्या पायाचे तापमान कमी होत आहे आणि ते थंड पडत आहेत.